Join us   

बॉलीवूड अभिनेत्रींसारखं स्टायलिश ब्लाऊज शिवायचंय? मग या लेटेस्ट फॅशनच्या बाह्यांचे प्रकार पाहून घ्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2024 12:27 PM

1 / 7
लग्नसराईसाठी एकदम लेटेस्ट फॅशनचं स्टायलिश ब्लाऊज शिवायचं असेल तर ब्लाऊजच्या बाह्यांचे हे नवनविन प्रकार पाहून घ्या...
2 / 7
आपल्या ब्लाऊजचा गळा आणि बाह्या आपण कशा शिवतो, यावर ते ब्लाऊज किती फॅशनेबल आहे किंवा सर्वसाधारण लूक देणारं आहे हे ठरतं. त्यामुळे तुमचा लूक थोडा बदलायचा असेल, लग्नसराईसाठी थोडा स्टायलिश लूक पाहिजे असेल तर थोड्या वेगळ्या पद्धतीने ब्लाऊजच्या बाह्या शिवून पाहा.
3 / 7
ब्लाऊजचा हा जो प्रकार आहे त्याला बिशोप ब्लाऊज म्हणतात. यात तुम्ही बाह्यांची लांबी कोपऱ्यापर्यंतही घेऊ शकता.
4 / 7
हा कोल्ड शोल्डर स्लिव्ह्ज ब्लाऊजच प्रकारही सध्या ट्रेण्डिंग आहे. तुम्ही लेहेंग्यासाठीही असं ब्लाऊज शिवू शकता. यामध्ये बाह्यांची लांबी तुमच्या आवडीनुसार कितीही ठेवता येते.
5 / 7
याला बटरफ्लाय ब्लाऊज असं म्हटलं जातं.
6 / 7
अशा पद्धतीच्या केप स्लिव्ह्ज ब्लाऊजचीही सध्या खूप फॅशन आहे. हल्ली वन पीसला देखील असा लूक देतात.
7 / 7
या ब्लाऊजच्या बाह्यांचा जो प्रकार आहे त्याला लाँग स्लिव्ह्ज विथ रफल असं म्हणतात.
टॅग्स : फॅशनसाडी नेसणे