तुमचीच चर्चा! रिसेप्शन पार्टीत दिसाल क्लासी-एलिगंट, पाहा ड्रेसचे ट्रेण्डी कलेक्शन...
Updated:February 24, 2025 17:52 IST2025-02-24T17:34:19+5:302025-02-24T17:52:45+5:30
Trendy Reception Party Outfits for Women: Stylish Dresses for Wedding Reception: Latest Trends for women's Reception Party Attire: How to Dress for a Reception Party: Reception Party Look: Best Reception Party Dress Ideas 2025: Perfect Reception Outfits: जर आपल्यालाही लग्नानंतर रिसेप्शन पार्टीसाठी जायचे असेल तर या काही ट्रेण्डी ड्रेसने आपण आपल्या सौंदर्यात भर घालू शकतो.

सध्या लग्नसराईचा काळ सुरु आहे. लग्न म्हटलं की संगीत, हळद , रिसेप्शन अशा बऱ्याच गोष्टी असतात. लग्नापूर्वीच्या विधींसाठी आपण बऱ्यापैकी तयारी केलेली असते. पण प्रश्न उरतो तो लग्नानंतरच्या विधींचा. (Stylish Dresses for Wedding Reception)
जर आपल्यालाही लग्नानंतर रिसेप्शन पार्टीसाठी जायचे असेल तर या काही ट्रेण्डी ड्रेसने आपण आपल्या सौंदर्यात भर घालू शकतो. (Latest Trends for women's Reception Party Attire)
योक सिक्विन सूट हा आपल्या गोऱ्या रंगावर शोधून दिसेल. यासाठी लाल आणि सोनेरी रंगाच्या कॉम्बिनेशन फार सुंदर दिसेल. अनारकली कॅल्फ-लेंथ कुर्ती पार्टीमध्ये नवीन लूक देईल. यावर प्रिंटेड टेपिंग बॉर्डर असेल अशी ओढणी आपण निवडायला हवी.
लग्नानंतर नववधुला अनेकदा पिवळा रंग घालायला सांगितला जातो. त्यासाठी आपण पिवळ्या रंगाचा बांधणी एम्ब्रॉडरी सूट आपण परिधान करु शकतो. स्टाईल करायचे झाल्यास आपण व्ही-नेक डिजाइन केलेला त्याच रंगाचा कुर्ता आणि पायजामा घालू शकतो. यावर भरलेला प्रिंटेंड ओढणी घेऊ शकता.
तुम्हाला पार्टीत उठून दिसायचे असेल तर पेस्टल चंदेरी सूट आपण घालू शकतो. यामध्ये आपण वी नेक असलेला कुर्ता आणि त्याच रंगाची पॅन्ट घातल्यास आपल्या लूकमध्ये भर पडेल.
आपल्याला जर रिस्पेशन पार्टीत जायचं असेल तर वाइन रंग हा सगळ्यात उठून दिसू शकतो. यावर आपण सोनेरी रंगाचे भरतकाम केलेला लॉग कुर्ता, जरीच्या डिटेलिंगसह जुळणारी पॅन्ट आणि ओढणी छान दिसेल.
बनासरी सूट हा सगळ्यात आकर्षक दिसणारा सूट आहे. जो लग्न समारंभात अधिक भारी दिसतो. गुलाबी आणि जांभाळ्या रंगाच्या कॉम्बिनेशन सूटमध्ये व्ही-नेक, एम्ब्रॉयडरी केलेला असेल तुमच्या सौंदर्याला चार चांद लावेल.