साडीवर तसेच ड्रेसवर घाला हे पारंपारिक कानातल्यांचे प्रकार, सुंदर आणि हलके डिझाइन
Updated:June 9, 2025 14:45 IST2025-06-09T14:41:05+5:302025-06-09T14:45:34+5:30
Wear this traditional type of earrings with sarees as well as dresses : पाहा साडीसाठी पारंपारिक कानातल्यांने कलेक्शन. तुम्हाला कोणते आवडतात नक्की जाणून घ्या.

काही कानातले असे असतात ज्यांचे डिझाइन फार कॉमन असते तर काहींचे अगदी वेगळे. भारतीय पेहरावाला साजेशी कानातल्यांची डिझाइन्स पाहा आणि नक्की वापरा.
गुलाबी आणि सोनेरी हे कॉम्बिनेशन कायम सुंदरच दिसते. काठापदराची साडी असेल तर त्यावर हे कानातले अगदी उठून दिसतील.
लहान नाजूक खडा कानातल्यात तसेच माळेतही सुंदर दिसतो. त्याला लहान लटकन असतील तर कानातल्याची शोभा वाढते.
देवीचे सुंदर डिझाइन असलेले सोनेरी कानातले साडी ड्रेसवर फार छान दिसतात. त्यावर मोराचेही नक्षीकाम केलेले आहे.
जसा पदरावर मोर छान वाटतो तसाच कानातल्यांवरही अगदी सुंदर वाटतो. गुलाबी खड्यामुळे मोराचा पिसारा अगदी सुंदर दिसतो.
मोराचा कानचाप आणि त्याला लागूनच कानातले हे डिझाइन टू इन वन लूक देते.
मंदिर डिझाइन हा कानातल्यांचा पॅटर्न भारतात फार लोकप्रिय आहे. कोरीव काम केलेले कानातले दिसायला फार सुंदर असतात.
साधे कानातले अगदी सुंदर दिसतात. कायम भरगच्चच घालायला हवेत असे काही नाही. पारंपारिक कानातले लहानही असतात.