शिवजयंती विशेष : राजमाता पैठणीचे मनमोहक डिझाईन्स! ब्लाऊजवर चंद्रकोर आणि पदरावर तुतारी; अस्सल मराठमोळा साज!
Updated:February 18, 2026 18:56 IST2026-02-14T17:15:23+5:302026-02-18T18:56:54+5:30
Shiv Jayanti Special Rajmata Paithani : Rajmata Paithani saree for Shiv Jayanti : Maharashtrian Rajmata Paithani saree look : Rajmata Paithani blouse chandrakor design : शिवजयंतीच्या मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा पारंपरिक फोटोशूटसाठी खास राजमाता पैठणी...

Rajmata Paithani saree for Shiv Jayanti
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रभरात (Maharashtrian Rajmata Paithani saree look) मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरी केली जाते. महाराष्ट्राच्या इतिहासाचा, पराक्रमाचा आणि स्वाभिमानाचा अभिमानाने साजरा केला जाणारा हा उत्सव... या खास दिवशी पारंपरिक वेशभूषेला विशेष महत्त्व असते आणि महिलांमध्ये खास करून राजमाता पैठणी नेसण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो(Shiv Jayanti Special Rajmata Paithani).
ही पैठणी केवळ साडी नसून मराठी संस्कृतीचे प्रतीक मानली जाते. विशेष म्हणजे या पैठणीवर पारंपरिकतेसोबत इतिहासाची झलक दिसते.
ब्लाऊजवर आकर्षक चंद्रकोरची खास डिझाइन्स, तर पदरावर तुतारी आणि चंद्रकोर यांची भरजरी नक्षी या पैठणी साडीच्या सौंदर्यात अधिक भर घालते.
शिवजयंतीच्या उत्सवात अस्सल पारंपरिक, मराठमोळा लूक करण्यासाठी ही पैठणी महिलांची पहिली पसंती ठरत आहे.
राजमाता पैठणीचा सर्वात आकर्षक भाग म्हणजे ब्लाऊजवर केलेली चंद्रकोर नक्षी. गोलाईदार चंद्रकोर डिझाइन ब्लाऊजला रॉयल आणि एलिगंट लूक देते.
तुतारी हे विजय आणि उत्सवाचे प्रतीक मानले जाते. पदरावर विणलेली तुतारीची डिझाइन या साडीला अस्सल मराठमोळा, पारंपरिक टच देते.
या पैठणी साडीच्या पदरावर चंद्रकोर, पारंपरिक वेलबुट्टी आणि सोनसळी झरीकामामुळे पैठणी अधिक उठावदार दिसते.
जांभळा, मोरपंखी हिरवा, लाल, केशरी आणि निळसर रंगांमध्ये राजमाता पैठणी अधिक आकर्षक दिसते.
या साडीचा अस्सल मराठमोळा, पारंपरिक लूक आणि सुंदर डिझाइन यांचा सुंदर मिलाफ असल्यामुळे ही पैठणी तरुणींमध्येही फारच लोकप्रिय होत आहे.
पदर जितका भरजरी तितकी साडी अधिक रॉयल दिसते, त्यामुळे शिवजयंतीसारख्या ऐतिहासिक आणि पारंपरिक सणासाठी ही पैठणी विशेष योग्य ठरते.
अस्सल पारंपरिक दागिने, नाकात नथ, चंद्रकोर टिकली, ठुशी हार आणि बांगड्या यांसोबत ही पैठणी नेसल्यास पूर्ण मराठमोळा आणि राजमाता स्टाईल लूक सहज मिळतो.
शिवजयंतीच्या मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा पारंपरिक फोटोशूटसाठी राजमाता पैठणी आज महिलांची खास पसंती बनली आहे.