लाडक्या लेकीसाठी ‘पैठणी मॅक्सी गाऊन!’- इवलीशी लेक दिसेल परीसारखी - न टोचणारा पारंपरिक स्टायलिश लूक...

Updated:February 12, 2026 22:10 IST2026-02-12T17:15:00+5:302026-02-12T22:10:42+5:30

Paithani Maxi Gown With Jacket For Baby Girl : baby girl wedding outfit traditional : designer paithani maxi gown for baby Girl : यंदाच्या लग्नसराईत लेकीसाठी शिवा 'पैठणीचा रॉयल मॅक्सी गाऊन' - १० मनमोहक डिझाईन्स, पैठणीचा स्वॅग लय भारी...

लाडक्या लेकीसाठी ‘पैठणी मॅक्सी गाऊन!’- इवलीशी लेक दिसेल परीसारखी - न टोचणारा पारंपरिक स्टायलिश लूक...

लग्नसराईचे दिवस असोत, सणवार, किंवा एखादा खास प्रसंग (Paithani Maxi Gown With Jacket For Baby Girl) आपल्यासोबतच आपली लाडकी लेकही सर्वात सुंदर दिसावी असं प्रत्येक आईला वाटतं. अशावेळी लेकीसाठी काहीतरी खास आणि उठून दिसेल असा ड्रेस शोधण्याची लगबग सुरू होते. परंतु अशा प्रसंगी, लहान मुलींना साडी नेसवणं आणि ती सावरणं मोठं कठीण काम! मग अशा वेळी परंपरेचा गोडवा आणि मॉडर्न टच यांचा सुरेख संगम म्हणजे 'पैठणी मॅक्सी गाऊन विथ जॅकेट'. पारंपरिक पैठणीची श्रीमंती आणि आधुनिक गाऊनचा ट्रेंडी लुक यांचा सुंदर मिलाफ म्हणजे पैठणी साडीचे मॅक्सी गाऊन विथ जॅकेट. हा ड्रेस पारंपरिकतेची झलक ठेवत लेकीला रॉयल आणि ग्रेसफुल लुक देतो.

लाडक्या लेकीसाठी ‘पैठणी मॅक्सी गाऊन!’- इवलीशी लेक दिसेल परीसारखी - न टोचणारा पारंपरिक स्टायलिश लूक...

पैठणीचा झगमगता काठ, मोर-फुलांच्या नक्षी आणि रेशमी टेक्स्चरमुळे ( baby girl wedding outfit traditional) हा गाऊन प्रत्येक खास प्रसंगी उठून दिसतो. त्यावर मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट जॅकेट घातल्याने लुक अधिक आकर्षक आणि स्टायलिश दिसतो. लहान मुलींसाठी हे डिझाईन्स उत्तम पर्याय ठरतात.

लाडक्या लेकीसाठी ‘पैठणी मॅक्सी गाऊन!’- इवलीशी लेक दिसेल परीसारखी - न टोचणारा पारंपरिक स्टायलिश लूक...

पैठणीचा तोच नक्षीदार पदर, मोर-पोपटाची सुंदर वीण आणि भरजरी बॉर्डर आता गाऊनच्या स्वरूपात उपलब्ध आहे. विशेष म्हणजे त्यावरचे मॅचिंग जॅकेट या ट्रेंडी लूकला एक 'रॉयल' टच देते. यंदाच्या वेडिंग सीजनमध्ये तुमच्या चिमुकलीला एखाद्या परीसारखं सजवण्यासाठी हे इंडो-वेस्टर्न पैठणी डिझाईन्स नक्कीच ट्राय करायला हवेत.

लाडक्या लेकीसाठी ‘पैठणी मॅक्सी गाऊन!’- इवलीशी लेक दिसेल परीसारखी - न टोचणारा पारंपरिक स्टायलिश लूक...

लहान मुलांची त्वचा नाजूक असते. त्यामुळे पैठणी गाऊन घेताना पूर्णतः कडक सिल्कऐवजी 'सॉफ्ट सिल्क' किंवा 'सेमी-पैठणी' फॅब्रिक निवडा, जेणेकरून त्यांना दिवसभर टोचणार नाही. गाऊनच्या आतून कॉटनचे अस्तर असणे अत्यंत गरजेचे आहे, ज्यामुळे घाम शोषला जाईल आणि त्वचेला त्रास होणार नाही.

लाडक्या लेकीसाठी ‘पैठणी मॅक्सी गाऊन!’- इवलीशी लेक दिसेल परीसारखी - न टोचणारा पारंपरिक स्टायलिश लूक...

जॅकेट वेगळे काढता येणारे असावे, जेणेकरून साध्या फंक्शनला फक्त गाऊन आणि मोठ्या कार्यक्रमाला जॅकेटसह वापरता येईल.

लाडक्या लेकीसाठी ‘पैठणी मॅक्सी गाऊन!’- इवलीशी लेक दिसेल परीसारखी - न टोचणारा पारंपरिक स्टायलिश लूक...

केवळ काठ नसून जॅकेटवर जरदोषी किंवा हाताने केलेले नक्षीकाम असेल, तर तो लूक अधिक 'हेवी' आणि लग्नसराईसाठी परफेक्ट दिसतो.

लाडक्या लेकीसाठी ‘पैठणी मॅक्सी गाऊन!’- इवलीशी लेक दिसेल परीसारखी - न टोचणारा पारंपरिक स्टायलिश लूक...

निळ्या रंगाचा गाऊन आणि खालच्या भागात रुंद पैठणी काठ यामुळे साधेपणातही एलिगंट लुक सहज मिळतो. सोबतच केसांत गजरा आणि लहान बुगडी घातल्यास लूक अतिशय सुंदर दिसतो.

लाडक्या लेकीसाठी ‘पैठणी मॅक्सी गाऊन!’- इवलीशी लेक दिसेल परीसारखी - न टोचणारा पारंपरिक स्टायलिश लूक...

लग्नसराई, साखरपुडा किंवा खास समारंभासाठी लाल रंगाचा पैठणी मॅक्सी गाऊन विथ जॅकेट ड्रेस हा नेहमीच प्रत्येक प्रसंगी शोभून दिसतो. लाल रंग हा शुभ, पारंपरिक आणि रॉयल मानला जातो. त्यावर पैठणीची झरी बॉर्डर, मोर किंवा कमळ नक्षी असल्यास गाऊन अधिकच उठून दिसतो.

लाडक्या लेकीसाठी ‘पैठणी मॅक्सी गाऊन!’- इवलीशी लेक दिसेल परीसारखी - न टोचणारा पारंपरिक स्टायलिश लूक...

हिरव्या रंगाच्या गाऊनवर रेड किंवा मॅरून जॅकेट, सणासुदीला उठून दिसणारे कॉम्बिनेशन खूपच सुंदर दिसते.

लाडक्या लेकीसाठी ‘पैठणी मॅक्सी गाऊन!’- इवलीशी लेक दिसेल परीसारखी - न टोचणारा पारंपरिक स्टायलिश लूक...

जांभळा रंग म्हणजे राजेशाही, आकर्षक आणि उठून दिसणारा लुक. लग्नसराई, साखरपुडा किंवा खास समारंभासाठी जांभळ्या रंगाचा पैठणी मॅक्सी गाऊन विथ जॅकेट हा एक परफेक्ट पर्याय ठरतो.

लाडक्या लेकीसाठी ‘पैठणी मॅक्सी गाऊन!’- इवलीशी लेक दिसेल परीसारखी - न टोचणारा पारंपरिक स्टायलिश लूक...

छातीपर्यंत येणारे हे छोटे जॅकेट घालण्यास अतिशय हलके असते आणि उन्हाळ्याच्या लग्नसराईत लहान मुलींसाठी आरामदायक ठरते.हे जॅकेट कंबरेपाशी थोडे घट्ट असते आणि खाली त्याला छोटा घेर असतो. हे डिझाईन मुलींना दिसायला खूप क्यूट आणि मॉडर्न दिसते.

लाडक्या लेकीसाठी ‘पैठणी मॅक्सी गाऊन!’- इवलीशी लेक दिसेल परीसारखी - न टोचणारा पारंपरिक स्टायलिश लूक...

जर तुम्हाला गाऊनला बॉल-गाऊनसारखा मोठा घेर हवा असेल, तर खाली 'कॅन-कॅन' जाळी जोडावी. पण लक्षात ठेवा, ती टोचणार नाही याची काळजी घ्या.

लाडक्या लेकीसाठी ‘पैठणी मॅक्सी गाऊन!’- इवलीशी लेक दिसेल परीसारखी - न टोचणारा पारंपरिक स्टायलिश लूक...

हल्ली लहान मुलींसाठी पेस्टल पिंक किंवा स्काय ब्लू रंगाच्या पैठणी गाऊनची मोठी क्रेझ आहे.

लाडक्या लेकीसाठी ‘पैठणी मॅक्सी गाऊन!’- इवलीशी लेक दिसेल परीसारखी - न टोचणारा पारंपरिक स्टायलिश लूक...

तुमच्याकडे एखादी जुनी पैठणी साडी असेल, जी तुम्ही आता नेसत नाही, तर त्यातून लेकीचा हा ड्रेस शिवता येईल. साडीच्या प्लेन भागाचा वापर गाऊनच्या घेरासाठी करा.साडीच्या भरजरी पदराचा वापर जॅकेट बनवण्यासाठी करा.

लाडक्या लेकीसाठी ‘पैठणी मॅक्सी गाऊन!’- इवलीशी लेक दिसेल परीसारखी - न टोचणारा पारंपरिक स्टायलिश लूक...

पैठणी गाऊनवर सँडलपेक्षा 'मोजडी' किंवा खड्यांच्या 'कोल्हापुरी चपला' अधिक सुंदर दिसतात.

लाडक्या लेकीसाठी ‘पैठणी मॅक्सी गाऊन!’- इवलीशी लेक दिसेल परीसारखी - न टोचणारा पारंपरिक स्टायलिश लूक...

अंबाडा बांधून त्यावर छोटा 'खोपा' किंवा फुलांचा 'गजरा' माळावा. किंवा केस मोकळे ठेवून त्यावर स्टोनची 'हेअर बँड' लावावा.

लाडक्या लेकीसाठी ‘पैठणी मॅक्सी गाऊन!’- इवलीशी लेक दिसेल परीसारखी - न टोचणारा पारंपरिक स्टायलिश लूक...

गळ्यात चोकर किंवा मोठी माळ घालण्यापेक्षा कानात 'मोत्याच्या कुड्या' आणि कपाळावर छोटी 'चंद्रकोर' लावली तरी लूक पूर्ण होतो.

लाडक्या लेकीसाठी ‘पैठणी मॅक्सी गाऊन!’- इवलीशी लेक दिसेल परीसारखी - न टोचणारा पारंपरिक स्टायलिश लूक...

जॅकेटला मागे किंवा पुढे सुंदर 'गोंडे' लावून घ्या, ज्यामुळे ड्रेसला अधिक पारंपरिक टच मिळेल. जर गाऊन स्लीव्हलेस असेल, तर जॅकेटला थ्री-फोर्थ बाह्या ठेवल्यास तो लूक अधिक 'रॉयल' वाटतो.