कलिंगड की अननस, उन्हाळ्यात पोटाला थंडावा देण्यासाठी काय खावं? दिवसभर राहाल फ्रेश

Updated:March 30, 2026 18:00 IST2026-03-30T18:00:00+5:302026-03-30T18:00:02+5:30

Right time to eat watermelon and pineapple: Summer superfoods for glowing skin and energy: पोटाला थंडावा देण्यासाठी कोणत फळ खायला हवं?

कलिंगड की अननस, उन्हाळ्यात पोटाला थंडावा देण्यासाठी काय खावं? दिवसभर राहाल फ्रेश

उन्हाळा सुरु झाला की आपल्या शरीराला सर्वाधिक गरज असते ती म्हणजे पाण्याची आणि थंडाव्याची. घामावाटे शरीरातील पाणी बाहेर पडल्यामुळे आपल्याला सतत थकवा, डिहायड्रेशन होणे आणि पोटाचे विकार यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी बाजारात रसाळ कलिंगड आणि सुगंधी अननस पाहायला मिळते. पण या दोन्ही फळांपैकी नक्की कोणत्या फळाने पोटाला जास्त थंडावा मिळतो आणि दिवसभर फ्रेश वाटण्यासाठी काय खावं असा प्रश्न अनेकांना पडतो. (Right time to eat watermelon and pineapple)

कलिंगड की अननस, उन्हाळ्यात पोटाला थंडावा देण्यासाठी काय खावं? दिवसभर राहाल फ्रेश

उन्हाळ्यात बाजारात आपल्याला रंगीबेरंगी आणि रसाळ फळे पाहायला मिळतात. या कडक ऊन आणि उष्णतेमध्ये शरीराला हायड्रेट ठेवणे जास्त महत्त्वाचे असते.त्यावेळी सर्वाधिक खाल्ले जाणारे फळ कलिंगड आणि अननस. पण पोटाला थंडावा देण्यासाठी कोणत फळ खावं पाहूया. (Summer superfoods for glowing skin and energy)

कलिंगड की अननस, उन्हाळ्यात पोटाला थंडावा देण्यासाठी काय खावं? दिवसभर राहाल फ्रेश

कलिंगडमध्ये ९२ टक्के पाणी असते. जे उन्हाळ्यात डिहायड्रेशनच्या समस्येपासून वाचवते. तसेच यातील लायकोपीन त्वचेला उन्हापासून होणाऱ्या नुकसानापासून वाचवते. जर आपल्याला फक्त शरीरातील पाण्याची पातळी टिकवायची असेल, तर कलिंगड खा.

कलिंगड की अननस, उन्हाळ्यात पोटाला थंडावा देण्यासाठी काय खावं? दिवसभर राहाल फ्रेश

अननसमध्ये ब्रोमेलेन नावाचे एन्झाईम असते, जे आपले पचन सुधारते. उन्हाळ्यात अनेकांना भूक लागत नाही. अपचनाचा त्रास होतो, त्यावर अननस गुणकारी ठरतो. आपल्याला रोगप्रतिकारशक्ती आणि पचनशक्ती वाढवायची असेल तर अननस खा.

कलिंगड की अननस, उन्हाळ्यात पोटाला थंडावा देण्यासाठी काय खावं? दिवसभर राहाल फ्रेश

कलिंगड हे हायड्रेशन आणि किडनी डिटॉक्ससाठी चांगले आहे. यात सिट्रुलिन नावाचे अमिनो अॅसिड असते, जे रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि स्नायूंचा थकवा दूर करण्यास मदत करते. आपल्याला रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल किंवा सांधेदुखीने त्रस्त असाल तर अननस खा.

कलिंगड की अननस, उन्हाळ्यात पोटाला थंडावा देण्यासाठी काय खावं? दिवसभर राहाल फ्रेश

कलिंगड हे नेहमी दुपारी किंवा उन्हातून आल्यावर खावे. रात्रीच्या वेळी कलिंगड खाणे टाळा. यात पाण्याचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे सतत लघवी येण्याचा त्रास वाढतो.

कलिंगड की अननस, उन्हाळ्यात पोटाला थंडावा देण्यासाठी काय खावं? दिवसभर राहाल फ्रेश

अननस हे सकाळच्या नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये करु शकतो. ही दोन्ही फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका. यामुळे पोट बिघडण्याची शक्यता असते.

टॅग्स :अन्नfood