उन्हाळ्यासाठी ऑफिसवेअर मलमल कॉटन साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स! ना घामाची कटकट, ना गरम होते - दिसते स्टायलिश...
Updated:February 11, 2026 21:05 IST2026-02-11T21:00:04+5:302026-02-11T21:05:02+5:30
Latest designs printed mulmul cotton saree for summer office look : best mulmul cotton saree for office wear : officewear mulmul cotton saree : रखरखत्या उकाड्यातही दिसा सुंदर! ऑफिससाठी मलमल कॉटन प्रिंटेड साड्यांचे लेटेस्ट डिझाईन्स - राहा दिवसभर कूल आणि कॉन्फिडंट...

वाढता उन्हाळा, घामाचा चिकचिकाट आणि त्यात ऑफिसची ९ ते ६ ची धावपळ...अशा वेळी जड सिल्क किंवा सिंथेटिक साड्या (est mulmul cotton saree for office wear) नेसणं म्हणजे एक प्रकारची शिक्षाच वाटते. पण ऑफिसमध्ये प्रोफेशनल दिसणंही तितकंच महत्त्वाचं असतं. अशा वेळी अगदी सुंदर, डिसंट आणि प्रोफेशनल 'मलमल कॉटनच्या प्रिंटेड साड्या' साजेशा दिसतात.
अतिशय मऊ, वजनाला हलकी आणि श्वास घेण्यायोग्य (breathable) असलेल्या मलमलच्या साड्या उन्हाळ्यासाठी जणू एक वरदानच आहेत. ऑफिसवेअरसाठी या साड्या तुम्हाला एक अतिशय सोबर, प्रोफेशनल आणि क्लासी लूक देतात.
फुलासारख्या हलक्या आणि मखमलसारख्या मऊ असलेल्या या साड्या उन्हाळ्यात (officewear mulmul cotton saree) तुम्हाला केवळ थंडावाच देत नाहीत, तर एक अत्यंत 'क्लासी' आणि 'सोबर' प्रोफेशनल लूकही मिळवून देतात.
उन्हाळ्यातील फॅशन म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते फिकट रंग आणि सुती कापड. ऑफिसवेअरच्या बाबतीत सध्या 'मलमल कॉटन' हा ट्रेंड प्रचंड गाजतोय. वजनाला इतकी हलकी की अंगावर साडी आहे हे जाणवणारही नाही आणि लूक इतका ग्रेसफुल की पाहणाऱ्याची नजर हटणार नाही!
मलमल कॉटनच्या साडीची खासियत म्हणजे तिचे हलके टेक्श्चर आणि सोज्वळ, सोबर लूक. फ्लोरल, ब्लॉक प्रिंट, स्ट्राइप्स किंवा इंडिगो डिझाईन्समध्ये उपलब्ध असलेल्या या साड्या साधेपणातही उठून दिसतात.
परफेक्ट ब्लाऊज आणि मिनिमल अॅक्सेसरीजसोबत तुम्ही सहज एक क्लासी आणि कॉन्फिडंट ऑफिस लुक अगदी सहज मिळू शकतो.
हलका पिंक, ब्लू किंवा मिंट ग्रीन शेड्समधील फ्लोरल प्रिंट मलमल साड्या ऑफिससाठी अतिशय एलिगंट लुक देतात. या साड्या दिवसभर आरामदायक वाटतात आणि प्रोफेशनल लुकही कायम ठेवतात.
राजस्थानी किंवा हँडब्लॉक प्रिंट असलेली मलमल साडी साधी, पण क्लासी दिसते. यासोबत स्लीव्हलेस किंवा एल्बो स्लीव्ह ब्लाऊज छान दिसतो.
इंडिगो प्रिंट कधीच आउट ऑफ फॅशन होत नाही. व्हाईट किंवा ऑफ-व्हाईट प्रिंट असलेली इंडिगो मलमल साडी ऑफिसमध्ये आकर्षक आणि सोज्वळ लुक देते.
हलके जिओमेट्रिक डिझाईन्स असलेली साडी मॉडर्न आणि प्रोफेशनल दिसते. यासोबत सिल्वर ज्वेलरी उत्तम जुळते.
वर्टिकल किंवा सॉफ्ट स्ट्राइप्स असलेली साडी तुम्हाला स्लिम आणि स्मार्ट लुक देते. ऑफिस मीटिंगसाठी हा एक परफेक्ट पर्याय ठरू शकतो. पारंपरिक आणि मॉडर्न यांचा सुरेख संगम म्हणजे कलमकारी प्रिंटेड मलमल. मीटिंग्स किंवा ऑफिस इव्हेंट्ससाठी ही साडी तुम्हाला एक वेगळी ओळख मिळवून देईल.
लहान आकाराचे पोल्का डॉट्स व छोट्या-छोट्या बुट्टी डिझाईनची मलमल साडी रोजच्या ऑफिसवेअरसाठी योग्य आहे. ही साडी हलकी असल्याने दिवसभर सहज नेसता येते.
जर तुम्हाला पारंपरिक नक्षी नको असेल, तर रेषा किंवा त्रिकोणी नक्षी असलेल्या मलमल साड्या निवडा. या तुम्हाला 'स्मार्ट आणि शार्प' लूक देतात.