Elephant Bangles Design : पाटल्या-तोड्यांसह शोभतील हातात हत्ती अंबारीच्या बांगड्या, ५ लेटेस्ट डिझाइन्स-महाराणीसारखे श्रींमत दिसतील हात
Updated:March 20, 2026 09:37 IST2026-03-19T12:00:00+5:302026-03-20T09:37:46+5:30
Royal bridal jewellery collection gold: Antique finish hatti bangles Marathi: साध्या साडीवरही या बांगड्या हातांना एक राजेशाही लूक देतात. पाहूया ५ नवीन पॅटर्न.

सणसमारंभ किंवा लग्नामध्ये पूर्वीच्या काळी स्त्रिया राजेशाही दागिने घालत असे. पण यात पाटल्या आणि तोडे नेहमीच असतं. पण आजच्या आधुनिक काळात पारंपारिक पाटल्या आणि तोड्यांना मागे टाकत 'हत्ती अंबारी' बांगड्यांची क्रेझ पुन्हा एकदा वाढली आहे. (Royal bridal jewellery collection gold)
आपल्यालाही एखाद्या लग्नात किंवा सण-समारंभात सर्वांपेक्षा वेगळे आणि 'रॉयल' दिसायचे असेल, तर हे हत्ती अंबारीचे डिझाइन आपल्याकडे असायला हवे. साध्या साडीवरही या बांगड्या हातांना एक राजेशाही लूक देतात. पाहूया ५ नवीन पॅटर्न. (Royal elephant ambari bangles gold)
नक्षीदार गोल्ड अंबारी कडा हा प्रकार दिसायला थोडा जड आणि मोठा असतो. यावर हत्ती आणि त्यावर असलेली अंबारीची अतिशय बारीक नक्षी कोरलेली असते. हे सिंगल कडे हाताचा लूक वाढवते.
आपण विशेष लग्नसमारंभाला किंवा कार्यक्रमाला जात असाल आणि साडी किंवा लेहेंगा परिधान करत असाल. तर लूक अधिक खुलवण्यासाठी ब्राइड डोली आणि एलीफेंट डिझाइन्स बँगल्स घालू शकता.
जर आपल्याला रंगाची आवड असेल तर मीनाकरी हत्ती डिझाइन असलेल्या बांगड्या निवडा. यामध्ये हत्तीच्या डोळ्यांवर किंवा अंबारीवर लाल, हिरव्या आणि निळ्या रंगाचे नाजूक मीनाकाम केलेले असते. जे पैठणी किंवा काळपदर साडीवर अतिशय सुंदर दिसते.
मोत्यांची जोड असलेले हत्ती तोडे. हत्तीच्या आकृतीसोबतच बांगडीच्या कडेला जर मोत्यांची लाईन असेल, तर त्याला एक वेगळीच नजाकत येते. हे डिझाइन सध्या लग्नसराईसाठी हे ट्रेंडमध्ये आहे.
ज्यांना चकचकीत सोन्यापेक्षा मॅट किंवा अँटिक लूक आवडतो, त्यांच्यासाठी हे उत्तम आहे. अँटिक फिनिश हत्ती अंबारी हे डिझाइन जुन्या काळातील दागिन्यांची आठवण करून देते आणि गडद रंगाच्या साड्यांवर खूप रॉयल वाटते.
मल्टीकलर स्टोन्स वर्क एलीफेंट डिझाइन बांगड्या हा पारंपारिक राजेशाही कलाकुसर आणि आधुनिक रंगीबेरंगी फॅशनचा एक अप्रतिम मिलाफ आहे. साध्या सोन्याच्या बांगड्यांपेक्षा या बांगड्या अधिक उठावदार आणि स्टायलिश दिसतात.