साध्या कॉटन साडीला मिळेल हॉट लूक! उन्हाळ्यासाठी ७ ट्रेंडी ब्लाउज डिझाइन्स; ऑफिस असो वा पार्टी दिसाल कूल

Updated:March 30, 2026 20:00 IST2026-03-30T20:00:00+5:302026-03-30T20:00:03+5:30

Simple cotton saree styling for parties: Latest cotton saree blouse designs 2026: साध्या कॉटन साडीला सेलिब्रिटी लूक देणारे ७ ट्रेंडी ब्लाउज डिझाइन्स पाहूया.

साध्या कॉटन साडीला मिळेल हॉट लूक! उन्हाळ्यासाठी ७ ट्रेंडी ब्लाउज डिझाइन्स; ऑफिस असो वा पार्टी दिसाल कूल

उन्हाळ्यात कपाटातील जड सिल्क आणि शिफॉन साड्या शक्यतो घातल्या जात नाहीत. त्याऐवजी आपण सुळसुळीत, थंडगार कॉटन साड्या निवडतो. कॉटन साडी ही फक्त साडी नाही तर ती स्टाईल स्टेटमेंट आहे. पण अनेकदा महिलांना वाटतं की कॉटन साडीमध्ये फक्त सिंपल आणि सोबर लूकच मिळतो. साधी कॉटन साडी किती ग्लॅमरस दिसेल, हे आपल्या ब्लाउज डिझाइनवर अवलंबून असतं. (Simple cotton saree styling for parties)

साध्या कॉटन साडीला मिळेल हॉट लूक! उन्हाळ्यासाठी ७ ट्रेंडी ब्लाउज डिझाइन्स; ऑफिस असो वा पार्टी दिसाल कूल

ऑफिसमधील एखादी महत्त्वाची मीटिंग असो, दुपारचं गेट-टुगेदर असो किंवा संध्याकाळची एखादी कॉकटेल पार्टी; योग्य कट आणि फिटिंगचा ब्लाउज आपल्याला गर्दीत वेगळं ठरवू शकतो. साध्या कॉटन साडीला सेलिब्रिटी लूक देणारे ७ ट्रेंडी ब्लाउज डिझाइन्स पाहूया. (Latest cotton saree blouse designs 2026)

साध्या कॉटन साडीला मिळेल हॉट लूक! उन्हाळ्यासाठी ७ ट्रेंडी ब्लाउज डिझाइन्स; ऑफिस असो वा पार्टी दिसाल कूल

बोट नेक ब्लाउज हा क्लासिक आणि एव्हरग्रीन प्रकार आहे. कॉटन साडीवर बोट नेक ब्लाउज अत्यंत रॉयल आणि प्रोफेशनल दिसतो. ऑफिस मीटिंगसाठी हा बेस्ट पर्याय आहे.

साध्या कॉटन साडीला मिळेल हॉट लूक! उन्हाळ्यासाठी ७ ट्रेंडी ब्लाउज डिझाइन्स; ऑफिस असो वा पार्टी दिसाल कूल

उन्हाळ्यात बोल्ड लूक हवा असेल तर स्लिव्ह्जलेस ब्लाउज उत्तम आहेत. कॉटन साडीसोबत स्लिव्ह्जलेस ब्लाउज आपल्याला मॉर्डन आणि कूल लूक देतो.

साध्या कॉटन साडीला मिळेल हॉट लूक! उन्हाळ्यासाठी ७ ट्रेंडी ब्लाउज डिझाइन्स; ऑफिस असो वा पार्टी दिसाल कूल

फॉर्मल आणि एलिगंट लूक हवा असेल तर एल्बो लेन्थ स्लिव्ह्ज असणारे ब्लाउज निवडा. कलम, इकत किंवा हँडलूम कॉटन साडीवर हे डिझाइन खूप उठून दिसतात. याच्या बाहीला काठ लावल्यास लूक अधिक खुलतो.

साध्या कॉटन साडीला मिळेल हॉट लूक! उन्हाळ्यासाठी ७ ट्रेंडी ब्लाउज डिझाइन्स; ऑफिस असो वा पार्टी दिसाल कूल

पार्टी किंवा संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी कॉटन साडीसोबत हॅल्टर नेक ब्लाऊज घाला. हे आपल्याला ग्लॅमरस आणि हॉट लूक देईल. गडद रंगाच्या कॉटन साडीवर कॉन्ट्रास्ट हॅल्टर नेक ब्लाउज उठून दिसतो.

साध्या कॉटन साडीला मिळेल हॉट लूक! उन्हाळ्यासाठी ७ ट्रेंडी ब्लाउज डिझाइन्स; ऑफिस असो वा पार्टी दिसाल कूल

सध्या फॅशनमध्ये 'इंडो-वेस्टर्न' लूकची मोठी क्रेझ आहे. कॉटन साडीवर ब्लाउजऐवजी छोटा शर्ट किंवा क्रॉप-टॉप स्टाईल ब्लाउज घालू शकतो. ऑफिस किंवा प्रवासात घालण्यासाठी अतिशय सोयीचे आहे.

साध्या कॉटन साडीला मिळेल हॉट लूक! उन्हाळ्यासाठी ७ ट्रेंडी ब्लाउज डिझाइन्स; ऑफिस असो वा पार्टी दिसाल कूल

आपण ब्लाउजच्या डिझाइनमध्ये खोल गळा ठेवून त्याला नाजूक दोरी लावू शकतो. यामुळे साधी कॉटनची साडीही पार्टी वेअर साडीसारखी दिसेल.

साध्या कॉटन साडीला मिळेल हॉट लूक! उन्हाळ्यासाठी ७ ट्रेंडी ब्लाउज डिझाइन्स; ऑफिस असो वा पार्टी दिसाल कूल

ऑफिसवेअरसाठी हाय-कॉलर किंवा चिनी कॉलर ब्लाउज अतिशय स्टायलिश दिसतात. उन्हाळ्यात कॉटनच्या साडीसोबत नक्की ट्राय करा.