दिसते चंद्राची कोर साजिरी..! चंद्रकोर नेकलेसचे पाहा सुंदर डिझाईन्स - सौंदर्य खुलवणारा पारंपरिक दागिना...

Updated:February 18, 2026 19:05 IST2026-02-18T19:00:20+5:302026-02-18T19:05:01+5:30

Maharashtrian Chandrakor Necklace : chandrakor necklace design : chandrakor necklace for wedding : चंद्रकोर पॅटर्नच्या नेकलेसचे सुंदर डिझाईन्स! लग्नसाराईत उठून दिसण्यासाठी साडी-नऊवारीवर घालावा असा देखणा दागिना...

दिसते चंद्राची कोर साजिरी..! चंद्रकोर नेकलेसचे पाहा सुंदर डिझाईन्स - सौंदर्य खुलवणारा पारंपरिक दागिना...

लग्नसराई म्हटलं की पारंपरिक साड्या, नऊवारीचा रॉयल अंदाज आणि त्यासोबत (Maharashtrian Chandrakor Necklace) उठून दिसणारे दागिने हे प्रत्येक महिलेच्या लूकचे खास आकर्षण ठरतात. साडी कितीही सुंदर असली तरी योग्य ज्वेलरीशिवाय लूक पूर्ण वाटत नाही. विशेषतः महाराष्ट्रीयन पारंपरिक पेहरावात चंद्रकोर डिझाईनचे नेकलेस सध्या महिलांमध्ये प्रचंड ट्रेंडमध्ये आहेत.

दिसते चंद्राची कोर साजिरी..! चंद्रकोर नेकलेसचे पाहा सुंदर डिझाईन्स - सौंदर्य खुलवणारा पारंपरिक दागिना...

मराठी संस्कृती आणि पारंपरिक दागिने म्हटलं की डोळ्यांसमोर (chandrakor necklace design) येते ती म्हणजे 'चंद्रकोर'. कपाळावरची चंद्रकोर जितकी सौंदर्यात भर घालते, तितकाच रुबाब चंद्रकोरीचा नेकलेस घातल्यावर येतो.

दिसते चंद्राची कोर साजिरी..! चंद्रकोर नेकलेसचे पाहा सुंदर डिझाईन्स - सौंदर्य खुलवणारा पारंपरिक दागिना...

विशेषतः लग्नकार्यात जेव्हा आपण एखादी भरजरी पैठणी किंवा नऊवारी (chandrakor necklace for wedding) साडी नेसतो, तेव्हा दागिन्यांची निवड अत्यंत महत्त्वाची ठरते. सध्या दागिन्यांच्या जगात अनेक फॅशनेबल ट्रेंड्स आले असले, तरी चंद्रकोर डिझाईनच्या नेकलेसची क्रेझ आजही कायम आहे.

दिसते चंद्राची कोर साजिरी..! चंद्रकोर नेकलेसचे पाहा सुंदर डिझाईन्स - सौंदर्य खुलवणारा पारंपरिक दागिना...

विशेषतः लग्नसराईत भरजरी साडी, केसात गजरा आणि नाकात नथ घातल्यावर जर गळ्यात एक सुंदर 'चंद्रकोर नेकलेस' असेल, तर तुमचा लूक 'परफेक्ट' होतो.

दिसते चंद्राची कोर साजिरी..! चंद्रकोर नेकलेसचे पाहा सुंदर डिझाईन्स - सौंदर्य खुलवणारा पारंपरिक दागिना...

मॉडर्न आणि परंपरा यांचा सुरेख संगम असणारे हे चंद्रकोर नेकलेस तुम्हाला कोणत्याही सोहळ्यात 'सेंटर ऑफ अट्रॅक्शन' बनवू शकतात.

दिसते चंद्राची कोर साजिरी..! चंद्रकोर नेकलेसचे पाहा सुंदर डिझाईन्स - सौंदर्य खुलवणारा पारंपरिक दागिना...

चंद्राच्या कोरीसारखा नाजूक आणि आकर्षक आकार असलेले हे नेकलेस साडी किंवा नऊवारीवर अत्यंत देखणे दिसतात आणि संपूर्ण लूकला रॉयल टच देतात.

दिसते चंद्राची कोर साजिरी..! चंद्रकोर नेकलेसचे पाहा सुंदर डिझाईन्स - सौंदर्य खुलवणारा पारंपरिक दागिना...

लग्न, साखरपुडा, हळद, मेहेंदी किंवा पारंपरिक फोटोशूट प्रत्येक प्रसंगासाठी चंद्रकोर नेकलेस परफेक्ट ठरतात. पारंपरिकतेसोबत आधुनिक डिझाईनचा सुंदर संगम असल्यामुळे हे नेकलेस तरुणींपासून नववधूपर्यंत सर्वांच्याच विशेष पसंतीस उतरतात.

दिसते चंद्राची कोर साजिरी..! चंद्रकोर नेकलेसचे पाहा सुंदर डिझाईन्स - सौंदर्य खुलवणारा पारंपरिक दागिना...

पांढऱ्या शुभ्र मोत्यांच्या माळेत गुंफलेली चंद्रकोर अत्यंत सात्विक आणि मोहक दिसते. जर तुम्ही नऊवारी साडी नेसणार असाल, तर मोत्यांचा चंद्रकोर हार तुम्हाला पेशवाई लूक मिळवून देतो.

दिसते चंद्राची कोर साजिरी..! चंद्रकोर नेकलेसचे पाहा सुंदर डिझाईन्स - सौंदर्य खुलवणारा पारंपरिक दागिना...

ज्यांना पूर्ण सोन्याचे दागिने आवडतात, त्यांच्यासाठी कोरीव काम केलेली सोन्याची चंद्रकोर उत्तम आहे. यावर बारीक नक्षीकाम किंवा देवी-देवतांच्या प्रतिमा देखील कोरलेल्या असतात, जे पारंपरिक साड्यांवर खूप सुंदर आणि डिसेंट लूक देतात.

दिसते चंद्राची कोर साजिरी..! चंद्रकोर नेकलेसचे पाहा सुंदर डिझाईन्स - सौंदर्य खुलवणारा पारंपरिक दागिना...

कोल्हापुरी ठुशीमध्ये मध्यभागी चंद्रकोरीचे पेंडंट असलेला प्रकार सध्या खूप ट्रेण्डिंग आहे. हे गळ्याला अगदी चिटकून घातल्याने भरजरी काठपदर साडीवर खूप उठून दिसते.

दिसते चंद्राची कोर साजिरी..! चंद्रकोर नेकलेसचे पाहा सुंदर डिझाईन्स - सौंदर्य खुलवणारा पारंपरिक दागिना...

जर तुम्हाला थोडा 'रॉयल' लूक हवा असेल, तर लाल-हिरव्या खड्यांनी किंवा कुंदन वर्कने सजलेली चंद्रकोर निवडा. ही डिझाईन्स सिल्क साड्यांवर अतिशय सुंदर दिसतात.

दिसते चंद्राची कोर साजिरी..! चंद्रकोर नेकलेसचे पाहा सुंदर डिझाईन्स - सौंदर्य खुलवणारा पारंपरिक दागिना...

नऊवारी साडीवर लांब लड असलेला चंद्रकोर हार आणि सोबत चिंचपेटी किंवा ठुशी घातल्यास 'मराठमोळा साज' पूर्ण होतो.

दिसते चंद्राची कोर साजिरी..! चंद्रकोर नेकलेसचे पाहा सुंदर डिझाईन्स - सौंदर्य खुलवणारा पारंपरिक दागिना...

नेकलेस चंद्रकोर डिझाईनचा असेल, तर कपाळावरही छोटी चंद्रकोर टिकली लावा, यामुळे तुमचा चेहरा अधिक तेजस्वी दिसेल.

दिसते चंद्राची कोर साजिरी..! चंद्रकोर नेकलेसचे पाहा सुंदर डिझाईन्स - सौंदर्य खुलवणारा पारंपरिक दागिना...

ऑक्सिडाईज्ड चंद्रकोर नेकलेस ट्रेंडी आणि इंडो-एथनिक लूकसाठी तरुणींमध्ये लोकप्रिय. हलक्या साड्यांवर किंवा फ्युजन आउटफिटवरही शोभतो.

दिसते चंद्राची कोर साजिरी..! चंद्रकोर नेकलेसचे पाहा सुंदर डिझाईन्स - सौंदर्य खुलवणारा पारंपरिक दागिना...

हिरव्या आणि लाल खड्यांनी सजवलेली चंद्रकोर हा एक 'एव्हरग्रीन' प्रकार आहे. जर तुमच्या साडीचे काठ हिरवे किंवा लाल असतील, तर हा नेकलेस तुमच्या साडीला उत्तमरित्या मॅच होतो.

दिसते चंद्राची कोर साजिरी..! चंद्रकोर नेकलेसचे पाहा सुंदर डिझाईन्स - सौंदर्य खुलवणारा पारंपरिक दागिना...

या नेकलेसमध्ये चंद्रकोरीच्या पेंडंटवर लक्ष्मीची मूर्ती किंवा मोराची नक्षी असते. दक्षिण भारतीय आणि महाराष्ट्रीयन अशा दोन्ही संस्कृतींचा संगम या डिझाईनमध्ये पाहायला मिळतो. काठपदर साडीवर हे डिझाईन अत्यंत वजनदार आणि रुबाबदार दिसते.