उन्हाळ्यात उकाड्याने दुपारचे जेवण नकोसे वाटते? खा 'हे' ७ पदार्थ, हलकेफुलके पण पौष्टिक पदार्थ...

Updated:May 10, 2025 13:51 IST2025-05-10T13:34:24+5:302025-05-10T13:51:11+5:30

7 light and nutrient rich desi lunch ideas perfect for summer : Healthy, Easy & Light Summer Recipes For Lunch : 7 light and nutrient-rich desi lunch ideas perfect for summer : 7 light & delicious Indian dishes for summer lunch : उन्हाळ्यात अनेकदा दुपारच्या कडाक्याचे उन्हामुळे जेवण नको वाटते, अशावेळी काय खावे ?

उन्हाळ्यात उकाड्याने दुपारचे जेवण नकोसे वाटते? खा 'हे' ७ पदार्थ, हलकेफुलके पण पौष्टिक पदार्थ...

उन्हाळ्याच्या दिवसांतील कडाक्याची उष्णता, सतत वाढणारे तापमान, घाम यामुळे अनेकदा दुपारच्या जेवणाच्या (7 light and nutrient rich desi lunch ideas perfect for summer) वेळी भूक लागत नाही, किंवा जड जेवण खाण्याची इच्छाही ( 7 light & delicious Indian dishes for summer lunch) होत नाही. अनेकदा शरीर थकल्यासारखं वाटतं आणि काहीतरी हलकं, थंड आणि पटकन पचणारे अन्नपदार्थ खावेसे वाटतात. अशावेळी पचनास मदत करणारे, पोषणमूल्यांनी भरलेले आणि चवदार असे हलके पदार्थ खाण्यासाठी निवडणं हे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरतं.

उन्हाळ्यात उकाड्याने दुपारचे जेवण नकोसे वाटते? खा 'हे' ७ पदार्थ, हलकेफुलके पण पौष्टिक पदार्थ...

उन्हाळ्यात दुपारच्या जेवणाला हलके - फुलके पण पोषक अन्नपदार्थ (7 light and nutrient-rich desi lunch ideas perfect for summer) खाल्ले तर पोटाला त्रास न होता अधिक ऊर्जा मिळते. एवढंच नव्हे तर शरीरातील उष्णताही नियंत्रित करण्यास मदत होते. असे पदार्थ कोणते ते पाहूयात...

उन्हाळ्यात उकाड्याने दुपारचे जेवण नकोसे वाटते? खा 'हे' ७ पदार्थ, हलकेफुलके पण पौष्टिक पदार्थ...

दुपारच्या रणरणत्या उन्हात थंडगार दही भात खाल्ल्याने पोटाला आराम मिळू शकतो. मस्त दही व भात एकत्रित करून वरून मोहरी आणि काडिपत्त्यांच्या पानांची फोडणी दिली तर असा दही भात चवीला उत्तम लागतो. याशिवाय यात दही असल्याने पोटाला थंडावा देखील मिळतो.

उन्हाळ्यात उकाड्याने दुपारचे जेवण नकोसे वाटते? खा 'हे' ७ पदार्थ, हलकेफुलके पण पौष्टिक पदार्थ...

पिवळ्या मूग डाळीची खिचडी आपण दुपारच्या जेवणात खाऊ शकता. खिचडी सहज पचायला उत्तम असा पदार्थ आहे. त्यामुळे उन्हाळ्यात दुपारच्या वेळी खिचडी खाणे फायदेशीर ठरेल.

उन्हाळ्यात उकाड्याने दुपारचे जेवण नकोसे वाटते? खा 'हे' ७ पदार्थ, हलकेफुलके पण पौष्टिक पदार्थ...

एका बाऊलमध्ये कांदा, टोमॅटो, गाजर, बीट, काकडी सगळ्या भाज्या एकत्रित करून कोशिंबीर तयार करावी. यात आपण पनीरचे छोटे तुकडे देखील घालू शकतो. वरून थोडा चाट मसाला, लिंबाचा रस आणि कोथिंबीर भुरभुरवून घालावी. ही कोशिंबीर तुम्हाला उन्हाळ्यात हायड्रेटेड ठेवण्यास मदत करेल.

उन्हाळ्यात उकाड्याने दुपारचे जेवण नकोसे वाटते? खा 'हे' ७ पदार्थ, हलकेफुलके पण पौष्टिक पदार्थ...

दुधीभोपळ्यात पाण्याचे प्रमाण ९० % असते. त्यामुळे दुपारच्या जेवणात दुधीभोपळ्याची भाजी खाल्ल्याने पोटाला थंडावा मिळतो व डिहायड्रेशन होत नाही. भाकरीत असणारे फायबर तुमच्या पोटाचे आरोग्य चांगले ठेवते.

उन्हाळ्यात उकाड्याने दुपारचे जेवण नकोसे वाटते? खा 'हे' ७ पदार्थ, हलकेफुलके पण पौष्टिक पदार्थ...

उन्हाळ्यात दुपारच्या वेळी जर तुम्हाला जेवायची इच्छा होत नसेल तर तुम्ही बाऊल भरून कडधान्यांचे सॅलेड खाऊ शकता. मोड आलेली कडधान्ये आणि बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो घालून कडधान्यांचे पौष्टीक सॅलेड खावे.

उन्हाळ्यात उकाड्याने दुपारचे जेवण नकोसे वाटते? खा 'हे' ७ पदार्थ, हलकेफुलके पण पौष्टिक पदार्थ...

वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घालून तुम्ही पौष्टिक असा दलिया दुपारच्या जेवणाऐवजी खाऊ शकता. यामुळे तुमचे पोटही भरेल आणि थकवा जाऊन एनर्जी देखील मिळेल.

उन्हाळ्यात उकाड्याने दुपारचे जेवण नकोसे वाटते? खा 'हे' ७ पदार्थ, हलकेफुलके पण पौष्टिक पदार्थ...

डाळ - भात आपण कधीही खाऊ शकतो. उन्हाळ्यात जर तुम्हाला जेवायची इच्छा होत नसेल किंवा फारसे काही खायचे नसेल तर तुम्ही सहज पचणाऱ्या अशा डाळ - भाताची निवड करु शकता.