Shravan Special : ऑफिसवेअरसाठी फ्लोरल प्रिटेंडचे खास कलेक्शन! ५ सुंदर डिझाइन्स, सखी विचारतील घेतल्या कुठून
Updated:August 4, 2025 19:05 IST2025-08-04T19:00:00+5:302025-08-04T19:05:02+5:30
best floral designs for women : Indian festive office wear: stylish office look for ladies: सणासुदीत जास्त भरलेल्या साड्या नेसायच्या नसतील तर या फ्लोरल प्रिटेंड साड्यांचे खास कलेक्शन पाहा.

सध्या फ्लोरल प्रिंट्स खूपच ट्रेंडी आहेत. सणासुदीत किंवा ऑफिसमध्ये साडी नेसायची असेल तर हलक्या-फुलक्या साड्या आपण ट्राय करतो. मुलींमध्येही फ्लोरल प्रिंटेड ड्रेसेस आणि सूट खूप लोकप्रिय आहेत. (best floral designs for women)
जर आपल्यालाही सणासुदीत जास्त भरलेल्या साड्या नेसायच्या नसतील तर या फ्लोरल प्रिटेंड साड्यांचे खास कलेक्शन पाहा. (Indian festive office wear)
गुलाबी रंग हा अनेकांना आवडतो. आपण या रंगाची फ्लोरल प्रिटेंड साडी नेसू शकतो. यावर आपण सिल्वर ज्वेलरी घालू शकतो.
आपण फ्लोरल प्रिटेंडमध्ये सूर्यफुलाची प्रिंट असलेली साडी नेसू शकतो. ही साडी एकदम हलकी-फुलकी आणि अगदी कमी वेळात नेसता येते.
हिरव्या रंगाची फ्लोरल प्रिटेंड साडी आणि त्यावर गुलाबी किंवा पांढऱ्या रंगाची फुले आपल्या सौंदर्यात भर घालतील.
सणसमारंभात लाल रंग अधिक वेळा घातला जातो. अशावेळी आपण फ्लोरल प्रिंट असलेली लाल साडी नेसू शकतो. यामुळे आपल्याला स्टायलिश लूक मिळेल.
आपल्याला काळा रंग अधिक आवडत असेल तर आपल्याला काळ्या रंगाची फ्लोरल प्रिंट साडी नेसता येईल. यावर पिवळ्या आणि काळ्या रंगाचे कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसते.