Join us   

मराठी अभिनेत्रींचे संक्रांत स्पेशल लूक! बघा हलव्याचे दागिने आणि काळी साडी नेसून केलेला सुंदर साज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2023 3:55 PM

1 / 7
१. संक्रांतीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे घरोघरी महिलांची तयारी सुरू झालेली असणार. तिळगुळाचे लाडू किंवा वड्या, हळदी- कुंकाला वाणात लुटायचे सामान आणि काळ्या साडीची खरेदी... असं सगळं उत्साहपूर्ण वातावरण सध्या अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.
2 / 7
२. त्यात यंदा ज्यांच्या घरी नुकतंच लग्न झालेली नववधू आहे, तिची तयारी तर आणखीनच वेगळी. काळ्या साडीसोबतच तिच्यासाठी सुंदर हलव्याचे दागिनेही मागवले जातात. मराठी सेलिब्रिटीही यात मागे नाहीत. म्हणूनच हलव्याचे दागिने घालून मेकअप कसा करायचा, किंवा कशा पद्धतीचे हलव्याचे दागिने घ्यायचे याविषयी काही टिप्स पाहिजे असतील, तर मराठी अभिनेत्रींचे हे काही संक्रांत स्पेशल लूक बघाच.
3 / 7
३. मागच्या संक्रांतीला मराठी अभिनेत्री अंकिता लोखंडे हिचा उत्साह तर काही औरच होता. काळी साडी, हलव्याचे वेगवेगळे दागिने घालून तिने तिची संक्रांत मोठ्या थाटामाटात साजरी केली होती.
4 / 7
४. सोनाली कुलकर्णी हिनेही परदेशात तिची पहिली संक्रांत साजरी केली होती. पण तिथेही ती काळी साडी नेसून आणि हलव्याचे दागिने घालून अशा पद्धतीने सुंदर तयार झाली होती.
5 / 7
५. अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिचे हलव्यात तयार करण्यात आलेले मोराचे कानातले आणि गळ्यातले तर अतिशय सुंदर आणि अगदी नव्या धाटणीचे आहे.
6 / 7
६. सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर या दाम्पत्याचा हा संक्रांत स्पेशल लूकही चांगलाच गाजला होता. मितालीने तर सुंदर दागदागिने घातलेच होते. पण सिद्धार्थही गळ्यातला कंठा आणि भिकबाळी घालून छान तयार झाला होता.
7 / 7
७. अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने एका मालिकेच्या निमित्ताने केलेला हा संक्रांत स्पेशल लूकही चांगलाच व्हायरल झाला होता.
टॅग्स : फॅशनमकर संक्रांतीसाडी नेसणेतेजश्री प्रधान सोनाली कुलकर्णीअंकिता लोखंडेमिताली मयेकर