साडी घेताना रंग-कापड बघताच, मात्र काठाचा प्रकारही तपासून घ्या, पाहा किती प्रकारचे काठ असतात..

Updated:May 19, 2025 08:55 IST2025-05-19T08:50:08+5:302025-05-19T08:55:01+5:30

When buying a saree, not only look at the color and fabric, but also check the type of embroidery : साडी घेताना त्याचा काठही तपासून घ्या. काठ सुंदर असेल तर साडी उठून दिसते. सध्या लोकप्रिय असलेले काठाचे प्रकार पाहा.

साडी घेताना रंग-कापड बघताच, मात्र काठाचा प्रकारही तपासून घ्या, पाहा किती प्रकारचे काठ असतात..

साड्या विकत घेणे किंवा साड्या जमवणे व्यवस्थित कपाटात लावणे हे महिलांसाठी काम नाही तर आवड आहे. एक छंद आहे. महिला एकमेकांना फार कौतुकाने आपले साड्यांचे कलेक्शन दाखवतात. विविध प्रकारच्या साड्या तर घेता पण काठ तेच तेच असतात ? पाहा काठातही आहेत अनेक प्रकार

साडी घेताना रंग-कापड बघताच, मात्र काठाचा प्रकारही तपासून घ्या, पाहा किती प्रकारचे काठ असतात..

जरी काठाची साडी तर सगळ्यांनाच फार आवडते. पारंपारिक सुंदर अशी ही जरी काठाची साडी महाराष्ट्रात घरोघरी नेसली जाते. कितीही नवीन प्रकार आले तरी जरीच्या साडीचा काही महिलांना कंटाळा यायचा नाही.

साडी घेताना रंग-कापड बघताच, मात्र काठाचा प्रकारही तपासून घ्या, पाहा किती प्रकारचे काठ असतात..

गोटा पट्टीची साडीही तशी साधारण माहितीची असते. हा प्रकार खास राजस्थान तसेच गुजरात या राज्यांमध्ये पाहायला मिळतो. चमकदार छान आकर्षक असे हे काठ असतात.

साडी घेताना रंग-कापड बघताच, मात्र काठाचा प्रकारही तपासून घ्या, पाहा किती प्रकारचे काठ असतात..

फुलांच्या काठाची साडी आजकाल फार लोकप्रिय आहे. हा प्रकार अगदीच सुंदर दिसतो. तसेच त्यात रंगही अनेक आहेत. प्रकारही बरेच आहेत.

साडी घेताना रंग-कापड बघताच, मात्र काठाचा प्रकारही तपासून घ्या, पाहा किती प्रकारचे काठ असतात..

देऊळ किंवा मंदिर काठ अशा नावांनी ओळखला जाणारा हा काठ दक्षिणेत फार वापरला जातो. महाराष्ट्रातही असे काठ फार वापरले जातात. फार छान अशी ही साडी सणासुदीला नक्कीच नेसून पाहा.

साडी घेताना रंग-कापड बघताच, मात्र काठाचा प्रकारही तपासून घ्या, पाहा किती प्रकारचे काठ असतात..

सोनेरी काठ आधीपासूनच लोकप्रिय आहेत मात्र आजकाल चंदेरी साडी काठ यायला लागले आहेत. अगदी लग्नात नवरीसुद्धा अशा काठाच्या साड्या नेसते. फारच वेगळा आणि चमकता प्रकार आहे.

साडी घेताना रंग-कापड बघताच, मात्र काठाचा प्रकारही तपासून घ्या, पाहा किती प्रकारचे काठ असतात..

जरा मॉडर्न साड्यांकडे वळात तर लेसचे काठ जसे ड्रेसला असतात अगदी तसेच साड्यांनाही लावले जातात. या साड्या असतात साध्याच दिसतातही चांगल्या. पार्टी वेअर साड्यांमध्येच हा प्रकार मोडतो.

साडी घेताना रंग-कापड बघताच, मात्र काठाचा प्रकारही तपासून घ्या, पाहा किती प्रकारचे काठ असतात..

सध्या वादात्मक असलेला प्रकार म्हणजे वेलवेटचा काठ नव्या पिढीला हे काठ आवडायला लागले आहेत तर जुन्या पिढीतल्या महिलांचे काही फार चांगले असे मत या साडीबद्दल नाही.