महाराष्ट्रात आवडीने खाल्ले जातात असे भाताचे ७ प्रकार, फोडणीचा भात ते बिर्याणी, घरोघरी भात हवाच!
Updated:March 2, 2025 17:12 IST2025-03-02T17:08:42+5:302025-03-02T17:12:49+5:30
Types of rice: Rice varieties guide: Popular rice types: Best rice for cooking: Basmati rice vs Jasmine rice: Healthy rice options: Different types of rice for dishes: Asian rice varieties: How to cook different rice types: fodnicha rice: briyani: narali bhaat: जर तुम्हालाही साधा भात खाऊन कंटाळा आला असेल तर महाराष्ट्रातील इतर भागातील भाताची चव चाखूया.

आपल्यापैकी अनेक घरांमध्ये रोज भात खाल्लाच जातो. गरमागरम वाफाळलेला भात आणि त्यावर वरुन साजूक तूप. असं साधं पण पौष्टिक जेवण सगळ्यांना फारच आवडते. महाराष्ट्रातील प्रत्येक भागानुसार भात बनवण्याची आणि खाण्याची पद्धतही वेगळी असते. (Best rice for cooking)
कुठे गरमा गरम वरण-भात असतो तर कुठे बिर्याणी, मसाले भात, दही भात अशाप्रकारची मेजवाणी असते. लग्नात गेल्यानंतर जिरा राईस, साधा राईस,पुलाव अशा अनेक रंगबेरंगी भाताचे प्रकार पाहायला मिळतात. जर तुम्हालाही साधा भात खाऊन कंटाळा आला असेल तर महाराष्ट्रातील इतर भागातील भाताची चव चाखूया. (Healthy rice options)
फोडणीचा भात हा झटपट बनवता येणारा पदार्थ आहे. हा उरलेल्या भातापासून बनवला जातो. यात पिवळा आणि लाल अशा दोन प्रकारच्या चवी चाखायला मिळतात. चवीला स्वादिष्ट आणि बनवायला अगदी सोपा प्रकार आहे. (Different types of rice for dishes)
मसाला पुलाव बनवताना यामध्ये भाज्या आणि मसाल्यांचा वापर केला जातो. यामुळे या भाताची चव अधिक वाढते. हा भात कुकरमध्येही बनवता येतो.
दही भात हा मराठी पदार्थ आहे. दक्षिण भारतातील मूळ पदार्थ असून उन्हाळ्यात उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. अनेक दक्षिण भारतीय लोकांच्या दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणामध्ये चवीने खाल्ले जाते. मसालेदार पदार्थाचे होणारे परिणाम कमी करण्यासाठी हे मदत करते.
लातूरचा सगळ्यात प्रसिद्ध भात निलंगा राईस. हा भात नाश्त्यामध्ये खाल्ला जातो. यामध्ये लातूरचा चांदतारा तांदूळ, मसूर डाळ, मेथीची भाजी, कसुरी मेथी आणि तेलाचा वापर करुन बनवला जातो.
नारळी भात हा प्रामुख्याने कोकणात बनवला जातो. महाराष्ट्रात नारळी पौर्णिमेच्या दिवशी याला आवर्जून बनवले जाते. यात ओला नारळ, नारळाचे दूध आणि गुळाचा वापर केला जातो.
सांबर भात ही दक्षिण भारतातील प्रसिद्ध डिश आहे. थोडं आंबट गोड असणारं वरण यावर घालून हा भात चवीने खाल्ला जातो. यासोबत पापड किंवा वेफर्स खाल्ले जातात.
मसूर पुलाव हा एक पौष्टिक आणि चटपटीत डिश आहे. यामध्ये मसूरची डाळ आणि तांदूळ व मसाले घालून हा भात तयार केला जातो. अगदी साध्या व सोप्या पद्धतीने बनवता येतो.
बिर्याणी म्हटलं की, अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. हा मसालेदार पदार्थ असून प्रामुख्याने भारतीय उपखंडात मिळतो. यामध्ये व्हेज पुलाव किंवा मासांहरी बिर्याणी असे प्रकार चाखायला मिळतात.