Long Sleeves Blouse Design : लांब बाह्यांच्या ब्लाऊजच्या पाहा ७ खास डिझाइन्स, दिसाल एकदम स्टायलिश...
Updated:September 9, 2025 18:30 IST2025-09-09T18:12:31+5:302025-09-09T18:30:19+5:30
long sleeves blouse design : trendy long sleeve blouse patterns : stylish blouse with long sleeves : designer long sleeve blouse : modern blouse long sleeve look : सध्या लॉन्ग स्लिव्ह्ज ब्लाऊजमध्येही अनेक हटके आणि आकर्षक पॅटर्न्स उपलब्ध आहेत...

साडीची शोभा वाढवणारा आणि एकूणच लूकला स्टायलिश टच देणारा ब्लाऊजचा पॅटर्न (long sleeves blouse design) हा अतिशय महत्वाचा असतो. पारंपरिक डिझाइनसोबतच आजकाल लॉन्ग स्लिव्ह्ज ब्लाऊजचे हटके आणि मॉडर्न पॅटर्न्स सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत.
लॉन्ग स्लिव्ह्ज ब्लाऊज पॅटर्न, पारंपरिक आणि स्टायलिश (trendy long sleeve blouse patterns) लुकसाठी खूपच शोभून दिसतात. हे लॉन्ग स्लिव्ह्ज ब्लाऊज फक्त साडीला एक क्लासी लुकच देत नाहीत, तर ते आरामदायक व कम्फर्टेबल देखील असतात.
सध्या लॉन्ग स्लिव्ह्ज ब्लाऊजमध्येही अनेक हटके आणि (stylish blouse with long sleeves) आकर्षक पॅटर्न्स उपलब्ध आहेत.
आपण सध्या ट्रेंडमध्ये असलेले लॉन्ग स्लिव्ह्ज ब्लाऊजचे (modern blouse long sleeve look) काही नवीन आणि हटके पॅटर्न पाहणार आहोत, जे तुमच्या कोणत्याही साडीला एक रॉयल आणि स्टायलिश लुक देतील.
१. नेट फॅब्रिक लॉन्ग स्लिव्ह्ज :-
हातांवर नेट असल्याने ब्लाऊजला मॉडर्न आणि क्लासी लूक मिळतो.फुल स्लीव्ह्जमुळे हात झाकले जातात, पण नेटमुळे लूकला ट्रेंडी आणि हटके टच मिळतो. नेटसोबत एम्ब्रॉयडरी, झरी किंवा झरीचे पॅचवर्क केल्यास तो अधिक रॉयल दिसतो.
२. वेलवेट फॅब्रिक लॉन्ग स्लिव्ह्ज :-
वेलवेट फॅब्रिकपासून तयार केलेल्या लॉन्ग स्लिव्ह्ज ब्लाऊजच्या बाह्यांवर सुंदर हँडवर्क देखील करु शकता. जर तुम्हाला तुमच्या साडी लुकमध्ये काहीतरी खास आणि आकर्षक हवे असेल, तर सिल्कच्या साडीसोबत हा वेलवेट ब्लाऊज नक्की ट्राय करा.
३. बेल पॅटर्न लॉन्ग स्लिव्ह्ज :-
बेल पॅटर्नच्या या फुल स्लीव्ह ब्लाऊजमध्ये, फुल स्लीव्ह सोबतच हाताला डबल फ्रिल लावल्यास ब्लाऊजला एक खास लुक मिळतो. नेट आणि ऑर्गेंजा साड्यांसोबत असे ब्लाऊज अधिक सुंदर दिसतात.
४. पफी स्टाईल फुल स्लिव्ह्ज :-
जर तुम्ही प्रिंटेड साडीसोबत फुल स्लीव्ह ब्लाऊज मॅच करण्याचा विचार करत असाल, तर ही डिझाइन तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल. यामध्ये बाह्या वरच्या बाजूने प्लेट्स देऊन फुगलेली आहे. खालच्या बाजूला बाही अधिक घट्ट असल्यामुळे, तिचा लुक आणखी सुंदर झाला आहे.
५. फ्लोरल प्रिंट्स फुल स्लिव्ह्ज :-
फ्लोरल प्रिंट्स या कायमच ट्रेंडमध्ये असतात. रंगीबेरंगी फुलांच्या डिझाईन्समुळे लूकला फ्रेशनेस आणि युथफुल टच मिळतो. फुल स्लीव्ह्जवर फ्लोरल प्रिंट्स असल्यामुळे हात आकर्षक आणि स्लिम दिसतात. प्रिंटेड ब्लाऊजमुळे साध्या प्लेन साडीलाही नवा आकर्षक लूक मिळतो.
६. एम्ब्रॉयडरी लाँग स्लीव्ह्ज :-
फुल स्लीव्ह्जवर जर, रेशीम धागा, सीक्विन, झरी किंवा थ्रेडवर्कने केलेली एम्ब्रॉयडरी असेल तर ब्लाऊजला रॉयल टच देते. जड एम्ब्रॉयडरीमुळे ब्लाऊज स्वतःच स्टेटमेंट पीस ठरतो, त्यामुळे साडी साधी असली तरी चालते. सिल्क, बनारसी, ऑर्गेन्झा, जॉर्जेट, नेट अशा फॅब्रिकच्या साड्यांसोबत जास्त उठून दिसतो. लग्न, रिसेप्शन, पारंपरिक समारंभ, एंगेजमेंट, फेस्टिव्हल्ससाठी अगदी परफेक्ट.
७. सीक्विन वर्क लॉन्ग स्लिव्ह्ज :-
शिमरी सीक्विन्समुळे ब्लाऊजला ग्लॅमरस आणि रॉयल टच मिळतो. फुल स्लीव्ह्जवर सीक्विन वर्क केल्यामुळे हात लांब आणि स्लिम दिसतात. सीक्विन्स प्रकाशात झळाळून दिसतात, त्यामुळे ब्लाऊज लगेच उठून दिसतो. जॉर्जेट, शिफॉन, नेट, सिल्क अशा पार्टीवेअर साड्यांसोबत हा पॅटर्न बेस्ट दिसतो. ग्लॅमरस पार्टीज, कॉकटेल नाईट, रिसेप्शन, एंगेजमेंट अशा फंक्शन्ससाठी परफेक्ट.