साऊथ इंडियन 'गुट्टापुसालू' हाराचे मनमोहक डिझाईन्स पाहून पडाल प्रेमात! 'शाही' दागिना साध्या लुकलाही देईल उठावदारपणा...

Updated:December 25, 2025 11:35 IST2025-12-25T11:30:30+5:302025-12-25T11:35:01+5:30

South indian guttapusalu necklace design : guttapusalu traditional necklace : लग्नसमारंभ, सण-उत्सव किंवा खास कार्यक्रमांसाठी गुट्टापुसालु हार महिलांच्या सौंदर्यात चारचांद लावतो...

साऊथ इंडियन 'गुट्टापुसालू' हाराचे मनमोहक डिझाईन्स पाहून पडाल प्रेमात! 'शाही' दागिना साध्या लुकलाही देईल उठावदारपणा...

दाक्षिणात्य दागिन्यांचा विचार केला की, डोळ्यासमोर येते ती शाही परंपरा आणि (guttapusalu traditional necklace) आकर्षक, सुंदर कलाकुसर. त्यापैकीच एक म्हणजे 'गुट्टापुसालू' (Guttapusalu) हार. हा दागिन्यांचा प्रकार सध्या लग्नसराईत आणि सणासुदीला महिलांची पहिली पसंती ठरत आहे.

साऊथ इंडियन 'गुट्टापुसालू' हाराचे मनमोहक डिझाईन्स पाहून पडाल प्रेमात! 'शाही' दागिना साध्या लुकलाही देईल उठावदारपणा...

दागिन्यांची फॅशन येते आणि जाते, पण काही पारंपरिक दागिने मात्र काळाच्या ओघात (South indian guttapusalu necklace design) अधिकच खुलून दिसतात. दाक्षिणात्य संस्कृतीतील 'गुट्टापुसालू' हा अशाच एका शाही दागिन्यांचा प्रकार! 'गुट्टा' म्हणजे थवा आणि 'पुसालू' म्हणजे मणी किंवा मोती. मोत्यांच्या नाजूक घोसांनी मढवलेला हा हार कोणत्याही साध्या साडीलाही राजेशाही लूक देतो. अलीकडे अनेक सेलिब्रिटींनीही या दागिन्याला पसंती दिली आहे. चला तर मग, पाहूया गुट्टापुसालू नेकलेसचे काही ट्रेंडिंग डिझाइन्स, जे पाहून तुम्हीही या दागिन्यांच्या प्रेमात पडाल!"

साऊथ इंडियन 'गुट्टापुसालू' हाराचे मनमोहक डिझाईन्स पाहून पडाल प्रेमात! 'शाही' दागिना साध्या लुकलाही देईल उठावदारपणा...

दक्षिण भारतीय पारंपरिक दागिन्यांमध्ये Guttapusalu हार किंवा नेकलेसला एक वेगळीच ओळख आहे. मोत्यांच्या सुंदर मण्यांनी सजलेला हा हार राजेशाही आणि एलिगंट लूक देतो. लग्नसमारंभ, सण-उत्सव किंवा खास कार्यक्रमांसाठी गुट्टापुसालु हार महिलांच्या सौंदर्यात चारचांद लावतो. पारंपरिक डिझाइनसोबतच आता याचे मॉडर्न टच असलेले प्रकारही ट्रेंडमध्ये आहेत.

साऊथ इंडियन 'गुट्टापुसालू' हाराचे मनमोहक डिझाईन्स पाहून पडाल प्रेमात! 'शाही' दागिना साध्या लुकलाही देईल उठावदारपणा...

हा लांब हार विशेषतः कांजिवरम किंवा पैठणी साडीवर अतिशय सुंदर दिसतो. सोन्याच्या नाजूक नक्षीवर मोत्यांचे असंख्य घोस या हाराचे मुख्य आकर्षण असतात.

साऊथ इंडियन 'गुट्टापुसालू' हाराचे मनमोहक डिझाईन्स पाहून पडाल प्रेमात! 'शाही' दागिना साध्या लुकलाही देईल उठावदारपणा...

लक्ष्मी किंवा देवीदेवतांच्या कोरीव नक्षीसोबतच मोत्यांनी सजवलेला टेम्पल टच असलेला गुट्टापुसालू हार खास कार्यक्रम, विशेष प्रसंग किंवा लग्नसमारंभात तुमचा साधासुधा लूक देखील अधिक आकर्षक आणि सुंदर दिसण्यास मदत करतो.

साऊथ इंडियन 'गुट्टापुसालू' हाराचे मनमोहक डिझाईन्स पाहून पडाल प्रेमात! 'शाही' दागिना साध्या लुकलाही देईल उठावदारपणा...

फक्त मोतीच नाही, तर यात लाल माणिक आणि हिरवे पाचू (Emerald) यांचा वापर करून तो अधिक रंगतदार बनवला जातो. यामुळे साडीच्या रंगाशी जुळणारे दागिने निवडणे सोपे होते.

साऊथ इंडियन 'गुट्टापुसालू' हाराचे मनमोहक डिझाईन्स पाहून पडाल प्रेमात! 'शाही' दागिना साध्या लुकलाही देईल उठावदारपणा...

ज्यांना खूप जड किंवा हेव्ही दागिने आवडत नसतील, त्यांच्यासाठी हा नाजूक प्रकार उत्तम आहे. फॉर्मल साड्या किंवा सिल्क ड्रेसवर हा नेकलेस उठून दिसतो.

साऊथ इंडियन 'गुट्टापुसालू' हाराचे मनमोहक डिझाईन्स पाहून पडाल प्रेमात! 'शाही' दागिना साध्या लुकलाही देईल उठावदारपणा...

गुट्टापुसालू हारासोबत येणारे जडाऊ कानातले किंवा झुमके तुमचा संपूर्ण लूक पूर्ण करतात. हाराप्रमाणेच कानातल्यांनाही खालच्या बाजूला मोत्यांची झालर असते.

साऊथ इंडियन 'गुट्टापुसालू' हाराचे मनमोहक डिझाईन्स पाहून पडाल प्रेमात! 'शाही' दागिना साध्या लुकलाही देईल उठावदारपणा...

एकापेक्षा अधिक लेअर्समध्ये मोत्यांची रचना असलेला भव्य आणि रिच लूक देणारा गुट्टापुसालू हार तुमचा लूक अधिकच खास करतो.

साऊथ इंडियन 'गुट्टापुसालू' हाराचे मनमोहक डिझाईन्स पाहून पडाल प्रेमात! 'शाही' दागिना साध्या लुकलाही देईल उठावदारपणा...

गुट्टापुसालू हार घालताना कानातले खूप मोठे असतील तर गळ्यात फक्त हार घालावा आणि इतर दागिने कमीत कमी ठेवावेत, जेणेकरून या दागिन्याचा भव्यपणा उठून दिसेल.