रश्मिका मंदानाची लाल साडी आणि काळया काठांना सोन्याची जर, पाहा या विलक्षण सुंदर साडीला काय म्हणतात..

Updated:March 5, 2026 13:13 IST2026-03-05T13:09:36+5:302026-03-05T13:13:51+5:30

रश्मिका मंदानाची लाल साडी आणि काळया काठांना सोन्याची जर, पाहा या विलक्षण सुंदर साडीला काय म्हणतात..

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचा विवाहसोहळा जसा थाटामाटात पार पडला, तेवढ्याच शाही थाटात त्या दोघांचं रिसेप्शनही झालं. यावेळी रश्मिकाने नेसलेल्या लाल रंगाच्या साडीचीही खूप चर्चा झाली...(Rashmika Mandana's red mysore silk saree for reception)

रश्मिका मंदानाची लाल साडी आणि काळया काठांना सोन्याची जर, पाहा या विलक्षण सुंदर साडीला काय म्हणतात..

रश्मिकाने रिसेप्शन सोहळ्यासाठी खास मैसूर सिल्क प्रकारातल्या साडीची निवड केली होती. प्लेन मैसूर सिल्क साडी, काळे काठ आणि काठांवर सोन्याची लखलखती जर.. असा काही तिचा थाट होता. तिची ही साडी सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सब्यासाची यांनी डिझाईन केली होती.(Rashmika Mandana's look in red saree for reception)

रश्मिका मंदानाची लाल साडी आणि काळया काठांना सोन्याची जर, पाहा या विलक्षण सुंदर साडीला काय म्हणतात..

मैसूर सिल्क हे कर्नाटकचं एक पारंपरिक आणि उंची वस्त्र. तिथे लग्नसोहळ्यात मैसूर सिल्क साडीला खूप मान असतो. रश्मिकानेही तेच केलं. मैसूर सिल्क साडीचं वैशिष्ट असं की तिचे काठ भरगच्च असतात आणि साडी मात्र प्लेन असते. रश्मिकाची साडीही याच धाटणीची होती. पण तिच्या साडीची जर मात्र अस्सल सोनं लावून तयार करण्यात आली होती. त्यामुळे या साडीची किंमत नक्कीच लाखोंच्या घरात असणार यात वाद नाही..

रश्मिका मंदानाची लाल साडी आणि काळया काठांना सोन्याची जर, पाहा या विलक्षण सुंदर साडीला काय म्हणतात..

कोपऱ्यापर्यंत बाह्या असणारं गळाबंद ब्लाऊज घालून रश्मिका नव्या नवरीच्या थाटात खरोखरच अतिशय आकर्षक दिसत होती. या ब्लाऊजवरही सोन्याचांदीची जर होती..

रश्मिका मंदानाची लाल साडी आणि काळया काठांना सोन्याची जर, पाहा या विलक्षण सुंदर साडीला काय म्हणतात..

रश्मिकाने लग्नात घातलेल्या दागिन्यांची तर जोरदार चर्चा झालीच. पण आताही रिसेप्शनच्यावेळी तिने घातलेले हार, कंबरपट्टा, बाजुबंद, हातफूल असे सगळेच दागिने चर्चेचा विषय ठरले.