झोपताना छान सुटसुटीत कपडेच घाला.. पाहा असे पॅटर्न जे दिसतील मस्त आणि तुम्ही राहाल स्वस्थ
Updated:May 1, 2025 18:36 IST2025-05-01T18:27:21+5:302025-05-01T18:36:00+5:30
Wear nice, loose clothes while sleeping.. Check out these patterns that will look great : झोपताना घालण्यासाठी मस्त ड्रेस पॅटर्न. दिसतीलही सुंदर आणि राहालही आरामात.

रात्री झोपताना कपडे अगदी सुटसुटीत आणि त्वचेसाठी चांगलेच वापरायला हवे. कपड्यांमुळे त्वचेला त्रास होईल किंवा आराम मिळणार नाही असे कपडे झोपताना वापरूच नयेत.
दिवसभर लोकांच्या अवतीभवती असताना व्यवस्थित टापटीप कपडे आपण वापरतो. मग कधी ड्रेसकोड फॉलो करताना आपल्याला आरामदायी न वाटणारे कपडेही वापरावे लागतात. मात्र झोपताना तसे काही नाही. आवडतील आणि आराम मिळेल असेच कपडे वापरायचे.
अनेक महिला झोपताना गाऊन घालतात. मोकळा असा गाऊन फार कम्फर्टेबल असतो. गाऊन घातल्यावर शरीराजवळ हवा खेळती राहते. त्यामुळे घाम येत नाही.
आजकाल शॉर्ट गाऊनची फॅशन आहे. कॉटनचे शॉर्ट गाऊन दिसतातही छान आणि फार कम्फर्टेबल असतात.
टिशर्ट आणि शॉर्ट पॅन्ट हा फार कॉमन असा नाईट सुट आहे. अनेक जणी हा प्रकार वापरतात.
नाईट ड्रेस म्हटल्यावर असा वन पीस असायलाच हवा. तरुण मुली आजकाल हा पॅटर्न मोठ्या प्रमाणावर वापरतात. त्यामध्ये छान रंग व डिझाइन असतात.
नाईट ड्रेस पॅटर्नमध्ये असे शर्ट पॅन्टचे सेट भरपूर चालतात. त्यांना चांगलीच मागणी असते.
पॉकेट गाऊन हा सध्या ट्रेंडिंग आहे. गाऊनला एक खिसा असतो, ज्यामध्ये मोबाइल राहिल एवढी जागा असते.
थंडीच्या दिवसांमध्ये किंवा फिरायला जाताना वापरण्यासाठी थ्री पीस नाईट सुट हा प्रकार नक्कीच मस्त आहे. कॉटनच्या कापडाचा हा ड्रेस दिसतोही छान.
नाईट ड्रेसमध्ये कफ्तान हा पॅटर्न फार लोकप्रिय आहे. दिसायला अगदी क्लासिक आहे तसेच मोकळा व सुटसुटीत आहे.