सोन्याहून सुंदर...डेली वेअरसाठी चांदीचे १० 'रॉयल' कडा डिझाईन्स - हाताला देतील 'रॉयल' आणि 'ग्लॅमरस' लूक!

Updated:November 10, 2025 17:56 IST2025-11-10T17:39:37+5:302025-11-10T17:56:31+5:30

silver kada design for ladies : daily wear silver kada for women : ऑफिस, पार्टी, सण - समारंभ असो, १० चांदीचे कडा डिझाईन्स; कधीच खराब होणार नाहीत, हातांचे सौंदर्य दिसेल उठून...

सोन्याहून सुंदर...डेली वेअरसाठी चांदीचे १० 'रॉयल' कडा डिझाईन्स - हाताला देतील 'रॉयल' आणि 'ग्लॅमरस' लूक!

फॅशनच्या या बदलत्या ट्रेंडनुसार बहुतेक महिलांना नवनवीन एक्सेसरीज (daily wear silver kada for women) वापरायला आवडतात. सोन्याचे दागिने जरी खास प्रसंगासाठी असले तरी, स्त्रियांच्या डेली फॅशन आणि मिनिमल पण हटके लूकसाठी चांदीचे दागिने कायम ट्रेंडमध्येच राहिले आहेत. ऑफिस असो, कॉलेज असो किंवा छोटेखानी फंक्शन, सण समारंभ हातात एक आकर्षक सुंदर असा चांदीचा कडा घातल्याने तुमचा लूक लगेच 'एलिगंट' आणि कम्प्लीट होतो.

सोन्याहून सुंदर...डेली वेअरसाठी चांदीचे १० 'रॉयल' कडा डिझाईन्स - हाताला देतील 'रॉयल' आणि 'ग्लॅमरस' लूक!

चांदीच्या दागिन्यांचा ट्रेंड कधीच संपत नाही, उलट (silver kada design for ladies) दिवसेंदिवस वाढतोय. खासकरून स्त्रियांना डेली वेअरमध्ये हलके, क्लासी आणि आकर्षक दागिने घालायला आवडतात. त्यात हातांमध्ये एक कडा घालणे हा एक परफेक्ट पर्याय ठरतो. हे कडा ना फार जड वाटतात, ना फारच साध्या दिसतात, उलट प्रत्येक आउटफिटसोबत एलिगंट आणि स्टायलिश टच देतात. ऑफिस, कॉलेज, कॅज्युअल आऊटिंग किंवा फेस्टिव मूड चांदीचे कडा प्रत्येक प्रसंगी शोभून दिसतात.

सोन्याहून सुंदर...डेली वेअरसाठी चांदीचे १० 'रॉयल' कडा डिझाईन्स - हाताला देतील 'रॉयल' आणि 'ग्लॅमरस' लूक!

अशाच काही लेटेस्ट आणि क्लासिक चांदीच्या कड्यांचे डिझाईन्स पाहूयात, जे तुमच्या रोजच्या स्टाईलला एक नवा आणि रॉयल टच देतील.

सोन्याहून सुंदर...डेली वेअरसाठी चांदीचे १० 'रॉयल' कडा डिझाईन्स - हाताला देतील 'रॉयल' आणि 'ग्लॅमरस' लूक!

१. सुंदर, नाजूक असा क्रिस्टल ॲडजस्टेबल सिल्व्हर कडा तुमचा लूक अधिकच खास करु शकतो. 'ॲडजस्टेबल' असल्याने मापाची चिंता नसते, तसेच हातातून काढणे, घालणे सहज शक्य होते.

सोन्याहून सुंदर...डेली वेअरसाठी चांदीचे १० 'रॉयल' कडा डिझाईन्स - हाताला देतील 'रॉयल' आणि 'ग्लॅमरस' लूक!

२. हातातील चांदीच्या कड्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन असते. परंतु, साध्या आणि पातळ, नाजूक रेषेतील डिझाइन हातावर हलके वाटते आणि कोणत्याही ड्रेससोबत शोभून दिसते.

सोन्याहून सुंदर...डेली वेअरसाठी चांदीचे १० 'रॉयल' कडा डिझाईन्स - हाताला देतील 'रॉयल' आणि 'ग्लॅमरस' लूक!

३. फुलांची नक्षीदार डिझाइन असलेली ही कडी डेली वेअरसाठी अत्यंत शोभून दिसतात तसेच हातांचे सौंदर्य देखील वाढवतात.

सोन्याहून सुंदर...डेली वेअरसाठी चांदीचे १० 'रॉयल' कडा डिझाईन्स - हाताला देतील 'रॉयल' आणि 'ग्लॅमरस' लूक!

४. लहान कलर स्टोन्स असलेली चांदीची कडी तुमच्या रोजच्या लुकमध्ये थोडा हटके व ग्लॅमरस टच देतात.

सोन्याहून सुंदर...डेली वेअरसाठी चांदीचे १० 'रॉयल' कडा डिझाईन्स - हाताला देतील 'रॉयल' आणि 'ग्लॅमरस' लूक!

५. जर तुम्हांला मोती आणि चांदी यांच्या अनोख्या डिझाईन्सचे मस्त कॉम्बिनेशन हवे असल्यास आपण अशा प्रकारच्या डिझाईन मधील कडा तयार करून घेऊ शकता.

सोन्याहून सुंदर...डेली वेअरसाठी चांदीचे १० 'रॉयल' कडा डिझाईन्स - हाताला देतील 'रॉयल' आणि 'ग्लॅमरस' लूक!

६. या सर्व डिझाईन्सव्यतिरिक्त, तुम्ही या प्रकारचा सुंदर चांदीचा 'पीकॉक स्टाईल कडा' देखील तुमच्या हातात घालून हातांचे सौंदर्य वाढवू शकता. या कड्यामुळे तुम्ही तुमच्या संपूर्ण लूकला वेगळा आणि सुंदर टच देऊ शकता.

सोन्याहून सुंदर...डेली वेअरसाठी चांदीचे १० 'रॉयल' कडा डिझाईन्स - हाताला देतील 'रॉयल' आणि 'ग्लॅमरस' लूक!

७. आपण अशा प्रकारची पारंपरिक ट्रायबल नक्षी असलेली चांदीची कडी देखील नक्की ट्राय करु शकता, ज्यामुळे एथनिक लुक मिळतो.

सोन्याहून सुंदर...डेली वेअरसाठी चांदीचे १० 'रॉयल' कडा डिझाईन्स - हाताला देतील 'रॉयल' आणि 'ग्लॅमरस' लूक!

८. हा कडा अगदी पातळ आणि गुळगुळीत आहे, ज्यात कोणतीही नक्षी नाही. ऑफिस वेअरसाठी अत्यंत योग्य. एका हातात एक किंवा दोन कडे घातल्यास मिनिमलिस्ट लूक मिळतो.

सोन्याहून सुंदर...डेली वेअरसाठी चांदीचे १० 'रॉयल' कडा डिझाईन्स - हाताला देतील 'रॉयल' आणि 'ग्लॅमरस' लूक!

९. बारीक जाळीचे काम आणि कड्याच्या मधोमध छोटी फुल-नक्षी असते. जुन्या दागिन्यांसारखा 'ऑक्सिडाइज्ड' लूक असल्याने रोजच्या वापरासाठी परफेक्ट.

सोन्याहून सुंदर...डेली वेअरसाठी चांदीचे १० 'रॉयल' कडा डिझाईन्स - हाताला देतील 'रॉयल' आणि 'ग्लॅमरस' लूक!

१०. घुंगरू/मोती कॉम्बिनेशन असलेला कडा देखील तितकाच सुंदर दिसतो. हा कडा प्लेन असतो, पण कड्याच्या खालच्या बाजूला चांदीचे छोटे घुंगरू किंवा छोटे सफेद मोती लावलेले असतात. हा कडा साडी किंवा कुर्ता यावर खूप छान दिसतो.