पायलें छुनमुन छुनमुन..! पाहा पैंजणाच्या ८ सुंदर डिझाइन्स-नाजूक आणि नजाकतीचा देखणा दागिना
Updated:April 7, 2025 15:10 IST2025-04-07T14:50:54+5:302025-04-07T15:10:17+5:30
See 8 beautiful designs of Painjana - a delicate and elegant piece of jewellery : पायांची शोभा वाढवणारा दागिना म्हणजे पैंजण. पाहा सध्या कोणत्या नव्या डिझाइन्स ट्रेंडींग आहेत.

अगदी जुन्या काळापासून स्त्री शृंगाराचा भाग म्हणून पैंजणाचा उल्लेख आपण ऐकत आलो आहोत. अनेक गांण्यामध्येही पैंजणांविषयी लिहिलेले आहे. इतर दागिन्यांइतकेच महत्व या पैंजणांना देखील आहे.
पायांची शोभा पैजणांमुळे वाढते. पाय अगदी नाजूक आणि छान दिसतात. मग ते पैंजण चांदीचेच असले पाहिजे असे नाही. आजकाल अनेक प्रकारच्या डिझाइन्सची पैंजणे बाजारात मिळतात.
फार महागही नसतात. तसेच दिसायलाही फार छान दिसतात. कोणत्याही आकाराच्या किंवा रंगाच्या पायांवर पैंजण उठूनच दिसतात. तुम्हाला कोणता पॅटर्न शोभेल त्यानुसार डिझाइन ठरवा.
पांढर्या रंगाचे साधे आणि फुलांचे डिझाइन सध्या फार लोकप्रिय आहे. नाजूक पायांवर ते खुलून दिसते.
पांढऱ्या रंगाचे पैंजण आणि मध्येच एक गडद रंगाचे डिझाइन फार छान दिसते.
मोराचे रंगीत असे डिझाइन आणि त्याच्या आजूबाजूला लहान घुंगरू हा पॅटर्न तसा जुनाच आहे. मात्र आजही ट्रेंडमध्ये आहे.
सिंगल पानाचे डिझाइन सगळ्या प्रकारच्या कपड्यांवर छान वाटते. वेस्टर्न कपड्यांवरही चांगलेच दिसते.
रंगीत एक फुल आणि फुलाला लहानसा खडा असा पॅटर्नही सध्या फार कॉमन आहे.
मोर आणि मागे त्याचा पिसारा असा हा पॅटर्न अगदीच युनिक आहे. रंगीबेरंगी तसेच फार क्लासिक लूक देणारा आहे.
लग्नसमारंभांसाठी छान भरलेले पैंजण छान वाटतात. पेहराव भरगच्च असल्यावर नाजूक पैंजणांपेक्षा मोठे पैंजण सुट होतात.
ऑक्सिडाईज दागिने हा सध्या फार लोकप्रिय प्रकार आहे. इतर दागिन्यांप्रामाणे ऑक्सिडाईज पैंजणही सुंदर दिसतात.