आकाशीची चंद्रकोर जशी ! चंद्रकोर पॅटर्नच्या दागिन्यांचा रुबाब भारी - फक्त टिकलीच नाही; दागिनेही सुंदर...
Updated:March 27, 2025 15:49 IST2025-03-27T15:32:25+5:302025-03-27T15:49:04+5:30
Chandrakor Design Jewellery : Stunning Maharani Designer Chandrakor Jewellery : सध्या चंद्रकोर पॅटर्नच्या दागिन्यांचा ट्रेंड फेमस आहे, गुढीपाडव्या निमित्त तुम्ही हे दागिने ट्राय करु शकता...

पारंपरिक, मराठमोळा लूक म्हटलं की (Chandrakor Design Jewellery) आपल्याला 'चंद्रकोर' आठ्वतेच. सुंदर साडी, त्यावर दागिने आणि कपाळी शोभून दिसेल अशी चंद्रकोर (Stunning Maharani Designer Chandrakor Jewellery) टिकली म्हणजे तुमचा देखणा लूक तयार झालाच. परंतु आता ही चंद्रकोर पॅटर्न फक्त टिकली पुरताच मर्यादित न राहता, केसांतील खोप्यापासून ते पायातील पैंजणांपर्यंत अनेक वेगवेगळ्या दागिन्यांच्या स्वरुपात पाहायला मिळते.
यंदाच्या तुमच्या गुढीपाडवा लूकसाठी तुम्ही देखील चंद्रकोर स्वरुपातील हे नवे दागिने नक्की घालून ट्राय करु शकता.
तुम्ही तुमच्या हेअरस्टाईलमध्ये अशा प्रकारच्या चंद्रकोर आकारातील पिना लावून तुमची हेअर स्टाईल अधिकच आकर्षक करु शकता.
केसांचा जर खोपा घातला असेल तर या खोप्यावर अशी अर्धी चंद्रकोर खूपच शोभून दिसते.
तुम्ही अशा प्रकारे गळ्याभोवती घट्ट बसणारा एखादा छोटा चंद्रकोर डिझाईनचा नेकलेस देखील घालू शकता.
जर तुम्हाला गळ्यात ठुशी घालायची नसेल तर तुम्ही अशा प्रकारे नवीन पॅटर्नची चंद्रकोर पेंडंट असणारी नव्या डिझाईनची ठुशी नक्की ट्राय करु शकता.
कोल्हापुरी साजमध्ये देखील चंद्रोकर पेंडंट अतिशय उठून आणि ठसठशीत दिसते. चंद्रकोर पॅटर्नचा कोल्हापुरी साज कोणत्याही साडीवर शोभून दिसतो.
चंद्रकोर पेंडंट असलेली ही छोटी माळ लहान मुलींना देखील घालता येऊ शकते.
जर तुम्हाला गळ्यात लांब दागिना घालायचा असेल, तर ही अशा प्रकारची चंद्रकोर पेंडंट असणारी लांब माळ तुम्ही गळ्यात घालू शकता.
चंद्रकोर आकारातील वेगवेगळ्या पॅटर्नचे पेंडंट असलेले मंगळसूत्र देखील कोणत्याही साडीवर घालू शकता. यात चंद्रकोर पेंडंट असलेले लांब किंवा छोटे अशा दोन्ही प्रकारातील मंगळसूत्र उठून दिसते.
चंद्रकोर पेंडंट असणारी ही माळ लहान मुलींपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्याचजणी घालू शकता.
चंद्रकोर आकारातील वेगवेगळ्या प्रकारचे कानातल्यांचे प्रकार देखील एक से बढकर एक आकर्षक असतात.
चंद्रकोर आकारातील बुगडी तुम्हाला एकदम पारंपरिक लूक देईल.
हातात देखील तुम्ही अशा प्रकारचे पॅटर्न असणाऱ्या चंद्रकोर डिझाईन्सच्या बांगड्या किंवा कड घालू शकता.