Saree Day 2025 : बापरे.. साडी घेणार की फ्लॅट? भारतातील सगळ्यात महागड्या १० साड्या, तेवढ्यात किमतीत येईल घर
Updated:December 21, 2025 14:46 IST2025-12-21T14:39:57+5:302025-12-21T14:46:07+5:30
Saree Day 2025: Most expensive sarees in India: Luxury Indian sarees: Costliest sarees in India: भारतातील सगळ्यात महागड्या १० साड्यांचे सुंदर प्रकार पाहूयात.

भारत हा वस्त्रपरंपरेचा देश असून साडी हे फक्त वस्त्र नाही, ती स्त्रीच्या सौंदर्याला मिळालेली परंपरेची ओळख आहे. साडी ही संस्कृती, वारसा आणि प्रतिष्ठेचं प्रतीक मानले जाते. देशाच्या वेगवेगळ्या भागात तयार होणाऱ्या काही साड्या इतक्या दुर्मिळ, मेहनतीच्या आणि कलात्मक असतात की त्यांची किंमत लाखोंमध्ये जाते. (Most expensive sarees in India)
लग्नसमारंभ, शाही कार्यक्रम किंवा खास संग्रहासाठी या साड्या खरेदी केल्या जातात. भारतातील सगळ्यात महागड्या १० साड्यांचे सुंदर प्रकार पाहूयात. (Luxury Indian sarees)
भारतील साड्यांची राणी मानली जाणारी बनारसी साडी ही सगळ्यात वरच्या क्रमांकावर येते. प्युअर रेशीमी, सोन्या-चांदीच्या जरीचं काम आणि पारंपरिक नक्षीमुळे तिची किंमत साधारण २ लाख ते ८ लाख रुपये किंवा त्याहून महागडी असू शकते.
दक्षिण भारतातील कांचीवरम साडी ही तिच्या जड रेशीम आणि टिकाऊपणासाठी ओळखली जाते. ही साडी हाताने विणतात. याची किंमत साधरण दीड लाख ते ७ लाख रुपये इतकी आहे.
पश्चिम बंगालची शान असलेली बलुचारी साडी. तिची किंमत साधारण १ लाख ते ५ लाख रुपये पर्यंत जाते.
आंध्रप्रदेशची पोचमपल्ली इकत साडी तिच्या जटिल डिझाइनसाठी प्रसिद्ध आहे. प्युअर रेशीममध्ये तयार केलेली पोचमपल्ली साडी ८० हजार ते ४ लाख रुपये किंमतीत मिळते.
महाराष्ट्राचा अभिमान पैठणी साडी. ही मोर, कमळ आणि पारंपरिक रंगसंगतीसाठी ओळखली जाते. अस्सल पैठणीची किंमत २ लाख ते १० लाख रुपये पर्यंत असू शकते.
गुजरातची पटोला साडी ही दुहेरी इक्कत तंत्रामुळे दुर्मिळ मानली जाते. एका साडीला तयार करण्यासाठी महिने लागतात, त्यामुळे तिची किंमत ३ लाख ते १२ लाखांपर्यंत आहे.
ओडिशाची संबलपुरी साडी ही हातमागावर विणलेली असून त्याच्यावर अनेक पारंपरिक चिन्हं आहेत. चांगल्या दर्जाच्या संबलपुरी साड्यांची किंमत ७० हजार ते ३ लाख रुपये असते.
आसामची मूगा सिल्क साडी ही नैसर्गिक सोनेरी रंगासाठी प्रसिद्ध आहे. या साडीची किंमत १ लाख ते ६ लाख रुपये इतकी असते.
केरळची कसवू साडी ही दिसायला साधी जरी असली तरी शुद्ध सोनेरी काठामुळे ती खास आहे. कसवू साड्यांची किंमत ५० हजार ते २ लाख रुपये इतकी असते.
राजस्थानची कोटा डोरिया साडी हलकी, पारदर्शक आणि नाजूक असते. चांगल्या दर्जाच्या कोटा डोरिया साड्या ४० हजार ते १.५ लाख रुपये किंमतीत विकल्या जातात.