माधुरी प्रत्येक लुकमध्ये भन्नाट दिसते, पार्टीत साडी कॅरी करायची असेल तर, माधुरीचे हे ८ लूक देतील आयडिया..
Updated:December 23, 2022 15:13 IST2022-12-23T15:01:10+5:302022-12-23T15:13:01+5:30
Madhuri Dixit Looks Ideas माधुरी दीक्षितचे ८ फंक्शनल, ग्लॅमरस लूक, लग्न आणि पार्टीच्या मौसमात हे लूक कॉपी करा, दिसा सुंदर

बॉलिवू़डची धकधक गर्ल माधुरी दीक्षित आपल्या सौंदर्य आणि अदांसाठी ओळखली जाते. तिचा प्रत्येक लूक सोशल मिडीयावर व्हायरल होतो. पारंपारिक असो या वेस्टर्न ती प्रत्येक लूकमध्ये कमाल दिसते. आपल्याला या न्यू इयर पार्टीमध्ये हटके साडी लूक हवा असेल तर, माधुरी दीक्षितच्या या ८ लूकला फॉलो करा.
माधुरी महाराष्ट्रीयन लूकमध्ये मनमोहक दिसते. आपण देखील नारंगी आणि ग्रीन या मिक्स रंगाच्या साडीमध्ये उठून दिसाल. या साडीवर आपण महाराष्ट्रीयन मेकअप लूक ट्राय करू शकता.
माधुरी ब्लॅक साडी लूकमध्ये खूप सुंदर दिसते. या साडीवर गोल्डन बोर्डर उठून दिसत आहे. मुख्य म्हणजे या साडीवर तिने ब्लॅक रंगाचा हटके ब्लाउज परिधान केला आहे. आपण देखील या न्यू इयर पार्टीमध्ये ब्लॅक साडी लूक ट्राय करू शकता.
सिल्वर नेट या झगमगत्या साडीमध्ये माधुरी अप्सरा दिसत आहे. हा लूक तिला एक क्लासी आणि गॉर्जियस लूक देत आहे. आपल्याला पार्टीत क्लासी दिसायचं असेल तर हा लूक ट्राय करून पाहा.
माधुरीला प्रत्येक रंग उठून दिसतो. ती रॉयल ब्लू रंगामध्ये अफलातून दिसते. माधुरीने या साडीवर स्ट्रैपी ब्लाउज कॅरी केला आहे. न्यू पार्टीत हा लूक चारचांद लावेल यात शंका नाही.
माधुरीला सोफ्ट पिंक साडीत पाहून तुम्ही तिच्या प्रेमात पडाल. या साडीवर शिमरी पिंक बॉर्डर लावण्यात आले आहे. या साडीवर तिने स्लिवलेस ब्लाउज परिधान केलं आहे. लग्नात अथवा पार्टीत आपण हा लूक ट्राय करायला हरकत नाही.
ग्रीन शिमर साडीमध्ये माधुरीचा रेट्रो लूक प्रचंड व्हायरल झाला होता. ख्रिसमस, न्यू पार्टी किंवा मेहेंदी फंक्शनसाठी हा परफेक्ट लूक आहे.
डिसेंट आणि नॉर्मल लूक हवा असेल तर, माधुरीचा हा फ्लोरल प्रिंट साडी लूक ट्राय करा. यावर तिने स्लिव्हलेस ब्लाउज परिधान केला आहे.
वेडिंग अथवा न्यू पार्टीसाठी हटके आणि पॉश लूक हवा असल्यास माधुरीचा हा लूक ट्राय करा. यात तिने फ्लोरल प्रिंट विद एंब्रायडरी वर्क साडी कॅरी केली आहे.