मराठमोळा साज आणि पुतळी मंगळसूत्राचा थाट! गळ्यात शोभून दिसेल नवंकोरं,देखणं मंगळसूत्र - अस्सल, खणखणीत दागिना...

Updated:February 28, 2026 20:05 IST2026-02-28T20:00:15+5:302026-02-28T20:05:01+5:30

Putla Design Mangalsutra : traditional putla design mangalsutra : जुनं ते सोनं, पुतळी मंगळसूत्राचा रुबाबच भारी - डिझाईन्स पाहून प्रेमात पडाल....

मराठमोळा साज आणि पुतळी मंगळसूत्राचा थाट! गळ्यात शोभून दिसेल नवंकोरं,देखणं मंगळसूत्र - अस्सल, खणखणीत दागिना...

यंदाच्या लग्नसराईत 'ओल्ड इज गोल्ड' हा ट्रेंड पुन्हा एकदा जोमाने परत आला आहे. पारंपारिक दागिन्यांची आवड असणाऱ्या महिलांसाठी 'पुतळा मंगळसूत्र' किंवा 'लक्ष्मी कॉईन मंगळसूत्र' ही पहिली पसंती ठरत आहे. महाराष्ट्रीयन दागिन्यांमध्ये 'पुतळी' किंवा 'पुतळा मंगळसूत्राला' अत्यंत पवित्र आणि मानाचे स्थान आहे. यंदाच्या लग्नसराईत हेच पारंपारिक डिझाईन आधुनिक ट्विस्टसोबतच पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आले आहे.

मराठमोळा साज आणि पुतळी मंगळसूत्राचा थाट! गळ्यात शोभून दिसेल नवंकोरं,देखणं मंगळसूत्र - अस्सल, खणखणीत दागिना...

पुतळी म्हणजे सोन्याचं असं नाणं, ज्यावर धनलक्ष्मीची मोहक प्रतिमा कोरलेली असते. साताऱ्याचे पेशवे असोत वा कोल्हापूरचे छत्रपती, राजघराण्यातील स्त्रियांच्या गळ्यात पुतळी मंगळसूत्राचा (traditional putla design mangalsutra) रुबाब नेहमीच उठून दिसायचा.

मराठमोळा साज आणि पुतळी मंगळसूत्राचा थाट! गळ्यात शोभून दिसेल नवंकोरं,देखणं मंगळसूत्र - अस्सल, खणखणीत दागिना...

यंदाच्या लग्नसराईत हेच 'पुतळा मंगळसूत्र' एका नव्या रूपात समोर आलं आहे. आधुनिक काळातील स्त्रीला परंपराही जपायची आहे आणि फॅशनमध्येही मागे राहायचं नाहीये. म्हणूनच, साध्या काळ्या मण्यांपासून ते जड सुवर्णहारांपर्यंत, लक्ष्मी कॉईन (पुतळा) मंगळसूत्राने दागिन्यांच्या दुनियेत पुन्हा एकदा 'ट्रेंड' सेट केला आहे.

मराठमोळा साज आणि पुतळी मंगळसूत्राचा थाट! गळ्यात शोभून दिसेल नवंकोरं,देखणं मंगळसूत्र - अस्सल, खणखणीत दागिना...

यंदाच्या लग्नसराईत विशेष आकर्षण ठरत आहे पुतळा मंगळसूत्र, म्हणजेच देवी लक्ष्मीची प्रतिमा असलेले लक्ष्मी कॉईन मंगळसूत्र. पारंपरिक सौंदर्य, धार्मिक महत्त्व आणि रॉयल लूक यांचा सुंदर मिलाफ असल्यामुळे नववधूंपासून ते पारंपरिक दागिने आवडणाऱ्या महिलांपर्यंत हे डिझाईन्स सर्वांच्याच पसंतीस उतरले आहे.

मराठमोळा साज आणि पुतळी मंगळसूत्राचा थाट! गळ्यात शोभून दिसेल नवंकोरं,देखणं मंगळसूत्र - अस्सल, खणखणीत दागिना...

सौभाग्याचं लेणं असलेल्या मंगळसूत्रात जेव्हा धनलक्ष्मीचे रूप असणारी 'पुतळी' गुंफली जाते, तेव्हा त्या दागिन्याचा रुबाब काही वेगळाच दिसतो. तुम्ही नऊवारी साडी नेसणार असाल किंवा एखादी डिझायनर सिल्क साडी, त्यावर हे लक्ष्मी कॉईन मंगळसूत्र एक 'रॉयल लूक' देते.

मराठमोळा साज आणि पुतळी मंगळसूत्राचा थाट! गळ्यात शोभून दिसेल नवंकोरं,देखणं मंगळसूत्र - अस्सल, खणखणीत दागिना...

लक्ष्मीचे नाणे असलेले मंगळसूत्र समृद्धी, सौभाग्य आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे लग्न, सण किंवा खास पारंपरिक कार्यक्रमांसाठी हा दागिना परफेक्ट ठरतो. सध्या गोल्ड, अँटिक फिनिश, टेंपल ज्वेलरी स्टाइल आणि मॉडर्न मिनिमल डिझाईन्समध्ये लक्ष्मी कॉईन मंगळसूत्र मोठ्या प्रमाणात ट्रेंडमध्ये आहेत.

मराठमोळा साज आणि पुतळी मंगळसूत्राचा थाट! गळ्यात शोभून दिसेल नवंकोरं,देखणं मंगळसूत्र - अस्सल, खणखणीत दागिना...

पारंपरिक गोल कॉईनमध्ये कोरलेली लक्ष्मीची प्रतिमा आणि काळ्या मण्यांची साधी बारीकशी सर अशा नाजूक व सुंदर डिझाईनचे मंगळसूत्र रोजच्या वापरासाठीही योग्य.

मराठमोळा साज आणि पुतळी मंगळसूत्राचा थाट! गळ्यात शोभून दिसेल नवंकोरं,देखणं मंगळसूत्र - अस्सल, खणखणीत दागिना...

काळ्या मण्यांचे दोन सर आणि मध्यभागी ५ ते ७ लक्ष्मीची नाणी एकत्रित एकदम एकावर एक चिटकवलेली असतात. पारंपारिक नऊवारी किंवा पैठणी साडीवर हे मंगळसूत्र अतिशय देखणे दिसते.

मराठमोळा साज आणि पुतळी मंगळसूत्राचा थाट! गळ्यात शोभून दिसेल नवंकोरं,देखणं मंगळसूत्र - अस्सल, खणखणीत दागिना...

जर आपल्याला जड आणि भरगच्च दागिन्यांची आवड असेल तर आपण, टेंपल ज्वेलरी स्टाईल लक्ष्मीच्या नाण्यावर नक्षीकाम आणि खाली लहान घुंगरू किंवा मणी असणाऱ्या सुन्दर आणि भरीव डिझाईन्सची निवड करु शकता.

मराठमोळा साज आणि पुतळी मंगळसूत्राचा थाट! गळ्यात शोभून दिसेल नवंकोरं,देखणं मंगळसूत्र - अस्सल, खणखणीत दागिना...

अगदी रोजच्या वापरासाठी देखील शॉर्ट डेली वेअर पुतळी मंगळसूत्र एकदम उत्तम पर्याय ठरतो. एका नाजूक काळ्या सरामध्ये केवळ एक किंवा दोन लक्ष्मी कॉईन्स हे जास्त भरीव किंवा हेव्ही नसणारे साधेसुधे डिझाईन्स देखील अप्रतिम दिसते.

मराठमोळा साज आणि पुतळी मंगळसूत्राचा थाट! गळ्यात शोभून दिसेल नवंकोरं,देखणं मंगळसूत्र - अस्सल, खणखणीत दागिना...

एकाच पेंडंटऐवजी अनेक लहान - लहान लक्ष्मी कॉईन्स जोडलेल्या डिझाईनचे मंगळसूत्र पारंपरिक आणि ग्रँड लूक देते.

मराठमोळा साज आणि पुतळी मंगळसूत्राचा थाट! गळ्यात शोभून दिसेल नवंकोरं,देखणं मंगळसूत्र - अस्सल, खणखणीत दागिना...

यातही 'ठुशी' स्टाईल पुतळी मंगळसूत्र म्हणजे खूपच सुंदर... गळ्याशी घट्ट बसणाऱ्या 'ठुशी'मध्ये मध्यभागी एक मोठी लक्ष्मी पुतळी आणि आजूबाजूला सोन्याचे छोटे मणी. ज्यांना लांब मंगळसूत्र आवडत नाही, त्यांच्यासाठी हे आधुनिक आणि पारंपारिक असं सुरेख मिश्रण आहे. काठपदराच्या साडीवर हे चोकर मंगळसूत्र घातल्यास गळा भरलेला दिसतो आणि चेहरा अधिक उठून दिसतो.

मराठमोळा साज आणि पुतळी मंगळसूत्राचा थाट! गळ्यात शोभून दिसेल नवंकोरं,देखणं मंगळसूत्र - अस्सल, खणखणीत दागिना...

सोन्याच्या पुतळ्यांच्या कडेने बारीक मोत्यांची झालर किंवा लाल माणिक बसवलेले असतात. रंगीत खड्यांमुळे हे मंगळसूत्र अधिक उठावदार दिसतं. तुमच्या साडीच्या रंगाशी मॅचिंग खडे असलेले पुतळा मंगळसूत्र निवडून तुम्ही तुमचा लूक कस्टमाईज करू शकता.

मराठमोळा साज आणि पुतळी मंगळसूत्राचा थाट! गळ्यात शोभून दिसेल नवंकोरं,देखणं मंगळसूत्र - अस्सल, खणखणीत दागिना...

जर तुम्हाला मंगळसूत्रात फारसे काळे मणी नको असतील आणि मोजक्याच्या मण्यांसोबत फक्त भरीव आणि रेखीव अनेक पुतळ्या हव्या असतील तर अशा डिझाईन्सच्या मंगळसूत्राची तुम्ही निवड करू शकता.

मराठमोळा साज आणि पुतळी मंगळसूत्राचा थाट! गळ्यात शोभून दिसेल नवंकोरं,देखणं मंगळसूत्र - अस्सल, खणखणीत दागिना...

आपले नेहमीचे पारंपरिक दोन वाट्यांच्या मंगळसूत्राच्या बरोबर मधोमध देखील आपण अशा प्रकारचे एखादं लक्ष्मी कॉईन जोडून घेऊ शकता.

मराठमोळा साज आणि पुतळी मंगळसूत्राचा थाट! गळ्यात शोभून दिसेल नवंकोरं,देखणं मंगळसूत्र - अस्सल, खणखणीत दागिना...

पारंपरिक पुतळा डिझाईन्ससोबत लाल - हिरव्या किंवा रंगीबेरंगी मण्यांचे कुंदन वर्क असेल तर मंगळसुत्रचा लूक अगदी चारचौघीत उठून दिसतो.

मराठमोळा साज आणि पुतळी मंगळसूत्राचा थाट! गळ्यात शोभून दिसेल नवंकोरं,देखणं मंगळसूत्र - अस्सल, खणखणीत दागिना...

गोल कॉईनमध्ये उठावदार लक्ष्मी प्रतिमा आणि पारंपरिक काळ्या मण्यांची सर असे नाजूक मंगळसूत्र म्हणजे कायम ट्रेंडमध्ये राहणारे डिझाईन.