Join us   

दिल की नजर से! - हार्ट तंदुरुस्त ठेवण्यासाठी करा ही 10 आसने; पहा फोटो व्हा फिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 6:53 PM

1 / 11
व्यायाम करताना फक्त वजनाचाच विचार करुन कसं चालेल? वजन कमी करण्यासाठी म्हणून नाही तर आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी व्यायाम करणं आवश्यक आहे. आठवड्यातले पाच दिवस व्यायाम करताना शरीराच्या प्रत्येक अवयवाचा विचार करुन व्यायाम करायला हवा. तरच व्यायामातून फिटनेस राखला जाईल. शरीराच्या फिटनेसचा संबंध वजनापेक्षाही हदयाशी असतो. हदयाचं आरोग्य जपण्यासाठी आहार-विहार आणि व्यायाम या तीन गोष्टींचा मेळ घालावा लागतो. व्यायाम करताना योग साधनेतील काही आसन प्रकार हे खास हदयाचं आरोग्य जपण्यासाठी आहेत.
2 / 11
अधोमुख श्वानासन- हे आसन शरीराला ऊर्जा देतं तसेच ताजतवानं करतं. शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास हे आसन मदत करतं .याचा थेट फायदा हदय सुदृढ राहाण्यास होतो. या आसनामुळे पाठीचा कणा लवचिक राहातो. छातीचे स्नायू मजबूत होतात. फुप्फुसांची क्षमताही या आसनामुळे वाढते. या आसनामुळे मेंदूतला रक्तप्रवाह वाढतो. हे आसन मनाला शांती देणारं, झोपेची समस्या दूर करणारं आणि थकवा घालवणारं आहे.
3 / 11
सर्वांगासन- थायरॉइडच्या समस्येत हे आसन करणं फायदेशीर ठरतं. हात आणि खांद्याचे स्नायू मजबूत होतात, पाठीचा कणा लवचिक होतो. सर्वांगासनामुळे मेंदुला रक्त पुरवठा चांगला होतो. हे आसन हदयाचे स्नायू सक्रीय करतं. हदयाला शुध्द रक्ताच पुरवठा होण्याचा फायदा या आसनातून होतो. त्यामुळे हदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
4 / 11
सलंब भुजंगासजन- या आसनामुळे रक्तप्रवाह सुधारतो. शरीर तणावरहित होतं. रक्तात ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. हदयाला सुरक्षित ठेवण्यासाठी हे आसन महत्त्वाचं मानलं जातं. हे आसन नियमित केल्यास आरोग्य निरोगी राहातं.
5 / 11
वृक्षासन - वृक्षासन केल्यास शरीरात ऊर्जेचा संचार होतो. शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. या आसनामुळे हात, पाय आणि दंड येथील स्नायू ताणले जातात. यामुळे उत्साही वाटतं. डोकं शांत करणारं, शरीराचं संतुलन राखण्यास मदत करणार्‍या या आसनामुळे चित्ताची एकाग्रताही वाढते.
6 / 11
सेतुबंधासन- ह्दयाशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्यांसाठी सेतुबंधासन हे आसन लाभदायक असतं. सेतुबंधासनात शरीराची अवस्था एका पुलासारखी होते. या आसनामुळे हदय सुरक्षित राहातं तसेच पोटाची चरबीही कमी होते.
7 / 11
उत्कटासन - या आसनामुळे पाठीचा कणा, नितंब, छातीचे स्नायू मजबूत होतात. पाठीच्या खालच्या भागही यामुळे मजबूत होतो. तसेच जांघा, टाचा, पाय आणि गुडघ्याच्या स्नायुंना ताकद मिळते. उत्कटासनामुळे शरीराला संतुलन आणि मनाला दृढता प्राप्त होते.
8 / 11
त्रिकोणासन- त्रिकोणासन केल्यानं ह्दयाला पुरेशा प्रमाणात रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा होतो. हदयाशी संबंधित सर्व आजारांची तीव्रता कमी करण्याचं काम हे आसन करतं. या आसनामुळे पाठ, पाय तर मजबूत होतातच शिवाय संपूर्ण शरीराला निरोगी राखण्याची क्षमता या आसनात आहे.
9 / 11
गोमुखासन - गोमुखासनाचे अनेक फायदे आहेत. या अनेक फायद्यातला एक महत्त्वाचा फायदा हदयाशी संबंधित आहे. या आसनामुळे हदयास सुरक्षितता मिळते. या आसनामुळे शरीरातील रक्तपुरवठा सुरळीत होऊन हदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
10 / 11
वीरभद्रासन- हे आसन हदयातील रक्तवाहिन्यांमधे ब्लॉकेजेस होवू देत नाही. त्यामुळे ह्दयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो.
11 / 11
भुजंगासन- हे आसन करताना शरीराच्या वरच्या भागातील अवयव ताणले जातात. विशेषत: छातीचा भाग ताणला जातो. हा ताण हदयाचं आरोग्य जपण्यासाठी उपयुक्त असतो.