Old Saree Reuse: लग्नसमारंभात घालायला जुन्या साड्यांपासून शिवा डिझायनर पॅटर्नचे सुंदर ड्रेस- बघा ८ डिझाईन्स
Updated:November 13, 2025 12:36 IST2025-11-13T12:31:33+5:302025-11-13T12:36:40+5:30

महागड्या काठपदर साड्या आपण जपून वापरतो. त्यामुळे त्या वर्षांनुवर्षे टिकतात. पण तरीही प्रत्येक कार्यक्रमात तीच ती साडी पुन्हा पुन्हा आपण नेसू शकत नाही. म्हणूनच या साड्यांचा आता थोडा लूक बदला आणि तिचा मस्त ड्रेस शिवून घ्या...
जुन्या काठपदर साड्यांपासून असा मस्त स्कर्ट आणि कुर्ता प्रकारातला ड्रेस शिवता येतो. असा ड्रेस तुम्ही घातला तर नक्कीच चारचौघीत उठून दिसाल.
मेहेंदी, हळद, केळवण असे वेगवेगळे कार्यक्रम लग्नाच्या निमित्ताने असतातच. त्याप्रसंगांसाठी घालायला असा एखादा जुन्या साडीचा कुर्ता छान वाटतो.
कुर्ता विथ जॅकेट हा प्रकारही खूप स्टायलिश दिसतो आणि वेगळा लूक देतो. त्यामुळे कॉटनच्या साडीपासून तुम्ही असा एखादा छानसा ड्रेसही शिवू शकता.
अंगरखा प्रकारातला कुर्ताही खूप छान दिसतो. साडीच्या काठांचा सुंदर वापर कुर्त्यामध्ये करता येतो.
जर साडीचे काठ मोठे असतील आणि साडीच्या मधल्या रंगाशी कॉन्ट्रास्ट मॅच होणारे असतील तर अशा पद्धतीने ते मधाेमध लावून छान कुर्ता शिवता येतो.
बनारसी साडीपासून शिवलेले ब्लेझर हा प्रकारही सध्या खूप ट्रेण्डिंग आहे. लग्न खूप काही जवळचं नसेल तर तिथे उपस्थिती लावण्यासाठी अशा पद्धतीचे बनारसी ब्लेझर छान वाटेल.