साध्या साडीलाही द्या मॉडर्न टच! पहा स्लिव्हलेस ब्लाऊजचे ७ लेटेस्ट, हटके डिझाईन्स - साडीवर शोभून दिसतील खास...
Updated:December 27, 2025 18:42 IST2025-12-27T18:25:47+5:302025-12-27T18:42:02+5:30
Sleeveless blouse designs for simple saree : Stylish sleeveless blouse patterns : Latest sleeveless blouse designs : पारंपरिक ते मॉडर्न अशा वेगवेगळ्या पॅटर्नचे स्लिव्हलेस ब्लाऊज प्रत्येक साडीवर परफेक्ट मॅच होतात...

आपण साडी नेसल्यावर, साडीची खरी शोभा वाढते ती त्यावरील ब्लाऊजच्या पॅटर्नमुळेच... बदलत्या फॅशनसोबत साडीचे ड्रेपिंग आणि ब्लाऊज डिझाईनही सतत (Latest sleeveless blouse designs) अपडेट होत असते. सध्या स्लिव्हलेस ब्लाऊजची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते. साधी साडी असो किंवा डिझायनर साडी योग्य स्लिव्हलेस ब्लाऊज निवडल्यास संपूर्ण लूक ग्लॅमरस आणि एलिगंट दिसतो. पारंपरिक ते मॉडर्न अशा विविध पॅटर्नमध्ये उपलब्ध असलेले स्लिव्हलेस ब्लाऊज प्रत्येक वयोगटातील महिलांना सूट होतात.
आजकाल साडीमध्ये पारंपरिक लूकसोबतच मॉडर्न टच देण्याकडे महिलांचा कल (Sleeveless blouse designs for simple saree) वाढला आहे. यामध्ये 'स्लिव्हलेस ब्लाऊज' (Sleeveless Blouse) हा एक असा पर्याय आहे जो तुम्हाला झटपट ग्लॅमरस आणि स्टायलिश लूक मिळवून देतो. मग ती काठपदराची साडी असो, साधी शिफॉनची असो किंवा पार्टीवेअर नेटची; स्लिव्हलेस ब्लाऊज प्रत्येक प्रकारच्या साडीवर अगदी शोभून दिसतात.
जर तुम्हांला स्टायलिश, हटके आणि इतरांपेक्षा वेगळा खास लूक हवा असेल (Stylish sleeveless blouse patterns) तर वेगवेगळ्या पॅटर्नचे स्लिव्हलेस ब्लाऊज नक्की ट्राय करायला हवेत.
१. हाय नेक स्लिव्हलेस ब्लाऊज :-
ज्यांना थोडा 'रॉयल' आणि 'एलिगंट' लूक हवा आहे, त्यांच्यासाठी हाय नेक स्लिव्हलेस ब्लाऊज उत्तम आहे. कॉटन किंवा सिल्कच्या साड्यांवर हा पॅटर्न खूप उठून दिसतो.
२. स्ट्रॅपी किंवा नूडल स्ट्रॅप ब्लाऊज :-
पार्टीवेअर किंवा शिफॉन साड्यांसाठी नूडल स्ट्रॅप ब्लाऊज सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. हे तुम्हाला एकदम बोल्ड आणि ग्लॅमरस लूक देतात. विशेषतः काळ्या किंवा चंदेरी रंगात हे अधिक सुंदर दिसतात.
३. हॉल्टर नेक स्लिव्हलेस ब्लाऊज :-
जर तुम्हाला तुमचे खांदे (Shoulders) फ्लॉन्ट करायचे असतील, तर हॉल्टर नेक हा एक उत्तम पर्याय आहे. हा पॅटर्न इंडो-वेस्टर्न साड्यांवर आणि कॉकटेल पार्टीसाठी परफेक्ट आहे.
४. डीप बॅक विथ नॉट :-
स्लिव्हलेस ब्लाऊजमध्ये पाठीचा भाग आकर्षक बनवण्यासाठी 'डीप नेक' आणि मागे छोटीशी 'गाठ' (Knot) असलेला पॅटर्न निवडा. हा लूक अतिशय फेमिनाईन आणि स्टायलिश दिसतो.
५. व्ही-नेक स्लिव्हलेस ब्लाऊज :-
व्ही-नेक डिझाईनमुळे मान अधिक लांब आणि बांधा सडपातळ दिसण्यास मदत होते. हे ब्लाऊज तुम्ही हेवी डिझायनर साड्यांपासून ते फ्लोरल प्रिंटेड साड्यांपर्यंत कशावरही या पॅटर्नचा ब्लाऊज स्टाईल करु शकता.
६. कॉर्सेट स्टाईल स्लिव्हलेस ब्लाऊज :-
कॉर्सेट फिट असलेले स्लिव्हलेस ब्लाऊज बॉडी शेपला सुंदर हायलाइट करतात. नेट किंवा ऑर्गेन्झा साडीवर हा पॅटर्न ट्रेंडी दिसतो.
७. प्लेन स्लिव्हलेस ब्लाऊज :-
कधी कधी साधेपणातच सौंदर्य असते. प्लेन, सॉलिड कलर स्लिव्हलेस ब्लाऊज प्रिंटेड किंवा हेवी साड्यांसोबत बेस्ट कॉम्बिनेशन ठरतात.