हळदी, देवब्राह्मणाच्या कार्यक्रमासाठी 'असा' करा पिवळ्या साडीतला सुंदर लूक- तुमच्यावरच खिळतील नजरा..
Updated:November 20, 2025 09:35 IST2025-11-20T09:34:58+5:302025-11-20T09:35:01+5:30

सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे हळदीचा कार्यक्रम, देवब्राह्मण आणि मुहुर्ताचा कार्यक्रम लग्नघरी होतच असतो. अशावेळी पिवळ्या रंगाची साडी नेसली जाते. तुम्हालाही त्यानिमित्ताने पिवळी साडी घ्यायची असेल तर त्यासाठी पुढे सांगितलेल्या काही आयडिया पाहा..
नऊवारी नेसणार असाल तर त्यावर गुलाबी, लाल, हिरवा, जांभळा शेला घ्या.. खूप सुंदर वाटतो.
तुम्हीच जर नवरी असाल तर प्युअरसिल्कची पिवळी साडी घ्या. त्या साड्यांमध्ये सौंदर्य आणखी खुलून येते.
अशा प्रकारची डिझायनर प्रकारातली पिवळी साडी नवरदेव किंवा नवरीच्या करवल्यांना छान दिसते.
सध्या थंडीचे दिवस आहेत. त्यामुळे अशी पिवळी साडी विथ जॅकेट अशी फॅशन तुम्ही करू शकता.
पिवळी कॉटनची साडी असेल तर त्यावर ऑक्सिडाईज दागिने, मोत्याचे दागिने किंवा काठांच्या रंगानुसार घातलेले लाल, गुलाबी, हिरवे, जांभळे दागिने जास्त छान दिसतात.
ट्रेण्डी विथ ट्रॅडिशन असा हटके लूक करायचा असेल तर पिवळ्या साडीवर कॉन्ट्रास्ट रंगाचं स्लिव्हलेस ब्लाऊज घाला..
पिवळ्या साडीतला काजोलचा हा एक आणखी मस्त लूक पाहा..