इंडो - वेस्टर्न ब्लाऊजचे १० स्टायलिश पॅटर्न! सणउत्सवात दिसाल इतक्या सुंदर की हटणार नाही तुमच्यावरुन नजर...
Updated:August 26, 2025 17:00 IST2025-08-26T16:40:46+5:302025-08-26T17:00:38+5:30
Stylish Indo-Western Blouse Patterns : Must have Indo-Western saree blouse looks this festive season : indo western saree blouse designs : trendy blouse styles for festive season : साडीला नवा आणि स्टायलिश लूक देण्यासाठी आपण हटके स्टाईलच्या इंडो-वेस्टर्न ब्लाऊजचा पर्याय निवडू शकतो.

सण-समारंभ म्हटलं की साडी नेसणं आलंच. पारंपरिक साडी नेसून आपण सुंदर दिसतोच, पण त्याच त्याच पॅटर्नच्या ब्लाऊजमुळे काहीवेळा लुक कंटाळवाणा वाटू शकतो. अशावेळी साडीला एक नवा आणि स्टायलिश लुक (Stylish Indo-Western Blouse Patterns) देण्यासाठी आपण हटके स्टाईलच्या इंडो-वेस्टर्न ब्लाऊजचा पर्याय निवडू शकतो.
इंडो-वेस्टर्न पॅटर्नचे ब्लाऊज पारंपरिक आणि आधुनिक फॅशनचा (Must have Indo-Western saree blouse looks this festive season) अनोखा संगम साधतात, ज्यामुळे आपलं व्यक्तिमत्त्व अधिक आकर्षक दिसतं.
साडीला एक वेगळा ट्विस्ट देण्यासाठी आणि सणावाराला (indo western saree blouse designs) चारचौघीत उठून दिसण्यासाठी इंडो-वेस्टर्न ब्लाऊज नक्की ट्राय करू शकता. या ब्लाऊजचे काही खास प्रकार आणि स्टाईल्स पाहूया, जे तुमच्या साडीला एकदम हटके लुक देतील.
इंडो-वेस्टर्न ब्लाऊज हे आपल्या नेहमीच्या ब्लाऊजपेक्षा थोडे वेगळे आणि हटके व स्टायलिश फॅशनचे असतात. नेहमीचे तेच ते पारंपरिक पद्धतीचे ब्लाऊज घालण्यापेक्षा आपण अशा प्रकारचे इंडो-वेस्टर्न स्टाईलचे ब्लाऊज सणावाराला घालू शकतो. यात कॉलर पॅटर्न किंवा गळ्याला व हाताला फ्रिल असलेले तसेच ऑफ शोल्डर अशा पॅटर्नची आगळीवेगळी स्टाईल असते.
इंडो - वेस्टर्न ब्लाऊज पॅटर्न म्हटलं की त्यात वेगवेगळे प्रकार येतात. त्यापैकीच हा जॅकेट ब्लाऊज हा एक प्रकार. यात आपण ब्लाऊज घालून त्यावर अशा प्रकारचे एखादे साडीच्या रंगाला मॅच होणारे किंवा कॉन्ट्रास्ट रंगाचे देखील जॅकेट घालू शकता.
आपण साडीवर असे कॉलर असणारे किंवा दिसताना शर्ट सारखे दिसणारे इंडो - वेस्टर्न पॅटर्नचे ब्लाऊज देखील नक्की ट्राय करु शकतो.
इंडो - वेस्टर्न ब्लाऊजचे आणखीही काही स्टायलिश व हटके पॅटर्न. अशा प्रकारच्या ब्लाऊजमुळे तुमचा साडी लूक इतरांपेक्षा अधिक उठून नक्कीच दिसेल.
साडीवर नेहमीचे तेच ते गोल, चौकोनी गळ्याचे ब्लाऊज घालण्यापेक्षा असे इंडो - वेस्टर्न स्टाईलचे ओव्हर लॅपिंग ब्लाऊज सध्या भलतेच ट्रेंडमध्ये आहेत. ब्लाऊजचा पुढचा भाग हा ओव्हर लॅप केलेला असतो, पदर पिनअप करुन त्यावर अशा प्रकारे ब्लाऊज ओव्हर लॅप केला जातो.
साडीवर अशा प्रकारचं एखाद छान लेअरिंग असणारं ब्लाऊज देखील परफेक्ट मॅच होत. सणवार, खास प्रसंगी जर हटके स्टायलिश, फॅशन करायची असेल तर असं लेअरिंग ब्लाऊज नक्की वापरुन पाहा.
बंद गळ्याचे, नेटेड पॅटर्नचे अशा प्रकारचे इंडो - वेस्टर्न ब्लाऊज देखील साडीवर अधिक जास्त खुलून दिसतात व तुमचा लूक उठावदार दिसतो.
इंडो - वेस्टर्न स्टाईलचे असे एकापेक्षा एक हटके स्टायलिश पॅटर्नचे ब्लाऊज आपण यंदाच्या सणावाराला नक्की ट्राय करु शकतो.