सुटलेल्या ढेरीचा नाही कपड्यांचा प्रॉब्लम, ६ ऑउटफिटमध्ये तुम्ही कायम जाडजूड आणि लठ्ठ दिसता, पाहा कसे..

Updated:February 11, 2026 20:00 IST2026-02-11T20:00:00+5:302026-02-11T20:00:02+5:30

Outfits that make you look fat : Fashion mistakes to avoid: Styling tips for slim look: स्लिम दिसण्यासाठी कोणते कपडे घालणे टाळले पाहिजे, पाहूया.

सुटलेल्या ढेरीचा नाही कपड्यांचा प्रॉब्लम, ६ ऑउटफिटमध्ये तुम्ही कायम जाडजूड आणि लठ्ठ दिसता, पाहा कसे..

फॅशन आणि स्टाईलच्या जगात प्रत्येकाला परफेक्ट दिसायला आवडतं. पण वाढत्या वयानुसार किंवा चुकीच्या जीवनशैलीमुळे बऱ्याचदा पोटाचा घेर वाढतो. कपडे घातले की आपण त्यामध्ये अधिकच जाड दिसू लागतो. अनेकदा आपण बाजारात आलेले नवीन ट्रेंड्स पाहून कपडे खरेदी करतो, पण ते आपल्या शरीराच्या ठेवणीला साजेसे असतातच असे नाही. चुकीच्या कपड्यांची निवड केल्यामुळे शरीराचा आकार अधिकच बेढब दिसू लागतो आणि पोटाचा भाग उठून दिसतो. (Outfits that make you look fat)

सुटलेल्या ढेरीचा नाही कपड्यांचा प्रॉब्लम, ६ ऑउटफिटमध्ये तुम्ही कायम जाडजूड आणि लठ्ठ दिसता, पाहा कसे..

आपले शरीर सुडौल दिसावे आणि पोटाचे फॅट लपले जावे असं आपल्याला वाटतं असेल तर वॉर्डरोबमधून काही विशिष्ट कपड्यांना घालणं टाळा. स्लिम दिसण्यासाठी कोणते कपडे घालणे टाळले पाहिजे, पाहूया. (Fashion mistakes to avoid)

सुटलेल्या ढेरीचा नाही कपड्यांचा प्रॉब्लम, ६ ऑउटफिटमध्ये तुम्ही कायम जाडजूड आणि लठ्ठ दिसता, पाहा कसे..

लो-वेस्ट पॅन्ट्स कंबरेच्या खाली बसतात, ज्यामुळे पोटाचा वरचा भाग बाहेर लोंबकल्यासारखा दिसतो. याला मफिन टॉप म्हणतात. त्याऐवजी आपण हाय- वेस्ट पॅन्ट्स निवडायला हवी. ज्यामुळे पोट दबले जाते आणि शरीराला चांगला आकार मिळतो.

सुटलेल्या ढेरीचा नाही कपड्यांचा प्रॉब्लम, ६ ऑउटफिटमध्ये तुम्ही कायम जाडजूड आणि लठ्ठ दिसता, पाहा कसे..

बॉडीकॉन ड्रेस शरीराच्या प्रत्येक कर्व्हला चिटकून बसतात. आपल्या पोटावर जास्त चरबी असेल तर असे तर यामुळे बेली फॅट दिसेल. अशा वेळी ए-लाईन किंवा एम्पायर वेस्ट ड्रेसेसचा विचार करा.

सुटलेल्या ढेरीचा नाही कपड्यांचा प्रॉब्लम, ६ ऑउटफिटमध्ये तुम्ही कायम जाडजूड आणि लठ्ठ दिसता, पाहा कसे..

मोठ्या प्रिंट्समुळे शरीर अधिक रुंद दिसते. आडवे पट्टे असणारे कपडे आपल्याला जाड दाखवतात. त्याऐवजी लहान प्रिंट्स किंवा उभ्या पट्ट्यांचे कपडे वापरा, यामुळे आपण उंच आणि स्लिम दिसाल.

सुटलेल्या ढेरीचा नाही कपड्यांचा प्रॉब्लम, ६ ऑउटफिटमध्ये तुम्ही कायम जाडजूड आणि लठ्ठ दिसता, पाहा कसे..

सॅटिन किंवा सिल्कसारखे कापड शरीराला चिकटून राहते. अशाप्रकारचे कपडे पोटाच्या भागावर घड्या दाखवतं, ज्यामुळे लठ्ठपणा अधिक उठून दिसतो. सुती किंवा लिननसारखे कापड उत्तम पर्याय आहे.

सुटलेल्या ढेरीचा नाही कपड्यांचा प्रॉब्लम, ६ ऑउटफिटमध्ये तुम्ही कायम जाडजूड आणि लठ्ठ दिसता, पाहा कसे..

आपलं टमी खूप जास्त दिसत असेल तर क्रॉप टॉप घालणं टाळा. यामुळे थेट लक्ष पोटाकडे जाते. याऐवजी ट्युनिक किंवा कंबरेच्या खाली येणारे लॉंग टॉप्स घातल्यास पोटाचा भाग झाकला जातो.

सुटलेल्या ढेरीचा नाही कपड्यांचा प्रॉब्लम, ६ ऑउटफिटमध्ये तुम्ही कायम जाडजूड आणि लठ्ठ दिसता, पाहा कसे..

कंबरेवर खूप जड किंवा चमकणारे बेल्ट्स घालणं टाळा. यामुळे लोकांचे लक्ष पोटाकडे आकर्षित होते. जर बेल्ट वापरायचा असेल, तर तो साधा आणि गडद रंगाचा असायला हवा.