दिवाळीची पार्टी होईल चौपट भारी, घरीच करा ७ सोपे झटपट होणारे पदार्थ, पाहुणेही होतील खूश
Updated:October 18, 2025 09:43 IST2025-10-18T09:33:58+5:302025-10-18T09:43:40+5:30
Diwali party recipes: Easy Diwali snacks: Quick Diwali food ideas: Homemade Diwali dishes: दिवाळी पार्टीत आलेल्या पाहुण्यांसाठी जर आपणही झटपट आणि सोपे होणारे पदार्थांचा विचार करत असू तर हे ७ पर्याय पाहा.

दिवाळी म्हटलं की आनंदाचा, उत्साहाचा सण. दिवाळीच्या दिवशी आपल्या घरी पाहुणे येतात. पण यादिवशी नेमकं काय बनवायचं हा प्रश्न अनेकांना पडतो. फराळाचे किंवा गोडाचे पदार्थ खाऊन अनेकांना कंटाळा येतो. अशावेळी काही तरी पटकन होणारे पदार्थ आपल्याला हवे असतात. (Diwali party recipes)
दिवाळी पार्टीत आलेल्या पाहुण्यांसाठी जर आपणही झटपट आणि सोपे होणारे पदार्थांचा विचार करत असू तर हे ७ पर्याय पाहा. ( Easy Diwali snacks:)
कुरकुरीत बटाट्याचे चिप्स हा पर्याय सोपा आहे. यावर आपण तेल, मीठ आणि मसाले घालून एअर फ्राय करु शकतो.
पनीर टिक्का हा स्टार्टर ऑपशन म्हणून चांगला आहे. अनेकांना हा पर्याय जास्त आवडतो. यात शिमला मिरची, कांदा, दही, आले-लसूण पेस्ट, टिक्का मसाला आणि मीठ यांच्या मिश्रणात मॅरीनेट करु शकतो.
मसाला शेंगदाणे हे स्नॅक्स म्हणून चांगले आहे. यावर आपण तेल, मीठ आणि मसाला घालून एअर फ्रायरमध्ये सेट करु शकतो.
समोसा हा सगळ्यात चांगला आणि आवडता पर्याय. यात विविध भाज्या घालून एअर फ्राय करा. कमी तेलकट आणि सगळ्यांना आवडणारा पदार्थ आहे.
बाजारात विविध रेडी टू कूक असे पर्याय मिळतात. आपण यामध्ये फ्रोजन पदार्थांचा वापर करु शकतो. पार्टी स्नॅक्स म्हणून मिळणारे चीज कॉर्न वडा खाता येईल.
आपण पार्टी स्नॅक्समध्ये चाट किंवा सॅण्डविच देखील बनवू शकतो. इतकेच नाही तर चीज बॉल्स, स्प्रिंग रोल किंवा वडापाव ही खाता येईल.