गौरीगणपतीसह सणावाराला सिल्कची साडी नेसणार? ७ टिप्स - सिल्कच्या साड्या कायम राहतील नव्यासारख्या...
Updated:August 8, 2025 10:05 IST2025-08-08T10:00:00+5:302025-08-08T10:05:02+5:30
Tips and Tricks for Silk Saree Maintenance : How to Take Care of Silk Sarees at Home : Silk Saree Storage Tips : Do's and Don'ts for Silk Saree Care : सणावाराला नेसलेल्या महागड्या सिल्कच्या साड्या खराब होऊ नये म्हणून ७ टिप्स..

श्रावण महिन्यातील सणावाराला हमखास ठेवणीतल्या साड्या (Tips and Tricks for Silk Saree Maintenance) कपाटातून काढून मोठ्या हौसेनं आपण नेसतो. यातही विशेषतः सिल्कची साडी ( Silk Saree Storage Tips) असेल तर मग ती महागामोलाची साडी अगदी जपून वापरावी लागते. सणावारानिमित्ताने, अशा महागामोलाच्या भरजरी साड्या नेसायच्या म्हणजे जरा टेंन्शनच येत. साडीवर कुठे काही डाग पडला किंवा ती खराब झाली तर असा विचार मनात येतो. सिल्कसारख्या नाजूक कापडाची योग्य प्रकारे काळजी घेतली नाही, तर त्याचा रंग, चमक आणि टिकाऊपणा लवकरच कमी होऊ शकतो.
यासाठीच, सिल्क साडीची दीर्घकाळापर्यंत चकाकी आणि नाजूकपणा जपण्यासाठी (How to Take Care of Silk Sarees at Home) काही खास उपाय करणे गरजेचे असते. सिल्क साड्यांची काळजी कशी घ्यावी, ज्यामुळे तुमच्या साड्या वर्षानुवर्षे नव्यासारख्या दिसतील.
१. सिल्क साडीला कधीही लोखंडी हँगरवर टांगून ठेवू नका, कारण हँगरला गंज लागल्यास साडीवर डाग पडून ती खराब होऊ शकते. जर साडी टांगून ठेवायची असेल, तर प्लास्टिक किंवा लाकडी हँगरचा वापर करावा.
२. सिल्कची साडी कधीही प्लास्टिकच्या पिशवीमध्ये गुंडाळून ठेवू नये, कारण त्यामुळे कापडात ओलावा येतो आणि साडीवरील जरीच काम खराब होण्याची शक्यता असते. साडी नेहमी सूती पिशवीत किंवा कॉटन कपड्यात गुंडाळूनच ठेवावी.
३. साड्या कधीही कपाटाच्या सर्वात खालच्या भागात किंवा इतर साड्यांच्या ढिगाऱ्याखाली दाबून ठेवू नयेत, कारण त्यामुळे सिल्क साडीवर रेषा आणि सुरकुत्या पडून साडी खराब होते. दर २ ते ३ महिन्यांनी साडीची घडी बदलत राहावी, जेणेकरून कापड नीट आणि व्यवस्थित राहील.
४. सिल्क साडी वारंवार ड्राय क्लीन केल्यास तिची चमक कमी होते. त्यामुळे साडी वापरुन झाल्यानंतर हलक्या ओलसर कपड्याने साफ करून २ ते ३ दिवस सावलीत वाऱ्यावर वाळवावी. यामुळे साडीला वारंवार ड्राय क्लीनला देण्याची गरज भासणार नाही आणि तिची चमक टिकून राहील.
५. सिल्कच्या साडीवर कधीही अल्कोहोलयुक्त परफ्यूम स्प्रे करु नये, कारण यामुळे साडीचे कापड व जरी दोन्ही खराब होऊ शकते. साडी वर्षानुवर्षे नीट ठेवायची असेल, तर अल्कोहोल फ्री परफ्यूम किंवा सौम्य अत्तराचा वापर करावा.
६. साडीला कधीही प्रखर सूर्यप्रकाशात वाळवू नये, कारण यामुळे साडीचा रंग फिका पडतो आणि कापडही कमजोर होते. विशेषतः साडी वापरल्यानंतर स्वच्छतेसाठी ती सावलीत किंवा फक्त हवेशीर ठिकाणीच वाळवावी.
७. साडीला खूप दिवस एकाच पद्धतीची घडी घालून ठेवू नका. दर काही महिन्यांनी साडी बाहेर काढून तिला थोडा वेळ हवेशीर जागेत वाळवा आणि नंतर घडी बदलून पुन्हा व्यवस्थित ठेवा. यामुळे साडीचे कापड आणि त्याची तिची चमक कायम चांगली टिकून राहते.