अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचे लग्नासाठी खास सुंदर ब्लाऊज, पाठीवरच्या नक्षीत सुखी संसाराची खास गोष्ट...

Updated:December 3, 2025 22:00 IST2025-12-03T22:00:00+5:302025-12-03T22:00:02+5:30

Marathi Actress Prajakta Gaikwad Wedding Special Blouse Design : Prajakta Gaikwad wedding blouse designs : prajakta gaikwad bridal look : अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने तिच्या संपूर्ण लग्नसोहळ्यात स्टाईल केलेले खास ब्लाऊज डिझाईन्स पाहून पडेल भुरळ...

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचे लग्नासाठी खास सुंदर ब्लाऊज, पाठीवरच्या नक्षीत सुखी संसाराची खास गोष्ट...

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलं. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील तिचा अभिनयान चाहत्यांना खूपच आवडला. आता खऱ्या आयुष्यातही नुकताच प्राजक्ताचा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात (Marathi Actress Prajakta Gaikwad Wedding Special Blouse Design) पार पडला आहे. तिने शंभूराज खुटवड याच्यासोबत विवाह केला आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. प्राजक्ताच्या रॉयल लुकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली. आतापर्यंत पाहिलेली सगळ्यात सुंदर नवरी असं म्हणत चाहत्यांनी तिचं कौतुक केलं. मात्र अशातच तिच्या ब्लाऊजचीही चाहत्यांमध्ये चर्चा रंगली.

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचे लग्नासाठी खास सुंदर ब्लाऊज, पाठीवरच्या नक्षीत सुखी संसाराची खास गोष्ट...

प्राजक्ताचा साखरपुड्याचा, चुडा भरण्याचा आणि हळदीचा असे सगळे लूक (Prajakta Gaikwad wedding blouse designs) अतिशय सुंदर होते. त्यामुळे चाहते प्राजक्ताच्या वेडिंग लूकची वाट पाहत होते. यावेळीही प्राजक्ताचा लूक अतिशय देखणा दिसत होता. प्राजक्ताच्या प्रत्येक लूकमधील ब्लाऊजची मोठी चर्चा होत आहे, कारण तिच्या ब्लाऊजचा लूकच तसा हटके होता.

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचे लग्नासाठी खास सुंदर ब्लाऊज, पाठीवरच्या नक्षीत सुखी संसाराची खास गोष्ट...

पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने पार पडलेल्या तिच्या लग्नसोहळ्याची चर्चा सोशल मीडियावर आजही रंगलेली आहे. या सोहळ्यात प्राजक्ताने परिधान केलेल्या साड्या आणि लेहेंगा जितका आकर्षक होता, तितकेच तिने घातलेले ब्लाऊज डिझाईन्स खास लक्ष वेधून घेत होते.

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचे लग्नासाठी खास सुंदर ब्लाऊज, पाठीवरच्या नक्षीत सुखी संसाराची खास गोष्ट...

प्राजक्ताने तिच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी निवडलेल्या ब्लाऊजच्या डिझाईन्समध्ये पारंपरिकता आणि आधुनिकता यांचा सुंदर मेळ अगदी चटकन दिसून येतो. तिच्या ब्लाऊजच्या डिझाईन्समध्ये बारीक कलाकुसर, आकर्षक नेक डिझाईन्स, आणि हटके स्लीव्ह पॅटर्न्स पाहायला मिळतात.

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचे लग्नासाठी खास सुंदर ब्लाऊज, पाठीवरच्या नक्षीत सुखी संसाराची खास गोष्ट...

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने तिच्या संपूर्ण लग्नसोहळ्यात स्टाईल केलेले खास ब्लाऊज आणि त्या ब्लाऊजचे विशेष आकर्षण आणि खासियत नेमकी काय ते पाहूयात...

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचे लग्नासाठी खास सुंदर ब्लाऊज, पाठीवरच्या नक्षीत सुखी संसाराची खास गोष्ट...

प्राजक्ताने तिच्या लग्नाच्या फोटोशूटसाठी खास गोल्डन रंगाची साडी आणि त्यावर ब्राऊन रंगाचा नक्षीकाम असलेला ब्लाऊज घातला होतो. या ब्लाऊजवरील बारीक रेखीव नक्षीकामामुळे तिचा लूक अधिकच उठून दिसत होता. या खास प्री - वेडिंग फोटोशूटमध्ये दोघेही अगदी रोमँटिक अंदाजात दिसत आहेत.

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचे लग्नासाठी खास सुंदर ब्लाऊज, पाठीवरच्या नक्षीत सुखी संसाराची खास गोष्ट...

प्राजक्ताने तिच्या कुंकवाच्या कार्यक्रमासाठी खास सोनेरी रंगाची सिल्क साडी नेसली होती आणि त्याला शोभेल असाच देखणा डिझायनर ब्लाऊज देखील खूप सुंदर दिसत होता. सिल्क साडीतील लूकवर प्राजक्ताने भरजरी आरी वर्क केलेला ब्लाऊज स्टाईल केला होता.

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचे लग्नासाठी खास सुंदर ब्लाऊज, पाठीवरच्या नक्षीत सुखी संसाराची खास गोष्ट...

साखरपुड्याला देखील प्राजक्ता गायकवाडने तितकाच सुंदर आणि हटके लूक केला होता. लाल काठ असलेली पांढरी साडी आणि त्यावर कॉन्ट्रास्ट परफेक्ट शोभेल असे लाल रंगाचे ब्लाऊज घातले होते. लाल काठ असलेली पांढरी साडी, हिरव्या रंगाची सुंदर ज्वेलरी, नाजूक हेअर स्टाईल, आणि ग्लोई मेकअप असा तिचा पूर्ण लूक होता. इतकेच नाही तर ब्लाऊजच्या मागच्या बाजूला तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव 'शंभुराज' असे डिझाईन करून घेतले होते.

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचे लग्नासाठी खास सुंदर ब्लाऊज, पाठीवरच्या नक्षीत सुखी संसाराची खास गोष्ट...

लग्नापूर्वीच्या घाणा व बांगड्या भरण्याच्या खास कार्यक्रमाला तिने गुलाबी रंगाची सुंदर साडी नेसली होती आणि त्यावर तितकाच शोभून दिसणारा आरी वर्क ब्लाऊजच घातला होता. या ब्लाऊजच्या बाह्यांवर मणी आणि नाजूक असे मोती वर्क पाहायला मिळते सोबतच, घाणा भरण्याच्या पारंपरिक कार्यक्रमाचे सूचक म्हणून जात्यावर दळण दळणाऱ्या दोन बायकांचे सुंदर असे डिझाईन तिने तिच्या ब्लाऊजच्या मागच्या बाजूला केले होते, जे अतिशय युनिक आणि त्या कार्यक्रमाला साजेसे असेच होते.

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचे लग्नासाठी खास सुंदर ब्लाऊज, पाठीवरच्या नक्षीत सुखी संसाराची खास गोष्ट...

प्राजक्ताने हळदीच्या कार्यक्रमात पिस्ता कलर आणि लाईट लेमन रंगाचा कॉन्ट्रास्ट असा लेहेंगा घातला होता. या लेहंग्याच्या ब्लाऊजवर देखील बारीक मोती, मण्यांचे आरी वर्क केले होते सोबतच ब्लाऊजच्या मागच्या बाजूला लक्ष्मीचे डिझाईन असलेलं पॅचवर्क देखील अगदी सुंदर शोभून दिसत आहे.

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचे लग्नासाठी खास सुंदर ब्लाऊज, पाठीवरच्या नक्षीत सुखी संसाराची खास गोष्ट...

या सगळ्यासोबतच तिचा लग्नाच्या ब्लाऊजची तर सोशल मिडीयावर तेवढीच चर्चा होताना दिसत आहे. कारण तिच्या हिरव्या गर्द साडीवर मॅचिंग असा हिरवा ब्लाऊज घातला होता, या ब्लाऊजच्या मागच्या बाजूला सप्तपदी लिहिलेली दिसत आहे.