Join us   

पंजाबी ड्रेसवर स्टायलिश जॅकेट, फॅशनचा नवा ट्रेण्ड, बघा जॅकेटचे ८ स्मार्ट सुंदर प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2022 12:57 PM

1 / 8
पंजाबी ड्रेस आणि त्यावर ओढणी अशा पद्धतीचं ड्रेसिंग कधीकधी खूपच टिपिकल वाटतं. त्यात आपण काकुबाई दिसतोय की काय, असं फिलिंगही अनेकींना येतं.. म्हणूनच तर पंजाबी ड्रेस वर ओढणी घेण्यापेक्षा स्टायलिश जॅकेट (Punjabi suit with stylish jacket) घाला. पंजाबी ड्रेस विथ जॅकेट हा ट्रेण्ड सध्या जबरदस्त इन आहे.
2 / 8
हा आलियाचा लूकही अगदी तसाच. शॉर्ट टॉप, पटियाला आणि त्यावर आरसे आणि भरगच्च डिझाईन असलेलं शॉर्ट जॅकेट. हा तिचा लूक तिला आणखी ग्रेसफूल बनवतो आहे.
3 / 8
बेबो करिना कपूरचाही हा अंदाज अतिशय खास दिसतो आहे. पांढरा कुर्ता, पांढरी सलवार आणि त्यावर एकदम कॉन्ट्रास्ट रंगाचं निळं लाँग जॅकेट, असं तिचं ड्रेसिंग तिच्या लूकला एक वेगळा टच देणारा आहे.
4 / 8
हिना खानचा हा जॅकेटवाला ड्रेसही अतिशय सुरेख आहे. स्ट्रेट फिट पॅण्ट, शॉर्ट स्लिव्हलेस कुर्ता आणि त्यावर अतिशय घेरदार जॅकेट. असा लूक छान वाटतो आहे. एखाद्या भरजरी साडीचंही असं घेरदार जॅकेट शिवता येऊ शकतं.
5 / 8
प्लेन ड्रेस आणि त्यावर वर्क असणारं जॅकेट आणि शिवाय ओढणीही, अशा पद्धतीचं ड्रेसिंग तुम्हाला ट्रॅडिशन विथ फॅशन लूक देणारा ठरेल.
6 / 8
चिकनचा कपडा असणारा मोतिया रंगाचा ड्रेस आणि त्यावर भरगच्च वर्क असणारं जॅकेट या ड्रेसमध्ये खरोखरंच स्मार्ट लूक येतो. एखाद्या पारंपरिक छोटेखानी कार्यक्रमासाठी एथनिक वेअर म्हणून हा ड्रेस नक्कीच छान दिसेल.
7 / 8
अनारकली पद्धतीचा घेरदार लाँग कुर्ता आणि त्यावर तेवढंच लांब जॅकेट, अशा पद्धतीचा ड्रेस तुम्ही शिवूनही घेऊ शकता किंवा ऑनलाईन किंवा स्थानिक बाजारात खरेदी केल्यास हजार- दिड हजार रुपयांनाही मिळू शकतो.
8 / 8
बऱ्याचदा आपले फंक्शनल, पार्टीवेअर अनारकली ड्रेस असतात, त्यावर कशी ओढणी घ्यावी, हे समजत नाही. अशावेळी अशा पद्धतीने ओढणी घेतली तर त्या ड्रेसवर तुम्ही जॅकेट घातलं आहे, असा फिल येऊ शकतो. ओढणी घेण्याची ही जॅकेट स्टाईल नक्कीच वेगळी ठरू शकते.
टॅग्स : फॅशनब्यूटी टिप्स