Laxmi Pujan : लक्ष्मी पूजनाला लाह्या आणि बत्ताश्यांचा नैवेद्य का दाखवतात? ५ कारणं- प्रसाद न चुकता खा
Updated:October 20, 2025 20:28 IST2025-10-20T16:53:45+5:302025-10-20T20:28:11+5:30
Laxmi Pujan : लाह्यांमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

दिवाळीचा (Diwali 2025) दुसरा दिवस म्हणजेच लक्ष्मी पूजन (Laxmi Pujan). लक्ष्मी पूजनाला लाह्या आणि बताशांचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा अनेक वर्षांपासून चालत आली आहे. हा केवळ एक विधी नसून यामागे कृषी, संस्कृती आणि आरोग्याच्या दृष्टीकोनातूनही अनेक फायदे आहेत. (t Why People Eat a Salichya Laya Battashe On Laxmi Pujan)
लक्ष्मी पूजनाला साळीच्या लाह्यांचा नैवेद्य का दाखवतात?
लाह्या तांदळापासून बनवल्या जातात. दिवाळीचा काळ हा भाताचे पहिले पीक शेतकऱ्यांच्या हाती येण्याचा काळ असतो. त्यामुळे नवीन पीक सर्वप्रथम धन-धान्यांची देवी लक्ष्मीला अर्पण केले जाते. यामुळे देवी प्रसन्न होते आणि घरात धनधान्याची कमतरता भासत नाही.
लाह्या समृद्धी आणि वाढीचे प्रतीक मानल्या जातात. लक्ष्मी पूजनाच्या वेळी बताशांच्या नेवेद्य दाखवल्यानं शुक्र ग्रह आणि देवी लक्ष्मीची कृपा होते बताशे गोडवा आणि शुभता दर्शवतात.
लाह्या आणि बतासे हे अत्य साधे आणि शुद्ध घटक आहे. त्यांची शुभ्रता पवित्रता आणि साधेपणा दर्शवते जे कोणत्याही पूजेसाठी आवश्यक मानले जाते.
साळीच्या लाह्या पचायला अतिशय हलक्या असतात. यामधील उपयुक्त घटकांमुळे पचन सुधारण्यास मदत होते.
थंडीच्या दिवसांत कफ किंवा सर्दीचा त्रास झाल्यास लाह्या खाल्ल्याने कफ कमी होण्यास मदत मिळते. लहान मुलांनाही हा पारंपरिक उपाय अनेकदा दिला जातो.
लाह्यांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असल्याने त्या हृदय आणि रक्तवाहिन्यांचे कार्य चांगले ठेवण्यास मदत करतात. तसेच, रक्तदाब नियंत्रणात राहण्यासही मदत होते.
लाह्यांमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. आजारी व्यक्तीला लाह्यांचे पाणी दिल्यास त्वरित ऊर्जा मिळते.