गर्भरेशमी पैठणीवर शिवण्यासाठी पाहा ७ लेटेस्ट ब्लाऊज डिझाइन्स-पैठणीचं ब्लाऊजही हवं देखणं आकर्षक
Updated:October 11, 2025 14:36 IST2025-10-11T14:11:37+5:302025-10-11T14:36:30+5:30

दिवाळीसाठी अगदी हौशीने पैठणी साडी घेतली असेल तर त्याच्यावरचं ब्लाऊजही थोडं विचारपुर्वक शिवा.. कारण ही महागडी साडी आणि तिचं ब्लाऊज पुढे वर्षांनुवर्षे तुमच्याजवळच राहणार असतं..
पैठणीच्या काठांना मॅचिंग होणाऱ्या खणाच्या कपड्याचं ब्लाऊज हा सध्याचा लेटेस्ट ट्रेण्ड आहे. असं काही करता आलं तर पाहा..
पैठणीच्या ब्लाऊजवर आरी वर्क, मिरर वर्क करण्याचीही फॅशन आहे. हेवी वर्क डिझाईनचं ब्लाऊज आवडत असेल तर यात खूप वेगवेगळ्या डिझाईन्स मिळू शकतात.
पैठणीवरच्या ब्लाऊजच्या बाह्या नेटच्या कपड्याच्या घेऊन त्यावर थ्रेड वर्क किंवा पॅचवर्क करण्याचाही सध्या ट्रेण्ड आहेच.
बऱ्याच जणींचं असं म्हणणं असतं की पैठणीसारख्या महागड्या साडीवरचं ब्लाऊज खूप फॅशनेबल नसावं. कारण ही साडी पुढे १० ते १५ वर्षे तरी आपण नेसतो. अशावेळी फॅशन मागे पडली की ब्लाऊजही जुन्या पद्धतीचं वाटू लागतं. असा तुमचाही समज असेल तर असं अगदी साधं डिझाईन असणारं ब्लाऊज शिवा.
पैठणीवरचं एक पारंपरिक धाटणीचं ब्लाऊज तर तुमच्याकडे शिवून ठेवाच. पण असं एखादं स्लिव्हलेस ब्लाऊजही तुमच्या कलेक्शनमध्ये असू द्या.. ट्रॅडिशनल आणि ट्रेण्डी असं दोन्ही असणारा लूक हवा असेल तर हे ब्लाऊज छान दिसेल.
अशा पद्धतीच्या ब्लाऊजची आता खूप फॅशन आली आहे. विशेष म्हणजे हे ब्लाऊज जसं पैठणीवर छान दिसतं तसंच ते इतर कोणत्याही प्रकारच्या काठपदर साडीवरही उठून दिसतं.
पैठणीच्या काठांची मॅच होणाऱ्या रंगांचं कोपऱ्यापर्यंत बाह्या असणारं ब्लाऊजही खूप उठून दिसेल.