Join us   

दिवाळीत करा स्वत:ची हौस, घ्या नाजूक-सुंदर चांदीचे पैंजण! पाहा लेटेस्ट फॅशनचे ८ मोहक डिझाइन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2023 5:29 PM

1 / 8
दिवाळीत पायात घालायला चांदीचे सुंदर पैंजण घ्यायचे असतील, तर हे लेटेस्ट फॅशनचे काही पर्याय पाहा.. एकापेक्षा एक छान डिझाईन्स मन आकर्षून घेतात.
2 / 8
हे एक एकदम लेटेस्ट डिझाईन. लहान मुलांच्या पायात घालायला वाळा असतो, तसेच हे डिझाईन असून त्याला एका बाजुने नाजूकसे घुंगरू आहे.
3 / 8
याच प्रकारातलं हे आणखी एक ठसठशीत डिझाईन. हा दागिना पायात घालताच पाय कसा भरून दिसतो.
4 / 8
मीना काम केलेलं हे एक सुंदर नाजूक डिझाईन. कोणत्याही पारंपरिक पेहेरावावर शोभून दिसेल असंच आहे.
5 / 8
क्रिस्टल्स किंवा बारीक स्टोन लावलेले पैंजणही आजकाल अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. त्यापैकी काही घ्यायचं असेल तर हे डिझाईन पाहा.
6 / 8
एकदम हेवी पैंजणांची आवड असेल तर हे मोराचं डिझाईन खूप सुंदर आहे. असं एखादं पीस आपल्या कलेक्शनमध्ये ठेवायला हरकत नाही.
7 / 8
जोडवी आणि पायातलं असं हे एकत्रित असलेलं डिझाईन पाहा. यातही अनेक प्रकार उपलब्ध आहेत.
8 / 8
छोटंसं सुंदर फूल, त्याला साखळ्या आणि नाजूकसं घुंगरू.... हे डिझाईनही पायात घातल्यावर खूप छान उठून दिसतं.
टॅग्स : दिवाळी 2023फॅशन