नवरात्रीसाठी खमंग उपवास भाजणी करण्याची रेसिपी- आरोग्य आणि स्वाद दोन्हीही जपले जाईल
Updated:September 18, 2025 15:08 IST2025-09-18T15:00:09+5:302025-09-18T15:08:31+5:30

नवरात्रीच्या दिवसांत अनेक जण ९ दिवसांचे उपवास करतात. घटस्थापनेपासून सुरू झालेले उपवास थेट नवमीला किंवा दसऱ्याच्या दिवशी सुटतात.(how to make upvas bhajani for Navratri?)
त्यामुळेच या दिवसांत पोटाला आराम आणि भरपूर एनर्जी देतील असे पदार्थ खायला हवेत. अशा पदार्थांपैकी एक पदार्थ म्हणजे भाजणीचे थालिपीठ.(upvas bhajani recipe for thalipith)
म्हणूनच आता नवरात्रीच्या उपवासासाठी घरच्याघरीच खमंग थालिपीठ भाजणी कशी करायची ते पाहूया..
उपवास भाजणीसाठी आपल्याला १ वाटी साबुदाणा लागणार आहे. वाटीप्रमाणे पीठाचा अंदाज दिलेला आहे. तो तुम्ही तुमच्या प्रमाणात वाढवू शकता. साबुदाणा कढईमध्ये घालून ४ ते ५ मिनिटे मध्यम आचेवर सोनेरी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्या.
आता कढईमधून साबुदाणा काढून घ्या आणि दिड वाटी भगर घालून ती देखील ४ ते ५ मिनिटे मंद ते मध्यम आचेवर भाजून घ्या.
यानंतर १ वाटी राजगिरा घालून तो भाजून घ्यावा. राजगिरा भाजताना गॅसची फ्लेम मंद ठेवावी.
सगळ्यात शेवटी जिरे भाजून घ्यावे. भाजून घेतलेले सगळे पदार्थ थंड झाल्यानंतर एकत्रित करून गिरणीतून दळून आणावे.
घरी तयार केलेल्या उपवास भाजणीची चव निश्चितच खूप वेगळी आणि खमंग लागते. एकदा नक्की ट्राय करून पाहा.