दिवाळीत मिरवा 'लहरीया' साड्यांची फॅशन! लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीजेच्या ट्रेडिशनल लूकला द्या 'राजस्थानी टच'...

Updated:October 21, 2025 12:00 IST2025-10-21T12:00:00+5:302025-10-21T12:00:02+5:30

Rajasthani Leheriya Saree For Diwali Festival Look : Rajasthani Leheriya Saree : नेहमीच्या काठापदराच्या साडीऐवजी या दिवाळीत ट्राय करा रंगीबेरंगी राजस्थानी लहरीया साड्यांची सुपरहिट फॅशन...

दिवाळीत मिरवा 'लहरीया' साड्यांची फॅशन! लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीजेच्या ट्रेडिशनल लूकला द्या 'राजस्थानी टच'...

दिवाळी म्हटलं की शॉपिंग आणि फॅशन आलीच! लक्ष्मीपूजन, पाडवा असो किंवा भाऊबीज, या सणांमध्ये नटून-थटून पारंपरिक वेशभूषा करण्याची मजा काही औरच असते. पण दरवर्षी त्याच त्या काठापदराच्या पारंपरिक साड्या नेसून कंटाळा आला असेल आणि यंदा काहीतरी वेगळं, आकर्षक आणि सुंदर ट्राय करायचं असेल, तर राजस्थानी पॅटर्नच्या 'लहरीया साड्या' हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे (Rajasthani Leheriya Saree For Diwali Festival Look).

दिवाळीत मिरवा 'लहरीया' साड्यांची फॅशन! लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीजेच्या ट्रेडिशनल लूकला द्या 'राजस्थानी टच'...

लहरीया साड्या त्यांच्या रंगीत आणि वेधक डिझाईन्समुळे (Rajasthani Leheriya Saree ) ओळखल्या जातात. राजस्थानी संस्कृतीची ही खास ओळख तुम्हाला दिवाळीच्या उत्साहात एक फॅशनेबल आणि पारंपरिक लुक देईल. या साड्यांमुळे तुम्ही गर्दीतही उठून दिसाल आणि तुमच्या दिवाळीच्या फोटोंनाही एक खास 'टच' मिळेल.

दिवाळीत मिरवा 'लहरीया' साड्यांची फॅशन! लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीजेच्या ट्रेडिशनल लूकला द्या 'राजस्थानी टच'...

३. लहरीया म्हणजे 'लाट' (Wave). या साड्यांवर विविध रंगांच्या पाण्याच्या लाटांसारख्या नक्षी असतात. बांधणी प्रमाणेच, ही राजस्थानची एक पारंपरिक 'टाय अँड डाय' कला आहे, जी पहाताना डोळ्यांना खूपच सुंदर व आकर्षक दिसते.

दिवाळीत मिरवा 'लहरीया' साड्यांची फॅशन! लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीजेच्या ट्रेडिशनल लूकला द्या 'राजस्थानी टच'...

जर तुम्हाला जास्त भडक रंग आवडत नसतील, तर पेस्टल रंगांतील लहरीया साडीची निवड करु शकता. ही साडी दिवाळीतील विविध कार्यक्रमांसाठी किंवा सकाळी दिवाळी पूजेसाठी खूप सुंदर दिसेल. आपण हलक्या गुलाबी, निळा किंवा हिरवा या रंगातील लहरीया साडी नेसून आपला लूक इतरांपेक्षा हटके करु शकता.

दिवाळीत मिरवा 'लहरीया' साड्यांची फॅशन! लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीजेच्या ट्रेडिशनल लूकला द्या 'राजस्थानी टच'...

संध्याकाळच्या दिवाळी पार्टीसाठी किंवा भाऊबीजेला स्टायलिश व सुंदर दिसण्यासाठी, लाल, पिवळा, नारंगी अशा ब्राइट रंगांतील लहरीया साडी नेसा. या साडीसोबत कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाउज खूप छान दिसेल.

दिवाळीत मिरवा 'लहरीया' साड्यांची फॅशन! लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीजेच्या ट्रेडिशनल लूकला द्या 'राजस्थानी टच'...

सिल्कमधील लहरीया साडी तुम्हाला एक रॉयल आणि एलिगंट लूक देईल. ही साडी दिवाळीच्या धनत्रयोदशी, पाडवा किंवा मोठ्या समारंभांसाठी उत्तम आहे. यासोबत पारंपरिक दागिने घातल्यावर तर तुमचा लूक अजूनच आकर्षक दिसेल.

दिवाळीत मिरवा 'लहरीया' साड्यांची फॅशन! लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीजेच्या ट्रेडिशनल लूकला द्या 'राजस्थानी टच'...

जर तुम्हाला साडी नेसून आरामदायक तसेच कम्फर्टेबल आणि मॉडर्न लूक हवा असेल, तर जॉर्जेट किंवा शिफॉनच्या लहरीया साडीची निवड करा. ही साडी नेसायला हलकी असते आणि ती तुम्हाला स्टायलिश लुक देते.

दिवाळीत मिरवा 'लहरीया' साड्यांची फॅशन! लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीजेच्या ट्रेडिशनल लूकला द्या 'राजस्थानी टच'...

लहरीया साडीसोबत चांदीचे दागिने किंवा ऑक्सिडाइज्ड दागिने खूप सुंदर दिसतात. हलका मेकअप आणि वेणी किंवा बन हेअरस्टाईल तुमचा लुक चारचौघीत उठून दिसण्यास मदत करेल.