भारतातच नाही तर जगभरात प्रसिध्द आहेत हे 13 शाकाहारी पदार्थ; पहा ही खास फोटो दावत

Published:October 2, 2021 02:55 PM2021-10-02T14:55:27+5:302021-10-02T15:41:32+5:30

नुकताच जागतिक शाकाहारी दिवस साजरा झाला. शाकाहारात काय उत्तम असा प्रश्न कोणी विचारलाच तर पटकन सांगता यावेत असे काही पदार्थ. जगभरात हे पदार्थ भारतीय पदार्थ म्हणून आवडीने खाल्ले जातात.

भारतातच नाही तर जगभरात प्रसिध्द आहेत हे 13 शाकाहारी पदार्थ; पहा ही खास फोटो दावत

शाकाहार हे फक्त आपल्या भारताचंच वैशिष्ट्य आहे असं नाही. जगभरात शाकाहारी लोकांची संख्या वेगाने वाढते आहे. शाकाहारात काय वैविध्य? असा प्रश्न विचारणार्‍यांना शाकाहारातील समृध्दताही अनुभवायला मिळते आहे. अर्थात शाकाहारातील ही श्रीमंती केवळ चवीच्या बाबतीतच नाहीतर पौष्टिकतेच्या बाबतीतही आहे. शाकाहाराबाबत संशोधनंही झाली आहेत. या संशोधनाचे निष्कर्ष सांगतात की शाकाहार हा हदयाच्या आरोग्यासाठी उत्तम असतो. नुकताच ‘जागतिक शाकाहारी दिन’ साजरा झाला. आपल्या सकाळच्या नाश्त्याला आणि जेवणाला पौष्टिक आणि चविष्ट करणार्‍या पदार्थांची ही फोटो सफर. हे पदार्थ जगभरात भारतीय पदार्थ म्हणून लोकप्रिय आहेत. करायला सोपे, चवीला उत्कृष्ट आणि आरोग्यदायी गुणांनी संपन्न

भारतातच नाही तर जगभरात प्रसिध्द आहेत हे 13 शाकाहारी पदार्थ; पहा ही खास फोटो दावत

पालक पनीर- पालक पनीर ही ऑलटाइम फेव्हरिट डिश. घरातलं जेवण असो की पार्टीसाठी आधी नाव पालक पनीरचंच येणार. चवीसाठी म्हणून ओळखी जाणारी ही भाजी पालक आणि पनीर यांच्यातील गुणांमुळे कमालीची पौष्टिकही आहे. पालक पनी र करण्यास अगदीच सोपी आहे. ती करण्यासाठी पालकाची ग्रेव्ही, पनीरचे तुकडे आणि घरगुती मसाले एवढीच सामग्री लागते.

भारतातच नाही तर जगभरात प्रसिध्द आहेत हे 13 शाकाहारी पदार्थ; पहा ही खास फोटो दावत

अचारी आलू- बटाटा ही प्रत्येक घरातली लोकप्रिय भाजी. बटाट्याची एकाच प्रकारची भाजी विशेष प्रसंगी नको वाटते. त्यासाठी अचारी आलू हा चविष्ट प्रकार आहे. ही भाजी करण्यासाठी उकडलेले बटाटे, तेल, आलं-लसणाची पेस्ट, हळद, लाल तिखट, लोणचं मसाला, साखर, व्हिनेगर, पाणी, तेल, मोहरी, जिरे, कलौंजी, आख्खी मिरची एवढ्याच सामग्रीची आवश्यकता असते. घरगुती जेवण आणि पार्टीसठी अचारी आलू ही सही डिश आहे.

भारतातच नाही तर जगभरात प्रसिध्द आहेत हे 13 शाकाहारी पदार्थ; पहा ही खास फोटो दावत

बटर पनीर- पनीरची भाजी म्हटलं की आधी बटर पनीरचंच नाव येणार. ही डिश कोणाला आवडत नाही असं होणं अशक्य. कांदा, टमाटा, लसूण , काजू पेस्ट आणि बटर घालून तयार केलेली ही ग्रेव्हीयुक्त भाजी चव आणि पौष्टिकतेचा उत्तम मिलाफ आहे. या भाजीतून शरीराला भरपूर प्रमाणात प्रथिनं मिळतात.

भारतातच नाही तर जगभरात प्रसिध्द आहेत हे 13 शाकाहारी पदार्थ; पहा ही खास फोटो दावत

भेंडी- या भाजीची अनेक रुप आणि अनेक चवी. आजारी माणसाला साधी भेंडीची भाजी ते पार्टीच्या डिशमधली भेंडी फ्राय, भरली भेंडी, दही भेंडी असे तिचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक प्रकारात ही भाजी मजा आणते. साधी भेंडीची भाजी करताना लसूण, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, मीठ एवढं असलं तरी भागतं आणि फ्राइड भेंडी सारखे स्पेशल प्रकार करायचे झाल्यास या सर्वांसोबतच ओलं नारळ, भरपूर मसाले वापरले जातात. पण आपण ते वापरलेच पाहिजे असं नाही.आपल्याला आवडेल ते मसाले वापरुन भाजी केली तरी ती छानच लागते. कारण ती भेंडी आहे ना म्हणून.

भारतातच नाही तर जगभरात प्रसिध्द आहेत हे 13 शाकाहारी पदार्थ; पहा ही खास फोटो दावत

मटर पुलाव- पुलावातील ही सर्वात लोकप्रिय आणि करायला सोपी डिश. हा पुलाव करायला एकदम सोपा. बासमती तांदूळ्, तूप, जीरे, आलं, मटर, धने पावडर, गरम मसला, मीठ, हळद आणि पाणी हे सगळं प्रमाणात घातलं की मटर पुलाव बिघडण्याचा नो चान्स!

भारतातच नाही तर जगभरात प्रसिध्द आहेत हे 13 शाकाहारी पदार्थ; पहा ही खास फोटो दावत

कुट्टु डोसा- डोसा या दक्षिण भारतीय पदार्थात कितीतरी प्रकारचे, चवीचे डोसे समाविष्ट झालेत. कुट्टु डोसा हा उपवासालाही चालणारा डोसा आतापर्यंत फार माहितीत नव्हता. पण पौष्टिक डोशाचा शोध सुरु झाल्यावर हा कुट्टु डोसा सापडला आणि म्हणता म्हणता लोकप्रियही झाला.

भारतातच नाही तर जगभरात प्रसिध्द आहेत हे 13 शाकाहारी पदार्थ; पहा ही खास फोटो दावत

उत्तप्पा- डोशासोबत उत्तपा येतोच. डोशाच्याच पिठात कांदा, भाज्या घालून जाडसर स्वरुपाचा उत्तप्पा करता येतो. किंवा खास उत्तप्याचं पीठ तयार करुन उत्तप्पे बनवले जातात. रव्याचा वापर करुन झटपट स्वरुपातले डोसे उत्तपेही आता लोकप्रिय झाले आहेत.

भारतातच नाही तर जगभरात प्रसिध्द आहेत हे 13 शाकाहारी पदार्थ; पहा ही खास फोटो दावत

मुगाच्या डाळीचे कबाब- कबाब म्हटलं की करायला अवघड वाटतात. पण अवघड वाटणार्‍या कबाबनंही स्वत:ला सोप्या आणि पौष्टिक साच्यात घालून घेतलं आहे. मुगाच्या डाळीचे कबाब याच प्रकारातले. मूग डाळीत प्रथिनं आणि फायबर भरपूर असतात. कबाबसाठी मोड आलेले मूग , पीठ आणि विविध मसाले वापरले जातात. आपल्या आवडीच्या आकाराचे कबाब करुन ते थोड्याशा तेलावर शॅलो फ्राय केले की ते चविष्ट आणि कमी तेलामुळे आरोग्यदायीही होतात.

भारतातच नाही तर जगभरात प्रसिध्द आहेत हे 13 शाकाहारी पदार्थ; पहा ही खास फोटो दावत

दाल मख्खनी- अख्खे मसूर आणि राजमा यांचा उपयोग करुन तयार होणारी ही डिश. घरात काही विशिष्ट प्रसंग असला की दाल मख्खनी आवर्जून केली जाते. आलं, टमाटा, तिखट, हिरवी मिरची , शाही जिरे, कसुरी मेथी, क्रीम , बटर, मीठ आणि पाणी एवढ्या सामग्रीतून चविष्ट दाल मख्खनी रुचकर जेवणाची भूक भागवते.

भारतातच नाही तर जगभरात प्रसिध्द आहेत हे 13 शाकाहारी पदार्थ; पहा ही खास फोटो दावत

व्हेजिटेबल पकोडा- अर्थात भाज्यांची भजी. भजी ही चटपटीत आणि खमंग म्हणून खावीशी वाटतातच. पण ती पौष्टिक करायची असल्यास भज्यांच्या पिठात भाज्या मिसळल्या की काम फत्ते. भाज्या घालून केलेली भजी आणखी चटपटीत होण्यासाठी त्यावर वरुन चाट मसाला भुरभुरावा आणि सोबत पुदिन्याची चटणी करावी.

भारतातच नाही तर जगभरात प्रसिध्द आहेत हे 13 शाकाहारी पदार्थ; पहा ही खास फोटो दावत

ओटसचे पोहे- नाश्त्याला नेहेमीच्या पोह्यांना पौष्टिक पर्याय ओटसच्या पोह्यांनी दिला आहे. ओटस आपले नाही असे मानणारेही आता त्याचे पोहे करुन आवडीने खाऊ लागले आहेत. या पोह्यांमधे भाज्या, ओटस आणि कमीत कमी मसाले घातले जातात. झटपट होणारे हे ओटस पोहे पौष्टिक नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे.

भारतातच नाही तर जगभरात प्रसिध्द आहेत हे 13 शाकाहारी पदार्थ; पहा ही खास फोटो दावत

मिक्स व्हेज पराठा- पराठ्यांमुळे सकाळच्या नाश्त्याच्या पदार्थात वैविध्य आलं. सुरुवातीला पराठा हा एकच कुठल्यातरी भाजीचं सारण करुन तयार केला जायचा. पण वेगवेगळ्या भाज्या एकत्र करुन त्या सारणाचे पराठे नुसते चवीला उत्तम लागतात असं नाहीतर त्यात पौष्टिकतेचे गुणही उतरतात.

भारतातच नाही तर जगभरात प्रसिध्द आहेत हे 13 शाकाहारी पदार्थ; पहा ही खास फोटो दावत

व्हेज सॅण्डविच- साध्यासुध्या सॅण्डविचपासून भाज्यांनी भरगच्च सॅण्डविचपर्यंत अनेक प्रकार केले जातात. सॅण्डविच कोणतंही असो ते झटपट नाश्त्यासाठी पटकन तयार होतं. कोबी, काकडी, कांदा, हिरवे वाटाणे, गाजर, टमाटा अशा विविध गुणांनी युक्त भाज्या वापरुन पोटभरीचं पौष्टिक सॅण्डविच करता येतं.