पैठणीचा नवा 'रॉयल' ट्रेंड! पिकॉक-पॅरेट बॉर्डर पाहून पडाल प्रेमात - पिढ्यांपिढ्या जपावी अशी पैठणी...
Updated:February 7, 2026 21:45 IST2026-02-07T21:45:00+5:302026-02-07T21:45:02+5:30
peacock parrot border paithani : peacock & parrot border design paithani saree : peacock parrot paithani saree : पिकॉक-पॅरेट बॉर्डरची पैठणी एकदा पहाल तर म्हणालं, मला तर हीच पैठणी हवी....

मराठी संस्कृतीची शान आणि वस्त्रांची महाराणी असलेली पैठणी म्हणजे सगळ्या महिलावर्गाच पाहिलं प्रेम...पैठणीवर केलेलं नक्षीकाम, रंगसंगती आणि पारंपरिक बॉर्डर यामुळे तिचं सौंदर्य अधिक खुलतं. बदलत्या काळानुसार, पारंपरिक पैठणी साडी (peacock & parrot border design paithani saree) सतत नवनवीन रूपांत समोर येते.
विशेषतः मोरांच्या आणि पोपटांच्या नजाकतीने सजलेली पिकॉक-पॅरेट बॉर्डर (peacock parrot border paithani) पैठणी सध्या महिलांच्या पसंतीस उतरत आहे. मोर आणि पोपट यांचं सूक्ष्म आणि उठावदार नक्षीकाम असलेली पिकॉक – पॅरेट बॉर्डर पैठणी म्हणजे पैठणी साडीचा असाच एक उत्तम, नवीन प्रकार...
पैठणी म्हटली की डोळ्यासमोर येतो तो म्हणजे तिचा (peacock parrot paithani saree) भरजरी पदर आणि काठ. पण सध्या पारंपरिक पैठणीमध्ये एक अतिशय सुंदर आणि कलात्मक बदल पाहायला मिळतोय, तो म्हणजे 'पिकॉक-पॅरेट' (मोर-पोपट) बॉर्डरची पैठणी.
निसर्गातील दोन सर्वात सुंदर पक्षी जेव्हा रेशमी धाग्यांच्या विणकामात उतरतात, तेव्हा त्या साडीचे सौंदर्य कैक पटींनी वाढते. लग्नसराई असो किंवा एखादा सण, ही नक्षी असलेली पैठणी तुम्हाला गर्दीत उठून दिसते.
राजस लुक, समृद्ध परंपरा आणि कलात्मक डिझाईन्स यांचा सुंदर मिलाफ असलेली ही पैठणी लग्नसमारंभ, सण-उत्सव आणि खास प्रसंगांसाठी परफेक्ट ठरते.
या पैठणीच्या काठावर मोराचा डौल आणि पोपटाची नजाकत रेशमी धाग्यांनी अत्यंत बारीक रीतीने विणलेली असते. मोर हा सौंदर्य, शाही थाट आणि समृद्धीचं प्रतीक मानला जातो, तर पोपट आनंद, शुभ आणि सकारात्मकतेचं चिन्ह आहे. या दोन्ही पक्ष्यांचं नक्षीकाम पैठणीच्या बॉर्डरवर केल्यामुळे साडीला वेगळाच उठाव मिळतो.
पिकॉक – पॅरेट बॉर्डर असलेली पैठणी प्रामुख्याने हातमागावर विणली जाते. त्यामुळे प्रत्येक साडी ही एक वेगळी आणि खास कलाकृती असते.
पिवळा, हिरवा, जांभळा, लाल, निळा, मोरपिसी हिरवा अशा पारंपरिक आणि तेजस्वी रंगांमध्ये या पैठणी उपलब्ध असतात. सोनसळी जरी आणि रंगीत धाग्यांचा वापर साडीला शाही लुक देतो.
मोराची नक्षी पारंपरिक असली, तरी पोपटाच्या आकृत्यांची जोड दिल्याने या साडीला एक आधुनिक 'डिझाइनर' लूक मिळतो.
पदरावर रंगीबेरंगी मोर आणि मध्येच लपलेले सुंदर पोपट, जे साडीला एक भारी लूक देतात.
हल्ली नवरीच्या 'शालू' ऐवजी अशा प्रकारच्या हेवी बॉर्डर असलेल्या पैठणीला जास्त पसंती दिली जात आहे, कारण ती वजनाला हलकी आणि दिसायला अतिशय रॉयल असते.
मोर-पोपटांसोबतच कमळ, वेलबुट्टी अशा पारंपरिक मोटिफ्सचा समावेश बॉर्डरमध्ये केला जातो, ज्यामुळे साडी अधिक समृद्ध दिसते.
या पैठणींसोबत मोर किंवा पोपट नक्षीकाम असलेले ब्लाऊज पीस दिले जातात, ज्यामुळे संपूर्ण लुक अधिक आकर्षक दिसतो.
पारंपरिक नक्षीकाम असूनही या डिझाईन्स आजच्या फॅशन ट्रेंडला साजेशा आहेत. त्यामुळे तरुणींपासून वयोवृद्ध महिलांपर्यंत सगळ्यांच्याच पसंतीस उतरतात.