ब्रायडल लेहेंगा खरेदी करताना हे ६ रंग नक्की पाहाच, दिसाल सुंदर - मिळेल परफेक्ट नववधू लूक!
Updated:December 29, 2024 08:48 IST2024-12-29T08:36:54+5:302024-12-29T08:48:16+5:30
The Best Colours For Your Bridal Lehenga : Top 6 Bridal Lehenga Colors That Will Make You Blush : Top 6 Trending Lehenga Colours For Bride : Top 6 Trending Lehenga Colours This Wedding Season : जर तुमचे यंदा कर्तव्य असेल तर लेहेंगा खरेदी करताना हे ६ रंग नक्की पाहा...

डिसेंबर महिना म्हटलं की 'वेडिंग सिझन'. ज्यांची लग्न ठरली आहेत त्यांची खरेदीची लगबग सुरू असतेच. सध्या लग्नाच्या रिसेप्शनसाठी लेहेंगा घालण्याच्या नवा ट्रेंड पुढे येत आहे. यानुसार, यंदाच्या लग्नसराईत ब्रायडल लेहेंगा खरेदी करत असताना नेमकं कोणत्या रंगाच्या लेहेंग्याची निवड करावी ते पाहूयात.
१. पेस्टल शेडस :-
सध्याच्या ट्रेंडनुसार लेहेंग्यामध्ये पेस्टल शेड्सला अधिक पसंती दर्शवली जाते. पारंपारिक रंगांपासून दूर राहून काहीतरी नवीन करून पहायचे असेल, तर पेस्टल शेड्स तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहेत. बेबी पिंक, मिंट ग्रीन, सी ग्रीन, सॉफ्ट पिंक, सॉफ्ट ग्रे आणि लॅव्हेंडरसारख्या पेस्टल शेड्स आजकाल नववधूंची पहिली पसंती बनत आहेत. हे रंग हलके, मऊ आणि आकर्षक आहेत, जे लग्नाच्या दिवशी सुंदर आणि क्लासी लुक देतात.
२. डार्क रंग :-
जर तुम्हाला लग्नात रॉयल लुक हवा असेल तर तुम्ही डीप वाईन आणि मार्सलासारखे गडद रंग निवडू शकता. हे रंग अतिशय मोहक दिसतात. हे रंग विशेषतः रात्रीच्या रिसेप्शन पार्टीसाठी अगदी शोभून दिसतात. या रंगीत लेहेंग्यावर सिल्व्हर किंवा गोल्डन वर्कमुळे ते आणखीनच आकर्षक आणि सुंदर लूक देतात.
३. लाल रंग :-
लेहेंग्यामध्ये लाल रंग हा नेहमीच नववधूंचा सर्वात आवडता रंग आहे. हा रंग म्हणजे पारंपारिक आणि ट्रेंडिंग दोन्हीचे उत्तम उदाहरण आहे. लाल एक क्लासी रंग आहे जो सर्वांवर उठून दिसतो. लाल आणि गोल्डन रंग जेव्हा एकत्र येतो तेव्हा तो लुक नक्कीच रॉयल दिसू शकतो.
४. रूबी रेड किंवा केशरी रंग :-
लाल आणि थोड्या डार्क रंगाची शेड नको असेल तर तुम्ही रूबी रेडचा वापर लेहंग्यासाठी करू शकता. आजकाल रूबी रेडसोबत केशरी रंगाच्या कॉम्बिनेशनचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. कारण हा लुक अतिशय क्लासिक आणि हटके दिसतो.
५. मस्टर्ड आणि फॉरेस्ट ग्रीन रंग :-
मस्टर्ड आणि फॉरेस्ट ग्रीन रंगाचे कॉम्बिनेशन तुमच्या वेडिंग लेहंग्यामध्ये अतिशय उठून दिसेल.
६. गोल्डन रंग :-
गोल्डन रंगाचा लेहेंगा लग्नाच्या दिवशी एक अनोखा आणि ग्लॅमरस लुक तुम्हाला देऊ शकतो. या रंगामुळे तुमचे सौंदर्य आणि आत्मविश्वास दोन्ही वाढतो. या ट्रेंडिंग रंगांचा वापर करून तुम्ही तुमचा खास दिवस आणखी अविस्मरणीय बनवू शकता.