लग्न, पार्टी, फंक्शन असो, साडी नेसायला वेळ नाही? ‘रेडी टू वेअर पँट स्टाईल साडी’ देते ५ मिनिटांत परफेक्ट लुक...
Updated:December 30, 2025 18:46 IST2025-12-30T18:30:53+5:302025-12-30T18:46:41+5:30
Ready to Wear Pant Style Saree Designs : ready to wear pant style sarees : pant style saree design : pre draped pant style saree : ready to wear saree with pants : साडी नेसायची झंझट विसरा, रेडी टू वेअर पँट स्टाईल साड्यांची बदलती फॅशन - पँट आणि साडीचे परफेक्ट फ्युजन...

सध्याच्या धावपळीच्या बिझी लाईफस्टाईलमध्ये पारंपरिक पद्धतीने साडी नेसणे अनेकींना (Ready to Wear Pant Style Saree Designs) वेळखाऊ आणि किचकट वाटते. पण भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेली साडी नेसण्याची इच्छाही असतेच! अशावेळी 'रेडी-टू-वेअर पँट स्टाईल साडी' हा एक उत्तम आणि ट्रेंडी पर्याय ठरु शकतो.
ही पँट स्टाईल साडी म्हणजे पारंपरिक साडीला दिलेला एक आधुनिक आणि कम्फर्टेबल टच! यात तुम्हाला साडी नेसण्याच्या कटकटीपासून मुक्ती मिळते, पण साडीचा (ready to wear pant style sarees) तो पारंपरिक लुक आणि ग्रेस कायम राहतो. ही साडी तुम्ही अगदी सहज एका पँटप्रमाणे घालू शकता आणि सोबत साडीचा पदर स्टाईल करू शकता. यामुळे वेळ वाचतो आणि तुम्ही कोणत्याही पार्टी, फंक्शन किंवा अगदी ऑफिससाठीही झटपट तयार होऊ शकता.
रेडी टू वेअर पँट स्टाईल साडी ही आधीच प्री-ड्रेप केलेली साडी असते, ज्यात साडीचा(pre draped pant style saree) पदर आणि निऱ्या तयार असतात आणि खाली पँट/पलाझो/धोती स्टाईल बॉटम दिलेला असतो. त्यामुळे साडी नेसण्याची झंझट न करता काही मिनिटांत परफेक्ट लुक मिळतो.
साडीचा एलिगन्स आणि पँटची कम्फर्ट एकत्र आणणारी ही स्टाईल तरुणींपासून ते ऑफिस वर्किंग महिलांपर्यंत सगळ्यांचीच पहिली पसंती (ready to wear saree with pants) ठरत आहे. लग्नसमारंभ, पार्टी, फेस्टिव्हल किंवा ऑफिस फंक्शनसाठी या साड्या परफेक्ट ठरतात. पाहा रेडी टू वेअर पँट स्टाईल साडीचे लेटेस्ट आणि ट्रेंडी डिझाइन्स...
आजच्या धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये पारंपरिक पद्धतीने साडी नेसण्याइतका वेळ अनेकांकडे नसतो. मात्र तरीही साडीची मोहकता आणि ग्रेस प्रत्येकीला हवीच असते. अशा वेळी "रेडी टू वेअर पँट स्टाईल साडी" हा ट्रेंड सध्या जोरदार चर्चेत आहे.
पारंपरिक साडी आणि वेस्टर्न पँटचा फ्युजन असलेली ही स्टाईल तरुणींमध्ये खूप लोकप्रिय आहे.
साध्या सॉलिड रंगातील पँट स्टाईल साडी ही ऑफिस किंवा कॅज्युअल इव्हेंटसाठी एकदम परफेक्ट पर्याय आहे.
यातही आपल्याला वेगवेगळे साडीचे आकर्षक व सुंदर पॅटर्न्स पाहायला मिळतात. कंबरपट्टा (बेल्ट) लावलेली पँट स्टाईल साडी लुकला मॉडर्न आणि स्टायलिश टच देते.
फ्लोरल किंवा जिओमेट्रिक प्रिंट्स असलेली ही साडी डे पार्टी आणि फेस्टिव्हलसाठी तुम्हला खास उठावदार लूक देते.
हलके पेस्टल रंग या साड्यांना सॉफ्ट, एलिगंट आणि ट्रेंडी लुक देतात.
जॉर्जेट, क्रेप, सॅटिन, शिफॉन, सिल्क ब्लेंड, ऑर्गेन्झा या फॅब्रिक्सच्या वेगवेगळ्या पॅटर्नमधील पँट स्टाईल साड्या खूपच सुंदर आणि आकर्षक देखण्या दिसतात.
नेसायची झंझट नाही, थेट घालायला तयार – प्री-ड्रेप्ड पँट साड्या कम्फर्ट आणि स्टाईल दोन्ही देतात.
साधी साडी नेसायला १० ते १५ मिनिटे लागतात, पण ही प्री - ड्रेप्ड पँट स्टाईल साडी तुम्ही २ मिनिटांत घालू शकता. साडी अडकण्याची किंवा निऱ्या सुटण्याची भीती नसते.
अशा प्रकारच्या साड्या नेसून आपण वेगाने चालून इतरही कामे करू शकता. पारंपरिक साडीच्या तुलनेत ही हाताळायला अतिशय सोपी असते.