मॉर्डन अन् ट्रेंडी! 'या' साड्यांसह स्टाईल करा ऑफ शोल्डर ब्लाउज; लूक दिसेल एकदम क्लासिक
Updated:March 2, 2025 15:54 IST2025-03-02T15:11:55+5:302025-03-02T15:54:08+5:30
ऑफ शोल्डर ब्लाउजसोबत कोणत्या प्रकारच्या साड्या नेसाव्यात याबद्दल माहिती जाणून घेऊया...

साडी नेसल्यानंतर प्रत्येक महिला सुंदर दिसते. आजकाल साडी वेगवेगळ्या प्रकारे नेसून तिला मॉर्डन टच दिला जात आहे. बाजारात साड्यांसोबत घालण्यासाठी कॉन्ट्रास्ट रंगांचे रेडीमेड ब्लाउज देखील खूप उपलब्ध आहेत. त्याचीच सध्या फॅशन आहे. मॉर्डन आणि ट्रेंडी ट्विस्ट नेहमीच तुमचा लूक खूप अधिक आकर्षक बनवतो.
फॅशनच्या जगात ट्रेंड दररोज बदलत राहतात, परंतु काही डिझाइन अशा असतात ज्यांची फॅशन कधीच जात नाही. ऑफ शोल्डर ब्लाउज घातल्यानंतर लूक आणखी स्मार्ट आणि स्टायलिश होतो. ऑफ शोल्डर ब्लाउजसोबत कोणत्या प्रकारच्या साड्या नेसाव्यात याबद्दल माहिती जाणून घेऊया...
नेटेड साडी
नेटच्या साड्यांवर सर्व प्रकारचे ब्लाउज सुंदर दिसतात, परंतु या साड्यांसाठी ऑफ शोल्डर ब्लाउज हा बेस्ट ऑप्शन आहे. अभिनेत्री हंसिका मोटवानीने गुलाबी रंगाच्या नेट साडीसोबत ऑफ शोल्डर ब्लाउज घातला आहे. ज्यामध्ये तिचा लूक खूपच सुंदर दिसत आहे.
साडीच्या बॉर्डरवर कट दाना वर्क एक जबरदस्त लूक देत आहे. अभिनेत्रीच्या ब्लाउजच्या हातावर सोनेरी रंगाचा टसल लेस खूप छान दिसत आहे. तुम्हीही हा लूक नक्कीच ट्राय करू शकता.
रफल सॅटिन साडी
ऑफ शोल्डर ब्लाउज प्लेन रफल किंवा सॅटिन साड्यांसह देखील एक आकर्षक लूक देतात. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तसंच ब्लाउज शिवून घेऊ शकता किंवा साडीला कॉन्ट्रास्ट असलेल्या रंगाचं नवीन खरेदी करू शकता.
फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की गुलाबी रफल साडी सिल्व्हर सिक्विन वर्क ब्लाउजसह सुंदर दिसत आहे, जी खूप आकर्षक दिसते. अशी साडी आणि ब्लाउज प्रत्येक फंक्शनसाठी सर्वोत्तम आहेत.
प्रिंटेड साडी
जर तुम्हाला तुमच्या सिंपल प्रिंटेड साडीला एक नवीन लूक द्यायचा असेल, तर तुम्ही कोणताही साधा ऑफ शोल्डर ब्लाउज त्याच्यासोबत स्टाईल करू शकता. तुमच्या या लूकची सर्वजण नक्कीच प्रशंसा करतील.
प्रिंटेड साडी आणि प्लेन ब्लाउजचे कॉम्बिनेशन तुमचा लूक स्टायलिश बनवेल. तुम्ही हे कोणत्याही छोट्या कार्यक्रमात घालू शकता. तुम्हाला असे ब्लाउज ऑनलाइन ५०० ते १००० रुपयांपर्यंत सहज मिळू शकतात.