मिरर वर्क साडी आणि ब्लाऊजची 'एव्हरग्रीन' फॅशन! आरशांच्या नक्षीने उजळून निघेल सौंदर्य - मिरर वर्क साड्यांचे मनमोहक प्रकार...
Updated:February 4, 2026 11:10 IST2026-02-04T10:57:08+5:302026-02-04T11:10:58+5:30
Mirror work saree & blouse designs : mirror work sarees for wedding : mirror work sarees for festive wear : साडी, ब्लाऊजवरील मिरर वर्क प्रकाशात चमकताना एक मोहक आणि रॉयल इफेक्ट देतात...

कोणताही सण, लग्न, हळदीचा कार्यक्रम असो किंवा पार्टी; विशेष (Mirror work saree & blouse designs) आऊटफिट्मध्ये उठून दिसण्यासाठी स्त्रिया नेहमीच काहीतरी खास करतात. सध्या फॅशन विश्वात 'मिरर वर्क' असलेल्या साड्या खूपच लोकप्रिय आणि ही ट्रेंडिंग फॅशन झाली आहे. खास करून मिरर वर्क फॅन्सी साडी आणि ब्लाऊज सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. साडीच्या पदरावर, काठावर किंवा ब्लाऊजवर नक्षीदार पद्धतीने लावलेले छोटे-छोटे आरसे कपड्यांना एक वेगळीच चमक आणि आकर्षक लुक देतात.
साडी, ब्लाऊज किंवा कोणत्याही आऊटफिट्स वरील मिरर वर्क (mirror work sarees for wedding) प्रकाशात चमकताना एक मोहक आणि रॉयल इफेक्ट देतात, ज्यामुळे कोणत्याही समारंभात तुम्ही लक्ष वेधून घेता.
मिरर वर्क ही फॅशनच्या जगातील एक सदाबहार कला आहे. विशेषतः साडी आणि ब्लाऊजवर (mirror work sarees for festive wear) जेव्हा मिरर वर्क केले जाते, तेव्हा त्याला एक वेगळाच 'रॉयल' आणि 'फेस्टिव्ह' लूक मिळतो.
सध्या बाजारात सिल्क, जॉर्जेट, नेट, शिफॉन अशा विविध फॅब्रिकमध्ये मिरर वर्क साड्या उपलब्ध असून त्यावर ट्रेंडी कट, डीप नेक, बॅकलेस किंवा हाफ स्लीव्ह ब्लाऊज डिझाइन्स फॅशनमध्ये आहेत. पारंपरिकतेला मॉडर्न टच देणाऱ्या या मिरर वर्क साड्या महिलांच्या वॉर्डरोबमध्ये हमखास असायलाच हव्यात.
मिरर वर्क (Mirror Work) म्हणजे कापडावर लहान-लहान आरसे शिवून किंवा एम्ब्रॉयडरीच्या साहाय्याने बसवलेले डिझाइन. या आरशांमुळे साडी आणि ब्लाऊजला उठाव आणि रॉयल लूक मिळतो. मिरर वर्कला 'शीशा वर्क' असेही म्हणतात. ही कला प्रामुख्याने राजस्थान, गुजरात आणि कच्छ भागात पारंपरिकरीत्या केली जाते.
शिफॉन आणि जॉर्जेट हे हलके कापड असल्याने त्यावर मिरर वर्क अतिशय सुबक दिसते. पार्टीवेअर साड्यांसाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे.
सध्या ऑर्गेंझा साड्यांना खूप मागणी आहे. या साड्यांच्या काठावर (Borders) जेव्हा आरशाचे काम केले जाते, तेव्हा त्याला मॉडर्न लूक मिळतो.
पारंपरिक समारंभांसाठी सिल्क साड्यांवर हाताने केलेले मिरर वर्क अत्यंत रॉयल आणि क्लासी दिसते.
जर साडी साधी असेल, तर त्यावर संपूर्ण मिरर वर्क असलेला ब्लाऊज खूप उठून दिसतो.
पाठीवर आरशांची आकर्षक नक्षी असलेले ब्लाऊज तरुण मुलींमध्ये खूप लोकप्रिय आहेत.
आजकल केवळ आरसे लावले जात नाहीत, तर त्यांना अधिक आकर्षक करण्यासाठी इतर वर्कची जोड दिली जाते. आरशांच्या भोवती रंगीत रेशमी धाग्यांनी विणकाम केले जाते, ज्यामुळे साडी खूप रंगीबेरंगी दिसते. लग्नसराईसाठी साडी बनवताना सोन्या-चांदीच्या तारांसोबत आरसे वापरले जातात. आरशांच्या कडेने मोती किंवा कुंदन लावल्यास साडीला 'रॉयल' लुक मिळतो.
रात्रीचे फंक्शन, नाईट पार्टीसाठी मिरर वर्क साड्या उत्तम ठरतात, कारण दिव्यांच्या प्रकाशात आरसे चमकतात आणि तुमचा लूक इतरांपेक्षा वेगळा आणि सुंदर दिसतो.