एरव्ही तुम्ही फेकून देता त्या ‘या’ ५ गोष्टी वापरा खत म्हणून,बागेतील रोपांना येईल हिरवागार बहर...
Updated:February 1, 2025 19:16 IST2025-02-01T19:07:35+5:302025-02-01T19:16:07+5:30
5 Food scraps to Fertilize your Garden : 5 scraps that can instantly fertilise your plants : 5 Scraps That Will Give New Life to Your Plants : रोपांची वाढ होऊन अनेक समस्या दूर करण्यासाठी वापरा हे ५ पदार्थ..

गार्डनिंग करताना आपण आपल्या छोटाशा ( 5 scraps that can instantly fertilise your plants) बगीच्यात वेगवेगळ्या प्रकारची रोपं लावतो. या रोपांमध्ये काही फळझाड, फुलझाडं असतात. आपण स्वतः मेहेनत घेऊन कुंडीत लावलेल्या (5 Scraps That Will Give New Life to Your Plants ) रोपांना अगदी भरभरुन फळं - फुलं आलेली पाहून आपला आनंद द्विगुणित होतो. यासाठीच, आपल्या गार्डनमध्ये असणाऱ्या काही रोपांच्या कुंडीतील मातीत काही खास पदार्थ मिसळला की रोपं बहरुन येतात. याचबरोबर रोपांच्या वाढीत कोणत्याही अडचणी किंवा रोपांवर कोणताही रोग होऊ नये यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. यासाठीच नेमकं कोणत्या रोपांच्या कुंडीत कोणते पदार्थ घालावेत ते पाहूयात.
१. बेकिंग सोडा : टोमॅटो चवीला गोड होण्यासाठी :-
बाल्कनीत लावलेले टोमॅटो चवीला आंबट न होता गोड व्हावेत, यासाठी मातीत चमचाभर बेकिंग सोडा मिसळा. बेकिंग सोडा मातीची आम्लता कमी करून टोमॅटो चवीला गोड करण्यास मदत करते. १ लिटर पाण्यात १ चमचा बेकिंग सोडा मिसळून रोपाच्या मुळांजवळ घाला. हा उपाय आठवड्यातून किमान २ ते ३ वेळा केल्यास परिणाम दिसेल.
२. व्हिनेगर : तण नियंत्रणासाठी :-
आपल्या बाल्कनीतील रोपांजवळ तण फार मोठ्या प्रमाणात वाढून त्रास देत असेल तर त्यावर व्हिनेगर शिंपडावे. व्हिनेगर मधील आम्ल तणांना समूळ नष्ट करण्यास मदत करते. यासाठी व्हिनेगर आणि पाणी समप्रमाणात मिसळून त्याचे एकत्रित द्रावण तयार करुन स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. हे द्रावण फक्त तणांवर फवारा, यामुळे तण कमी होण्यास मदत मिळते.
३. हायड्रोजन पॅरॉक्साइड : मृत रोपांचा बचाव करण्यासाठी :-
हायड्रोजन पॅरॉक्साइडचा वापर करून आपण मृत रोपांचा बचाव करु शकतो. हायड्रोजन पॅरॉक्साइड मातीतील ऑक्सिजन वाढवून मृत रोपांना पुन्हा नवीन जीवनदान देण्यास मदत करतात. १ कप पाण्यात १ चमचा हायड्रोजन पॅरॉक्साइड मिसळून हे पाणी रोपांना द्या. हा उपाय केल्याने मुळांना ऑक्सिजन मिळेल.
४. अंड्याचे कवच : कॅल्शियम बूस्ट :-
टोमॅटो किंवा मिरचीच्या रोपांना कॅल्शियमची फार गरज असते. अंड्याची कवच वाळवून त्याचा चूरा करा आणि मातीत मिसळा, किंवा कवच उकळवून त्याचे पाणी रोपांना द्या. या उपायामुळे रोपांना वेगवेगळ्या रोपांचा प्रादुर्भाव होणार नाही.
५. तांदूळाचे पाणी : सेंद्रिय खत :-
तांदूळ धुवून उरलेले पाणी फेकू नका. यात स्टार्च आणि पोषक तत्वे फार मोठ्या प्रमाणावर असतात, जे मातीतील सूक्ष्मजीवांना बळ देतात. हे पाणी थेट रोपांच्या मुळांमध्ये घाला. फुलझाडांसाठी हा उत्तम उपाय आहे.