Raksha Bandhan Special: भावाला ओवाळताना खाऊ घाला ५ गोड पदार्थ- नेहमीपेक्षा वेगळे आणि खास
Updated:August 8, 2025 18:35 IST2025-08-08T18:30:00+5:302025-08-08T18:35:01+5:30
Raksha Bandhan sweets: unique sweets for Rakhi: Raksha Bandhan recipes: घराच्या घरी बनवलेले हे पदार्थ सणाचा आनंद द्विगुणित करतात. या दिवशी भावाला ओवाळताना कोणते खास पदार्थ असायला हवे.

रक्षाबंधन हा बहिण-भावाचे नातं घट्ट करणारा सण आहे. या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुख-समृद्धीची प्रार्थना करते. भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी वचन देतो. या आनंदाच्या क्षणी गोड पदार्थांचा समावेश सणाला आणखी गोडवा देतात. (Raksha Bandhan sweets)
पदार्थ फक्त चवच नाही तर भावाच्या प्रेमात आणि आपुलकीत भर घालण्यासाठीही खास मानले जातात. घराच्या घरी बनवलेले हे पदार्थ सणाचा आनंद द्विगुणित करतात. या दिवशी भावाला ओवाळताना कोणते खास पदार्थ असायला हवे. (unique sweets for Rakhi)
मोतीचूरचा लाडू ही प्रसिद्ध भारतीय मिठाई आहे. ही बेसन, साखर आणि इतर साहित्यांपासून बनवली जाते. भावाला ओवाळताना आपण खास मिठाई म्हणून ठेवू शकतो.
कलाकंद ही भारतीय मिठाई असून ती दूध, पनीर आणि साखर मिसळून बनवली जाते. रक्षाबंधनाच्या खास दिवशी आपण ही रेसिपी ट्राय करु शकतो.
गुलाबजामून हा सगळ्यांचा आवडीचा पदार्थ. हा मावा आणि मैदा मिसळून तयार केला जातो. हा पदार्थ सण- समारंभात आवर्जून बनवला जातो.
नारळाची बर्फी याला नारळाची वडी असं देखील म्हणतात. ही बर्फी प्रामुख्याने नारळ, साखर आणि दुधापासून बनवली जाते. नारळीपौर्णिमा आणि रक्षाबंधन या दिवशी हमखास बनवली जाते.
नारळी भात हा पदार्थ नारळाच्या दुधापासून केला जातो. नारळ, गूळ आणि बासमती तांदूळ वापरून करतात. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि पाककलेच्या परंपरेचा महत्त्वाचा भाग आहे. लाडक्या भावासाठी हा खास पदार्थ करु शकतो.