नवरात्रात घाला ७ ड्रेस , बिनधास्त खेळा गरबा-तुफान नाचा-होणार नाही गरम-वाटेल कम्फर्टेबल
Updated:September 24, 2025 13:39 IST2025-09-24T13:32:38+5:302025-09-24T13:39:18+5:30
Wear 7 dresses during Navratri, play Garba- dance without any hesitation, you will feel comfortable : नवरात्रीच्या दिवसांसाठी खास ड्रेस. पाहा काय वापरणे ठरेल आरामदायी.

नवरात्रीमध्ये काय कपडे घालायचे असा प्रश्न पडला आहे? फक्त घागराच नाही तर इतरही काही पॅटर्न आहेत जे सुंदर दिसतात. तसेच नंतरही वापरता येतात. एकदम आरामदायी असतात. पाहा कोणते पॅटर्न आहेत.
पायघोळ असा सिंगल ड्रेस फार सुंदर दिसतो. नवरात्री नंतरही वापरु शकता. गडद रंगाचा असेल तर उत्तम दिसेल.
गरबा खेळताना अगदी आरामदायी ठरेल असा हा ड्रेस नक्की पाहा. धोती आणि शॉर्ट कुर्ती हे कॉम्बिनेशन सुंदरच दिसते.
जॉकेट, टॉप आणि स्कर्ट हा प्रकार एकदम मस्त दिसतो. वापरालाही सोपा असतो. तसेच दिसतोही सुंदर.
सिंपल प्लेन स्कर्ट त्यावर रंगीत टॉप हा पेहराव नवरात्रीसाठी एकदम उठावदार ठरेल.
पायापाशी कट असलेला अनारकली नाचताना एकदम कम्फर्टेबल ठरेल. फार मस्त प्रकार आहे.
अनारकली ड्रेसला छान घेर असतो. त्यामुळे तो गरब्यासाठी किंवा नवरात्रीच्या दिवसात वापरण्यासाठी एकदम मस्त आहे.
नवरात्रीसाठी खास शॉर्ट कुर्तीचा पॅटर्न मिळतो. खाली जिन्सही घालू शकता. तसेच एखादी कॉटर्नची पॅण्टही सुंदर दिसते.