साडीत उंची कमी दिसते, ठेंगणे दिसण्याची भीती ? साडी विकत घेताना पाहा ७ गोष्टी - दिसाल उंच, सडपातळ, सुंदर...

Updated:December 8, 2025 19:14 IST2025-12-08T18:50:39+5:302025-12-08T19:14:09+5:30

best saree prints for short height girls : sarees for short height women : saree tips for short height girls : saree design to look taller : उंची कमी असेल तर साडी नेसताना, कोणत्या प्रिंट्स टाळाव्यात आणि कोणत्या प्रकारच्या साड्या नेसल्यास उंची व्यवस्थित दिसते पाहा...

साडीत उंची कमी दिसते, ठेंगणे दिसण्याची भीती ? साडी विकत घेताना पाहा ७ गोष्टी - दिसाल उंच, सडपातळ, सुंदर...

उंची लहान असली तरी साडीची योग्य निवड केली तर एकूणच व्यक्तिमत्त्व अधिक उंच, सडपातळ (best saree prints for short height girls) आणि सुंदर दिसू शकते. साडीतील प्रिंट, रंग, बॉर्डर हे घटक आपल्या उंचीवर थेट परिणाम करतात. अनेकदा चुकीच्या डिझाइनमुळे उंची आणखी ठेंगणी भासते, तर योग्य पॅटर्न्समुळे कमी उंचीची महिलाही साडीत सहज उंच दिसू शकते. उंची कमी असेल तर साडी नेसताना, कोणत्या प्रिंट्स टाळाव्यात आणि कोणत्या प्रकारच्या साड्या नेसल्यास उंची व्यवस्थित दिसते याबाबत काही खास टिप्स पाहूयात.

साडीत उंची कमी दिसते, ठेंगणे दिसण्याची भीती ? साडी विकत घेताना पाहा ७ गोष्टी - दिसाल उंच, सडपातळ, सुंदर...

अनेक महिलांना, विशेषतः ज्यांची उंची लहान आहे त्यांना साडी नेसल्यावर त्यांची (saree tips for short height girls) उंची अधिक कमी दिसेल की काय, अशी चिंता असते. पण काळजी करू नका! साडीच्या निवडीमध्ये काही खास ट्रिक्स वापरल्यास, तुम्ही तुमची उंची अगदी व्यवस्थित आणि अधिक उंच भासवू शकता.

साडीत उंची कमी दिसते, ठेंगणे दिसण्याची भीती ? साडी विकत घेताना पाहा ७ गोष्टी - दिसाल उंच, सडपातळ, सुंदर...

जर तुमची उंची लहान असेल तर साडीवरील प्रिंट्स, साडीचे फॅब्रिक्स आणि कोणत्या रंगाच्या साड्या सर्वात बेस्ट, आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत ते पाहूयात...

साडीत उंची कमी दिसते, ठेंगणे दिसण्याची भीती ? साडी विकत घेताना पाहा ७ गोष्टी - दिसाल उंच, सडपातळ, सुंदर...

उभ्या पट्ट्यामुळे लांब आणि सलग रेषा तयार होते, ज्यामुळे उंची जास्त असल्याचा आभास तयार करता येतो. यामुळे उंची कमी असल्यास कायम उभ्या पट्ट्यांची किंवा उभ्या डिझाईन्स , प्रिन्ट्स असलेल्या साडीची निवड करावी. उभ्या रेषा शरीराला लांबट, उंच लूक देतात, त्यामुळे उंची अधिक दिसते.

साडीत उंची कमी दिसते, ठेंगणे दिसण्याची भीती ? साडी विकत घेताना पाहा ७ गोष्टी - दिसाल उंच, सडपातळ, सुंदर...

शिफॉन, जॉर्जेट, क्रेप यांसारखे फॅब्रिक्स साडीला अंगावर व्यवस्थित ड्रेप करता येतात, ज्यामुळे शरीर बांधेसूद आणि सडपातळ दिसते आणि साडी नेसल्यावरही उंची जास्त असल्याचा भास होतो.

साडीत उंची कमी दिसते, ठेंगणे दिसण्याची भीती ? साडी विकत घेताना पाहा ७ गोष्टी - दिसाल उंच, सडपातळ, सुंदर...

साडीत उंच दिसण्यासाठी नेहमी सीडीवर बारीक, नाजूक, लहान प्रिंट्स असतील अशीच साडी निवडावी. लहान आणि कमी अंतरावर असलेले प्रिंट्स, आपल्या उंचीवर लक्ष केंद्रित न करता, बांधा सडपातळ आणि उंच दाखवतात.

साडीत उंची कमी दिसते, ठेंगणे दिसण्याची भीती ? साडी विकत घेताना पाहा ७ गोष्टी - दिसाल उंच, सडपातळ, सुंदर...

साडीचा रंग पदरापर्यंत एकसारखाच असावा, यामुळे एक प्रकारचा सलग लुक मिळतो, ज्यामुळे उंची जास्त वाटते.

साडीत उंची कमी दिसते, ठेंगणे दिसण्याची भीती ? साडी विकत घेताना पाहा ७ गोष्टी - दिसाल उंच, सडपातळ, सुंदर...

साडीवरील मोठ्या आणि अरुंद आकाराचे प्रिंट्स शरीराच्या रुंदीवर अधिक लक्ष केंद्रित करतात आणि उंची कमी दाखवतात म्हणून मोठे आणि गडद प्रिंट्स टाळा आणि लहान आणि हलके किंवा सॉफ्ट प्रिंट्स किंवा डिझाईन्सची निवड करा

साडीत उंची कमी दिसते, ठेंगणे दिसण्याची भीती ? साडी विकत घेताना पाहा ७ गोष्टी - दिसाल उंच, सडपातळ, सुंदर...

साडीची मोठी बॉर्डर किंवा काठ उंची 'कापते' याउलट, लहान किंवा छोटी बॉर्डर उंची सलग दाखवते. यामुळे आपली उंची साडीत नेहमी जास्त दिसते.

साडीत उंची कमी दिसते, ठेंगणे दिसण्याची भीती ? साडी विकत घेताना पाहा ७ गोष्टी - दिसाल उंच, सडपातळ, सुंदर...

मोनोक्रोम कॉम्बो म्हणजे साडी आणि ब्लाऊज एकाच रंगात किंवा त्याच रंगाच्या शेडमध्ये निवडणे. उदा. गडद निळी साडी असेल तर निळ्याच शेडचा ब्लाऊज घालणे. साडी आणि ब्लाऊज वेगळ्या रंगाचे नसल्यामुळे शरीरावर आडवी रेषा तयार होत नाही. एकाच रंगामुळे संपूर्ण शरीर सरळ आणि लांब दिसते. रंग बदल नसल्याने डोळे वरून खाली सहज फिरतात, त्यामुळे उंची वाढल्यासारखी भासते.